Control Of Jassid in Okra

भेंडीवरील तुडतुड्याचे नियंत्रण:-

ओळख:-

  • शिशु आणि वाढ झालेले किडे समान आकाराचे असतात पण शिशुंमध्ये पंख नसतात.
  • शेतातील पिकात प्रवेश केल्यावर शिशु आणि वाढ झालेले किडे उडताना दिसतात.
  • वाढ झालेले किडे पानांच्या आणि फांद्यांच्या खालील बाजूवर अंडी घालतात.
  • त्यांचे जीवनचक्र 2 आठवड्यात पूर्ण होते.

हानी:-

  • शिशु आणि वाढ झालेले किडे हिरव्या रंगाचे आणि लहान आकाराचे असतात.
  • शिशु आणि वाढ झालेले किडे पानांच्या खालील बाजूने रस शोषतात.
  • ग्रस्त पाने वरील बाजूस मुडपतात, त्यानंतर पिवळी पडतात आणि त्यांच्यावर दाग पडतात. त्याद्वारे माइकोप्लाज्मामुळे होणारे लघुपर्ण सारखे आणि करडेपणासारखे विषाणुजन्य रोग संक्रमित होतात.
  • या किडीचा तीव्र हल्ला झाल्यास रोपांच्या फळात घट होते.

नियंत्रण:-

  • पेरणी करताना कार्बोफुरोन 3 जी @ 10 किलो प्रति एकर मातीत मिसळावे.
  • किड्यांच्या नियंत्रणासाठी किडे दिसताच दर 15 दिवसांनी प्रोफेनोफॉस 50 % ईसी @ 400 मिली किंवा एसीटामाप्रीड 20% @ 80 ग्रॅम फवारावे.
  • किडीपासुन बचाव करण्यासाठी निंबोणी-लसूणाचे सटव किडे येण्यापूर्वी दर 15 दिवसांनी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Carrot fly

गाजरावरील माशीचे नियंत्रण:-

हानीची लक्षणे:-

  • गाजरावरील माशी विकसित होणार्‍या गाजराच्या आतील बाजूने चारही बाजूंनी अंडी घालते.
  • सुमारे 10 मिमी लांब अळी गाजराच्या मुळांच्या बाहेरील बाजूस मुख्यत्वे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खाऊन हानी करते. हळूहळू ती मुळात प्रवेश करते आणि आतील भागास हानी पोहोचवू लागते.
  • गाजराची पाने सुकू लागतात. काही पाने पिवळी तर काही लाल रंगाची होतात. परिपक्व मुळांच्या सालींवर निळसर करड्या रंगाची भोके दिसतात.

नियंत्रण –

  • गाजर कुळाशी संबंधित सर्व पिकांसाठी 3-5 वर्षांचे पीक चक्र अवलंबावे.
  • प्रोफेनोफोस 50 ईसी @ 400 मिली / एकर मात्रेची फवारणी करावी.
  • क्विनॉनोलफॉस 25 ईसी @ 300 मिली / एकर मात्रा फवारावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Jassids in Brinjal

वांग्याच्या पिकातील तुडतूड्यांचे नियंत्रण:-

  • शिशु आणि वाढ झालेल्या किड्यांचा रंग हिरवा असतो आणि आकार लहान असतो.
  • शिशु आणि वाढ झालेले किडे पानांच्या खालील बाजूच्या आवरणातून रस शोषतात.
  • रोगग्रस्त झाडांची पाने वरील बाजूस मुडपतात. नंतर ती पिवळी पडतात आणि त्यांच्यावर जळाल्यासारखे डाग पडतात.
  • तुडतूड्यांमुळे लघुपर्णसारखे मायक्रोप्लाज्मा रोग आणि करडेपणासारखे विषाणुजन्य रोगांचे संक्रमण होते.
  • या किडीचा तीव्र हल्ला झाल्यास रोपावर कमी फळे लागतात.

नियंत्रण:-

  • तुडतूड्यांचा उपद्रव रोखण्यासाठी रोपणानंतर 20 दिवसांनी अ‍ॅसीटामिप्रिड 20% WP @ 80 ग्रॅम/एकर किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8%@ 80 मिली/ एकरच्या मात्रेच्या द्रावणाची फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Aphids in Cabbage

पानकोबीच्या पिकातील माव्याचे नियंत्रण:-

  • शिशु आणि वाढ झालेले किडे कोवळ्या नासपातीच्या आकाराचे, काळ्या रंगाचे असतात.
  • ही कीड कोवळ्या फुटव्यावर वसाहत करून पानांचा रस शोषते.
  • तीव्र ग्रासलेले रोप पुर्णपणे सुकून मरते.

नियंत्रण:-

  • पुढीलपैकी कोणतीही एक मात्रा फवारावी:-
  1. डायमेथोएट 30 ईसी @ 300 मिली/एकर
  2. क्यूनॉलफॉस 25 ईसी @ 300 मिली/एकर
  3. प्रोफेनोफॉस 50 ईसी @ 400 मिली/ एकर
  • लागण झालेल्या रोपांचे अवशेष नष्ट करावेत तसेच शेतात वाढलेले गवत आणि तण काढावे.
  • दाणेदार फोरेटची 10 जी 10 किलोग्रॅम/हेक्टर मात्रा मातीत मिसळून माव्याच्या पुन्हा होऊ शकणारा हल्ला रोखता येतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Mealy Bug in Cotton

कापसावरील कापसी ढेकणी (मीली बग) किडीचे नियंत्रण:-

  • कापसी ढेकणी कापसाच्या पानाखाली वसाहत बनवून मेणचट आच्छादन तैय्यार करते.
  • कापसी ढेकणी मोठ्या प्रमाणात चिकटा तैय्यार करते. त्याच्यावर काळी बुरशी तैय्यार होते.
  • ग्रस्त झाडे कमजोर दिसतात आणि काळी पडतात. त्यामुळे त्यांची फलनक्षमता कमी होते.

नियंत्रण:-

  • पूर्ण वर्षभर शेत तणमुक्त ठेवावे.
  • शेतावर बारकाईने लक्ष ठेवावे, जेणेकरून सुरुवातीलाच किडीची लागण लक्षात येईल.
  • प्रभावी नियंत्रणासाठी सुरुवातीच्या अवस्थेतच प्रतिबंधक उपाययोजना करावी.
  • आवश्यकता असल्यास निंबोणी आधारित निंबोणीचे तेल @ 75 मिली प्रति पंप किंवा निंबोणीचे सत्व @ 75 मिली प्रति पम्प किंवा निंबोणीचे तेल यासारखी वनस्पतिजन्य कीटकनाशके फवारावीत.
  • रासायनिक नियंत्रणासाठी डायमिथोएट @ 30 मिली प्रति पम्प किंवा प्रोफेनोफॉस @ 40 मिली प्रति पम्प किंवा ब्यूप्रोफेज़िन @ 50 मिली प्रति पम्प फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Fruit fly in Sponge Gourd

घोसाळ्यामधील फळ माशी:-

हानी:-

  • अळ्या (लार्वा) फळांना भोक पाडून त्यातील रस शोषतात.
  • ग्रासलेले फळ खराब होऊन गळून पडते.
  • माशी शक्यतो कोवळ्या पानांवर अंडी घालते.
  • माशी अंडी देण्याच्या भागणे फळांना भोक पाडून त्यांची हानी करते. त्या भोकांमधून फळाचा रस गळतो.
  • शेवटी भोक पडलेले फळ सडते.
  • अळ्या फळांना भोक पाडून गर आणि कोवळ्या बिया खातात. त्यामुळे फळे पिकण्यापूर्वीच गळून पडतात.

नियंत्रण:-

  • ग्रस्त फळांना एकत्र करून नष्ट करावे.
  • अंडी देणार्‍या माशीच्या बंदोबस्तासाठी शेतात फेरोमॉन ट्रॅप लावावेत. या फेरोमॉन ट्रॅपमध्ये माशांना मारण्यासाठी 1% मिथाईल इजीनोल किंवा सिंत्रोनेला तेल किंवा अ‍ॅसीटिक आम्ल किंवा लॅक्टिक आम्लाचे द्रावण ठेवावे.
  • परागीभवनाच्या क्रियेनंतर लगेचच विकसित होणार्‍या फळांना पॉलीथीन किंवा कागदाने झाकावे.
  • माशांचे नियंत्रण करण्यासाठी घोसाळ्याच्या शेतात दोन रांगांमध्ये मक्याची रोपे लावावीत. मक्याची रोपे उंच असल्याने माशी त्यांच्या पानाखाली अंडी घालते.
  • ज्या क्षेत्रात फळ माशीचा जास्त उपद्रव आहे तेथे मातीत कार्बारिल 10% चूर्ण मिसळावे.
  • डायक्लोरोवास कीटकनाशकाची 3 मिली. प्रति ली. पाण्याची मात्रा फवारावी.
  • उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमिनीतील माशांना सुप्तावस्थेत असताना नष्ट करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Chilli Thrips

मिरचीवरील थ्रिप्सचे (फुलकिडा) नियंत्रण:-

लक्षणे:-

  • रोगग्रस्त पाने वरच्या बाजूला मुडपली जातात.
  • कळ्या नाजुक होऊन गळून पडतात.
  • सुरुवातीच्या अवस्थेत पिकाची वाढ आणि फुलांची संख्या घटते.

नियंत्रण:-

  • ज्वारीचे पीक घेतल्यावर लगेचच मिरचीचे पीक घेऊ नये.
  • मिरची आणि कांद्याची मिश्रपिके घेऊ नयेत.
  • इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यूएस @ 12 ग्रॅम/ किग्रा  वापरुन बीजसंस्करण करावे.
  • कार्बोफुरन 3% जी @ 33 किलो / हेक्टर किंवा फोरेट 10% जी @ 10 किलो / हेक्टर मातीत मिसळावे.
  • पुढीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी:

 

           कीटकनाशक मात्रा
इमिडाक्लोप्रिड 17.8 % एस.एल. 100 मिलि/एकर
डायमिथोएट 30 % ईसी 300 मिलि/ एकर
इमामेक्टिन बेन्झोएट 5 % एसजी 100 ग्रॅम/ एकर
प्रोफेनोफोस  50% ईसी 500 मिली/ एकर
फिप्रोनिल 5 % एससी 500 मिलि/ एकर
स्पिनोसेड  45 % एससी 70 मिली/ एकर

 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Gram pod borer in Soybean

सोयाबीनच्या पिकावरील हरबर्‍याची शेंग पोखरणार्‍या अळीचे नियंत्रण:-

हानीची लक्षणे: –

  • लार्वा कोवळ्या पानातील क्लोरोफिल खातात.
  • ते सुरूवातीस पानातून अन्न मिळवतात आणि नंतर फुले आणि फळांमधून अन्न मिळवतात.

नियंत्रण:-

  • उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी.
  • हेक्टरी 5 फेरोमॉन ट्रॅप बसवावेत.
  • क्लोरोपायरीफोस 20% ईसी @750 मिली/एकर आणि क्विनालफॉस 25% ईसी @ 250 मिली/एकर फवारावे. किंवा
  • डेल्टामैथ्रिन 2.8% ईसी @ 250 मिली/एकर आणि फ्लुबेंडीयामाइड 20% डब्लू जी @ 100 ग्रॅम/एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Contro of Diamondback Moth (DBM) in Cabbage

पानकोबीवरील अळीचे नियंत्रण:-

ओळखणे:-

  • अंडी पिवळट पांढरी आणि फिकट हिरव्या रंगाची असतात.
  • अळ्या 7-12 मिमी. लांब, फिकट पिवळ्या-हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यांच्या संपूर्ण शरीरावर बारीक रोम असतात.
  • वाढ झालेले किडे 8-10 मिमी. लांब, मातकट करड्या रंगाचे आणि आतील कडा पिवळ्या असलेले फिकट गव्हाळ रंगाचे पंखाचे असतात.
  • वाढ झालेल्या माद्या पानांवर झुबक्याने अंडी घालतात.
  • त्यांच्या पंखांवर पांढर्‍या रेषा असतात आणि ते दुमडल्यावर हिर्‍यासारखा आकार दिसतो.

नुकसान:-

  • लहान, सडपातळ हिरव्या अळ्या अंड्यातून निघाल्यावर पानांच्या बाहेरील आवरण खाऊन त्यांना भोके पाडतात.
  • हल्ला तीव्र असल्यास पानांची फक्त जाळी शिल्लक राहते.

नियंत्रण:- डायमंड बॅक मॉथचा उपद्रव रोखण्यासाठी बोल्ड मोहरीची लागवड  कोबीच्या प्रत्येक 25 ओळींनंतर मोहरीच्या दोन ओळी अशा प्रमाणात करावी. प्रोफेनोफ़ोस (50 र्इ.सी.) ची 3 मि.ली. प्रति लीटर पाणी मात्रा फवारावी. स्पाइनोसेड (25 एस. सी.) 0.5 मि.ली. प्रति ली. किंवा ईंडोक्साकार्ब 1.5 मि.ली. प्रति ली पाणी मात्रेची फवारणी पेरणीनंतर 25 दिवसांनी आणि पुन्हा त्यानंतर 15 दिवसांनी अशी दोन वेळा करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of white grubs in Soybean and Groundnut

सोयाबीन आणि शेंगदाण्यातील पांढर्‍या ग्रबचे नियंत्रण

हानीची लक्षणे:- ग्रब मुळे खातात. ग्रबने लहान मुळे खाल्ल्याने रोपे सुकू लागतात. रोपांचे सुकणे जोडांमध्ये दिसून येते.

पांढर्‍या ग्रबचे नियंत्रण:-

  • जैव-नियंत्रण:- मेटाराहीजियम एनीसोप्ली हे जिवाणूनाशक पांढरे ग्रब, वाळवी आणि जैसिड यात रोग पसरवून त्यांना नष्ट करते. जमीनीतून:- 2-4 किलो मेटाराहीजियम एनीसोप्ली 50 किलो शेणखत/कम्पोस्ट खत/मातीत मशागत करताना किंवा पीक उभे असताना मिसळावे. फवारणी:- 2 किलो मेटाराहीजियम एनीसोप्ली 150- 200 लीटर पाण्यात मिसळून 1 एकरात फवारणी करावी.
  • रासायनिक औषधांची फवारणी जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत प्रत्येक पावसानंतर करावी.
  • पहिल्या पावसानंतर 3-4 दिवसांनी शेताच्या परिसरात आणि रोपांजवळ संध्याकाळी क्लोरोपायरीफॉस 20% EC @ 2 मिली/लीटर ची फवारणी केल्याने वाढ झालेले ग्रब मारतात आणि ग्रबची संख्या आटोक्यात राहते.
  • क्लोरोपायरीफॉस 20% EC ( 6.5 to 12.5 मि.ली. /की.ग्रॅ. बियाणे) वापरुन बीजसंस्करण करणे खूप प्रभावी आढळून आलेले आहे.
  • उपद्रव खूप वाढल्यास पुढीलपैकी एका औषधाचा वापर करावा:
  • कार्बोफुरान 3 % @ 10 किलो प्रति एकर
  • क्लोरोपायरीफॉस 20 EC @ 500 मिली प्रति एकर
  • फोरेट 10% @ 10 किलो प्रति एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share