Some Information of Moong Cultivation

मूग हे भारतातील प्रमुख द्विदल धान्य आहे. मूग हा फायबर आणि लोहासह प्रोटीनचाही समृद्ध स्रोत आहे. त्याची लागवड खरीपाच्या हंगामात तसेच उन्हाळ्यात करता येते. त्याची शेती वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत केली जाते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी लोम ते रेताड लोम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मातीत हे पीक घेता येते. परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी लोम आणि रेताड लोम माती त्यासाठी उत्तम असते. क्षारयुक्त आणि ओल धरून ठेवणारी जमीन त्यासाठी उपयुक्त नाही.

पेरणीची वेळ:- खरीपाच्या पेरणीसाठी जुलैचा पहिला पंधरवडा ही उत्तम वेळ असते. उन्हाळी शेतीसाठी फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासून एप्रिलपर्यंत पेरणीस अनुकूल वेळ असते.

ओळींमधील अंतर:-  खरीपाची पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर 30 सेमी तर दोन रोपांमधील अंतर 10 सेंटीमीटर असावे. उन्हाळी पेरणीसाठी दोन ओळींमधील अंतर 22.5 सेमी आणि दोन रोपांमधील अंतर 7 सेंटीमीटर असावे.

पेरणीची खोली:- बियाणे 4-6 सेमी एवढ्या खोलीवर पेरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Importance of Magnesium in Plants

रोपांसाठी मॅग्नीशियमचे महत्त्व

मॅग्नीशियम (Mg), कॅल्शियम आणि सल्फर प्रमाणे रोपांच्या सामान्य, निरोगी विकासासाठी आवश्यक तीन दुय्यम पोषक तत्वांपैकी एक तत्व आहे. या तत्वांसाठी दुय्यम हा शब्द वापरला जात असला तरी तो त्याच्या महत्वाच्या संदर्भात नव्हे तर केवळ मात्रेपुरता वापरला जातो. दुय्यम पोषक तत्वाचा अभाव इतर तीन प्राथमिक पोषक तत्वांपैकी (नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम) कोणत्याही एका किंवा सूक्ष्म पोषक तत्वांच्या (लोह, मॅगनीज, बोरान, जस्त, तांबे आणि मोलिब्डेनम) यांच्या अभावाप्रमाणे रोपाच्या वाढीस हानिकारक असतो. त्याशिवाय काही प्रजातींमध्ये मॅग्नीशियमची ऊतक एकाग्रता फॉस्फरसच्या तुलनेत प्राथमिक पोषक तत्वाप्रमाणे असते.

मॅग्नीशियमचे कार्य

रोपाच्या कोशिकातिल अनेक एंझाइम्सचे कार्य एनआयटी चालण्यासाठी मॅग्नीशियम आवश्यक असते. परंतु, मॅग्नीशियमची सर्वात महत्वपूर्ण भूमिका क्लोरोफिल अणुच्या केंद्रीय परमाणुच्या रूपात असते. क्लोरोफिल हे वर्णक रोपांना त्यांचा हिरवा रंग मिळवून देते आणि प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया करते. ते अनेक रोपांच्या विकासासाठी आवश्यक एंझाइम्सना सक्रिय होण्यात सहाय्य करते आणि प्रोटीन संश्लेषणातही त्याचे योगदान असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Excellent Growth of Root in Onion

कांद्याच्या मुळांची उत्तम वाढ

शेतकर्‍याचे नाव:- देवनारायण पाटीदार

गाव:- कनारदी

तहसील :- तराना जिल्हा:- उज्जैन

शेतकरी बंधु श्री देवनारायण पाटीदार जी यांनी कांद्यात 4 किलो प्रति एकर या मात्रेत मायकोरायझा (जैव उर्वरक) चा वापर ग्रामोफ़ोन टीमच्या शिफारसीमूळे केल्याने त्याचे त्यांना उत्तम परिणाम मिळाले आहेत.  मुळांचा सम्पूर्ण विकास झाल्याने रोपे निरोगी राहिली असून कंदांचा आकार देखील एकसमान आहे.

Share

Factors Affecting storage of Onion and Garlic

कांदा लसूणच्या साठवणीस प्रभावित करणार्‍या बाबी:- जातीची निवड:- सर्व जातींची साठवण क्षमता एकसारखी नसते. खरीपाच्या हंगामात केल्या जाणार्‍या जातींचे कांदे टिकाऊ नसतात तर रब्बीच्या हंगामात केल्या जाणार्‍या जातींचे कांदे साधारणत: 4-5 महीने साठवता येतात. जातींनुसार हे बदलू शकते. गेल्या 10-15 वर्षांच्या अनुभवानुसार एन-2-4-2, अ‍ॅग्रीफाउंड लार्इट रेड, अर्का निकेतन इत्यादि जाती 4-5 महीने उत्तम प्रकारे साठवता येतात. लसूणच्या जी-1. जी- 2 ,जी 50 आणि जी 323 इत्यादि जाती 6 ते 8 महिने साठवता येतात.

उर्वरक आणि पाणी व्यवस्थापन:- उर्वरकांची मात्रा, त्यांचा प्रकार आणि पाणी व्यवस्थापन यांचा कांदा लसूणच्या साठवण क्षमतेवर प्रभाव पड़तो. शेणखतामुळे साठवण क्षमता वाढते. त्यामुळे शेणखत किंवा हरित खते वापरणे आवश्यक असते. कांदा लसूणमध्ये हेक्टरी 150 किग्रॅ. नत्र, 50 किग्रॅ. फॉस्फरस आणि 50 किग्रॅ. पोटाश देण्याची शिफारस केली जाते. शक्य असल्यास सर्व नत्र कार्बनिक खतांच्या माध्यमातून द्यावे आणि नत्राची पूर्ण मात्रा रोपणींनंतर 60 दिवसात द्यावी. उशिरा नत्र दिल्यास रोपांची खोडे जाड होतात आणि कांदा टिकत नाही तसेच बुरशीजन्य रोगांची लागण अधिक प्रमाणात होते व प्रस्फुटन जास्त होते, पोटॅशियमची मात्रा 50 किग्रॅ. पासून वाढवून 80 किग्रॅ. प्रति हेक्टर करावी. अशा प्रकारे 50 किग्रॅ. प्रति हेक्टर मात्रा देण्याने कांदा आणि लसूणाची साठवण क्षमता आणि गुणवत्ता वाढते. गन्धकासाठी अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा पोटॅशियम सल्फेट वापरल्याने रोपांना पुरेशा प्रमाणात गन्धक मिळते.

स्टोरेज हाऊसमधील वातावरण :- कांदा लसूणची दीर्घकाळ साठवण करण्यासाठी स्टोरेज हाऊसचे तापमान आणि अपेक्षाकृत आद्रता महत्वपूर्ण असते. अधिक आर्द्रता (70% हून अधिक) हा कांद्याच्या साठवणुकीचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे जिवाणूंचा उपद्रव देखील वाढतो आणि कांदा सडू लागतो. याउलट आर्द्रता कमी (65% हून अधिक) असल्यास कांद्यातून अधिक वाष्पोत्सर्जन होते आणि वजन घटते. चांगल्या साठवणुकीसाठी स्टोरेज हाऊसचे तापमान 25-30 डिग्री सें. आणि आर्द्रता 65-70 टक्के या दरम्यान असणे आवश्यक असते. मे-जून महिन्यात स्टोरेज हाऊसमधील तापमान अधिक असल्याने आणि आर्द्रता कमी असल्याने वजन घटते. जुलै ते सप्टेंबर या काळात आर्द्रता 70 टक्क्यांहून अधिक असल्याने सडण्याचे प्रमाण वाढते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तापमान कमी असल्यानं सुप्तावस्था मोडते आणि मोड येण्याची समस्या वाढते.

Share

Use of growth regulators in Watermelon

कलिंगडासाठी वाढ नियामकांचा वापर:- कलिंगडात हार्मोन उपचार करण्यासाठी पिकास उपयुक्त असलेले आणि ज्यांचा कलिंगडाच्या पिकावर अनिष्ट परिणाम होणार नाही, ज्यांच्यामुळे कलिंगडाची फळे धरणार्‍या मादी फुलांची संख्या वाढेल, ज्यांच्यामुळे अधिक उत्पादन मिळेल असेच हार्मोन्स वापरावेत. या उद्दिष्टांसाठी कलिंगडाच्या शेतीत चांगल्या उत्पादनासाठी हार्मोन उपचार महत्वपूर्ण ठरतात.

कलिंगडाच्या वेलास 2-4 पाने फुटल्यावर इथ्रेल च्या 250 पी.पी.एम (4 मिली./पम्प) मिश्रणाची फवारणी केल्यास मादी फुलांची संख्या वाढते आणि उत्पादन अधिक होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Use of Carbofuran for control of Soil Insects in Garlic

लसूणमधील जमिनीतील कीड नियंत्रणासाठी कार्बोफ्युरोनचा वापर

शेतकर्‍याचे नाव:- रामचंद्र पाटीदार

गाव:- खेदावत

तहसील:- गुलाना

जिल्हा:- शाजापुर

शेतकरी बंधु रामचंद्र जी यांच्या शेतात व्हाईट गर्ब किडीचा उपद्रव होता. तिच्या नियंत्रणासाठी त्यांनी कार्बोफ्यूरान कीटकनाशकाचा वापर 15 दिवास लसूणमध्ये केला. त्याचे त्यांना चांगले परिणाम मिळाले. त्याचबरोबर झाईम  वापरल्याने लसूणच्या मुलांचा चांगला विकास झाला आणि पीक निरोगी आहे.

Share

Role of Calcium in Plants

रोपातील कॅल्शियमची भूमिका:- कॅल्शियम हे आवश्यक पोषक तत्व असून त्याच्या अनेक भूमिका आहेत.

  • ते अन्य पोषक तत्वांच्या चयापचय प्रक्रियेत भाग घेते.
  • रोपातील योग्य त्या कोशिकांच्या वाढीस चालना देते.
  • कोशिका भित्तीची संरचना मजबूत बनवते – कॅल्शियम रोपाच्या कोशिका भित्तीचा अनिवार्य भाग आहे. ते कॅल्शियम पेक्टेट सन्युग बनवते, ज्यामुळे कोशिका भित्ति आणि कडाच्या कोशिकाना स्थिरता मिळते.
  • एंझायमेटिक आणि हार्मोनल प्रक्रियात भाग घेते. |
  • उष्णतेच्या ताणाविरोधात रोपांचे रक्षण करण्यास सहाय्य करते – कॅल्शियम स्टोमेटा प्रकियेत सुधार घडवून हीट शॉक प्रोटीन बनवण्यात सहभागी होते.
  • रोपांचा रोगापासून बचाव करण्यात मदत करते – अनेक प्रकारच्या बुरशी आणि जिवाणू गुप्त एंझाइम्स सोडून रोपाच्या कोशिका भित्ति खराब करतात. कॅल्शियमने प्रेरित मजबूत कोशिका भित्ति या आक्रमणापासून बचाव करू शकतात.
  • फळांची गुणवत्ता प्रभावित करते.
  • स्टोमेटाच्या नियमनात भूमिका अदा करते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Pea Pod Borer

मटारवरील शेग पोखरणारी कीड:- या किडीची अळी फुलांच्या पाकळ्या आणि देठ खाते. एक अळी अनेक फुलांच्या देतांना हानी पोहोचवते. सुरुवातीत अळी पाने खाते आणि नंतर देठांच्या मूळात भोक पाडून शेंगेत शिरते आणि शेंग आतून खाते.

प्रतिबंध:- उन्हाळ्यात खोल नांगरणी करा. त्यामुळे जमिनीत लपलेल्या किड्यांना नैसर्गिक शिकारी खाऊन टाकतील. पिकाचा चहुबाजुने सुरक्षा पीक म्हणून टोमॅटो लावा. मका, चवळी आणि वांगी या आंतरपिकांमुळे किड्यांची संख्या कमी करण्यास मदत होते. शेतात पक्षी बसवावेत. 0.5%  जिगरी आणि 0.1% बोरिक अॅसिड बरोबर HaNVP 100 LE प्रति एकर या मात्रेत अंडी उबवण्याच्या वेळी फवारावे आणि 15-20 दिवसांनी दुबार फवारणी करावी. रसायनांच्या वापरात 2.00 मिलीलीटर प्रोपेनोफॉस 50 ईसी प्रति लीटर पाणी अंडींनाशकाच्या स्वरुपात वापरावे. 4-5 फेरोमेन ट्रॅप प्रती हेक्टर वापरावे. सुरुवातीच्या काळात निंबोणी बी कर्नाल 5% फवारावे. लागण तीव्र असल्यास इंडोक्साकार्ब 14.5% SC 0.5 मिली किंवा स्पिनोसेड 45% SC 0.1 मिली किंवा 2.5 मिली क्लोरोपाईरीफास 20 EC प्रति ली. पाण्याचा शिडकावा करावा.

Share

Healthy Potato Crop due to Sulphur Application

बटाट्याच्या शेतात सल्फरच्या वापराने निरोगी पीक

शेतकर्‍याचे नाव:- सुरेश पाटीदार

गाव:- कनार्दी

तहसील:- तराना

जिल्हा:- उज्जैन

शेतकरी बंधु सुरेश जी यांनी 2 एकर क्षेत्रात चिप्सोना-3 बटाटे लावले आहेत, त्यात त्यांनी सल्फर 90% WDG 6 किग्रॅ/एकर च्या मात्रेचा वापर केला. त्यामुळे चांगले परिणाम झाले आहेत. सल्फर हा एंझाइम्स आणि अन्य प्रोटीन्सचा एक महत्वपूर्ण घटक आहे आणि क्लोरोफिल निर्मितीसाठी आवश्यक आहे. शेताची मशागत करताना मातीत 20 किलो/हे. सल्फर मिसळण्याची शिफारस केली जाते.

Share

Role of Potassium In Plant Growth

रोपांच्या वाढीत पोटॅशियमची भूमिका

पोटॅशियम (K) अनिवार्यपणे झाडांच्या शारीरिक प्रक्रियांमध्ये प्रमुख भूमिका बजावते. त्यामुळे रोपांच्या योग्य वाढीसाठी आणि प्रजननासाठी पोटॅशियम अत्यावश्यक आहे. जेठावर रोपांना आवश्यक पोषक तत्वांचा संबंध आहे तेथवर नायट्रोजननंतर पोटॅशियम महत्वपूर्ण मानले जाते. रोपाच्या अनेक जैविक आणि रासायनिक प्रक्रियांमध्ये त्याचे योगदान असल्याने त्याला “गुणवत्ता पोषक तत्व” असेही म्हणतात. रोपांमध्ये पोटॅशियम पुढील भूमिका बजावते:-

प्रकाश संश्लेषणात पोटॅशियम स्टोमेटाच्या उघडण्या-बंद होण्याला नियंत्रित करते आणि त्याद्वारे CO2 ग्रहण नियंत्रित करते.

पोटॅशियम एंझाइम्सच्या क्रियेला सक्रिय करते आणि अ‍ॅडेनोसिन ट्रायफॉस्फेट (एटीपी)च्या निर्मितीसाठी आवश्यक असते. एटीपी रोपाच्या उतींमध्ये होणार्‍या अनेक रासायनिक प्रक्रियांमध्ये महत्वाचा ऊर्जा स्रोत असते.

रोपांमधील पाण्याच्या व्यवस्थापनात (वाष्प-नियमन) पोटॅशियम प्रमुख भूमिका निभवते. पोटॅशियमच्या माध्यमातून रोपे मुळातून पाणी शोषतात आणि स्टोमेटामुळे पाण्याची हानी प्रभावित होते.

शुष्क प्रतिरोध वाढवण्यासाठी पोटॅशियम उपयुक्त असते.

रोपात प्रोटीन आणि स्टार्च संश्लेषणासाथी पोटॅशियमची आवश्यकता असते. प्रोटीन संश्लेषणाच्या जवळपास प्रत्येक चरणात पोटॅशियम आवश्यक असते. स्टार्च संश्लेषण प्रक्रियेला जबाबदार एंझाइम पोटॅशियमद्वारा सक्रिय होते.

एंझाइम्सचे सक्रियण – रोपातील वाढीशी संबंधित अनेक एंझाइम्सच्या सक्रियणात पोटॅशियम महत्वपूर्ण भूमिका बजावते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share