Symptoms and Control of Stemphylium Blight in Onion

कांद्यावरील स्टेम्फिलियम ब्लाइट रोगाची लक्षणे आणि त्याचे नियंत्रण

स्टेमफाईटम ब्लाइट रोग:- पानांमध्ये लहान पिवळे ते नारंगी डाग किंवा रेषा उमटतात आणि वाढून जाळ्याच्या आकाराचे अंडाकृती होतात.  डागांच्या सर्व बाजूंनी गुलाबी कडा असणे हे या रोगाचे लक्षण आहे. डाग पानांच्या कडावरुन खालच्या बाजूला वाढत जातात. डाग एकमेकात मिसळून मोठे होत जातात. पाने जळालेली दिसतात. रोपाच्या सर्व पानांना लागण होते. पुनर्रोपणानंतर 30 दिवसांनी 10-15 दिवसांच्या अंतराने किंवा रोगाची लक्षणे दिसू लागल्यावर जिवाणूनाशक मेन्कोजेब 75%WP @ 50 ग्रॅम प्रति पम्प, ट्रायसाईकलाज़ोल @ 20 मिली प्रति पम्प, हेक्सकोनाज़ोल @ 20 मिली, प्रोपिकोनाज़ोल @ 20 मिली प्रति पम्प यांची फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Subsidy on Medicinal and Aromatic Crops

औषधी आणि सुगंधित वनस्पतींच्या शेतीसाठी अनुदान

औषधी आणि सुगंधित पीक क्षेत्र विस्तार योजना:- या योजनेअंतर्गत शेतकर्‍यास स्वेच्छेने शेतास अनुकूल औषधी आणि सुगंधित पिकाखालील क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी पिकानुसार 20 ते 75% पर्यन्त अनुदान मिळू शकते. प्रत्येक शेतकर्‍यास योजनेअन्तर्गत 0.25 हेक्टर पासून 2 हेक्टर पर्यन्त लाभ देण्याची तरतूद आहे. पिकानुसार अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणे:-

क्र. पिकाचे नाव अनुदानाची रक्कम (रूपयात)
1. आवळा 13,000/-
2. अश्वगंधा 5,000/-
3. बेल 20,000
4. कोलियस 8,600/-
5. गुडमार 5000/-
6. कालमेघ 5000/-
7. श्वेत मुसली 62,500/-
8. सर्पगंधा 31,250/-
9. शतावरी 12,500/-
10. तुळस 6,000/-

अर्ज करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी आणि वरिष्ठ उद्यान विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

http://www.mphorticulture.gov.in/schemes.php

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Use of Bio-Fertilizer mycorrhiza (VAM)

जैविक उर्वरक मायकोराईजा (VAM) चा वापर

जैविक उर्वरक मायकोराईजा(VAM):- मायकोराईजा जिवाणू मायसेलिया आणि रोपाच्या मुळांमध्ये परस्परसंबंध आहे. VAM एक एन्डोट्रॉफिक (आत राहणारा) माइकोरार्इज़ा असून तो एस्पेटेक्स फाइकाइसेट्स जिवाणू बनवतो. VAM ही बुरशी रोपांच्या मुळात प्रवेश करते. त्यामुळे त्यांना मातीतून पोषक तत्वे घेण्यास मदत होते. VAM मुख्यता फॉस्फरस, जस्त आणि सल्फर ही पोषक तत्वे घेण्यास मदत करते. VAM बुरशी रोपांच्या मुळाशी ओल धरून ठेवण्यास मदत करते. ती मुळे आणि मातीतील रोगकारके आणि नेमाटोड यांच्याविरोधात प्रतिकारकक्षमता वाढवते. ती कॉपर, पोटाशियम, अॅल्युमिनियम, मॅगनीज, लोह आणि मॅग्नीशियमसारख्या पोषक तत्वांना मातीतून घेऊन रोपांच्या मुळांपर्यंत पोहोचवते. सर्व पिकांना पेरणीच्या वेळी किंवा पेरणीनंतर 25-30 दिवसांनी मायकोरार्इज़ाची 4 किलोग्रॅम प्रति एकर मात्रा द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Subsidy on Horticultural Machinery

फळबागेच्या यंत्रांसाठी अनुदान

फळबागांच्या विकासासाठी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्याची योजना:- जे शेतकरी फळबागेसाठी आधुनिक यंत्रे वापरू इच्छितात त्यांना अशा यंत्रांच्या एकाकी खर्चाच्या 50% किंवा खालीलप्रमाणे कमाल अनुदान देण्यात येते –

क्र. फळबागेची मशीनरी अनुदानाची कमाल रक्कम
1 पोटॅटो प्लान्टर/डीगरसाठी 30000.00
2 लसूण/कांदा प्लान्टर/डीगरसाठी 30000/-
3 ट्रॅक्टर माऊंटेड ऐगेब्लास्टर स्प्रेयरसाठी 75,000/-
4 पॉवर ऑपरेटेड प्रुनिग मशीनसाठी 20000/-
5 फॉगिंग मशीनसाठी 10000/-
6 मल्च लेइंग मशीनसाठी 30000/-
7 पॉवर टिलरसाठी 75,000
8 पॉवर वीडरसाठी 50,000/-
9 ट्रॅक्टर विथ रोटाव्हेटरसाठी 1,50,000/-
10 कांदा/लसूण मार्करसाठी 500/-
11 पोस्ट होल डीगरसाठी 50,000/-
12 ट्री प्रुनरसाठी 45,000/-
13 प्लांट हेज ट्रिगरसाठी 35,000/-
14 मिस्ट ब्लोअरसाठी 30,000/-
15 पॉवर स्प्रे पम्पसाठी 25,000/-

अर्ज करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी आणि वरिष्ठ उद्यान विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

http://www.mphorticulture.gov.in/schemes.php

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Time for Fertilization in Garlic

लसूण पिकास खत देण्याची वेळ:-

  1. शेताची मशागत करतेवेळी
  2. लावणी करताना
  3. लावणीनंतर 20-30 दिवसांनंतर
  4. लावणीनंतर 30-45 दिवसांनंतर
  5. लावणींनंतर 45-60 दिवसांनंतर
  6. काही कारणाने खताची पूर्ण मात्रा दिली नसल्यास लवकर विरघळणारी उर्वरके 75 दिवस झाल्यावर देता येतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Subsidy for Spice Crop

मसाला पिकांसाठी अनुदान

मसाला क्षेत्र विस्तार योजना:- मसाला क्षेत्र विस्तार योजनेअंतर्गत उच्च/संकरित मसाला पिकासाठी एककी खर्चाच्या 50% बियाण्याने लागवड करण्याच्या पिकासाठी कमाल 10000/- रुपये प्रति हेक्टर आणि हळद, आले, लसूण अशा कंद/प्रकंद मसाला पिकासाठी कमाल रुपये 50,000/- प्रति हेक्टर अनुदान देण्याची तरतूद आहे. योजनेनुसार एका शेतकर्‍यास 0.25 हेक्टर ते 2 हेक्टर साठी लाभ देता येईल. सर्व वर्गातील शेतकरी लाभ घेऊ शकतात. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी आणि वरिष्ठ उद्यान विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

http://www.mphorticulture.gov.in/schemes.php

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Thrips control in Garlic

लसूणच्या पिकातील थ्रिप्सचे (फुलकिड्यांचे) नियंत्रण

थ्रिप्स :- ही कीड खूप लहान पिवळ्या किंवा डाट काळ्या रंगाची असते आणि ती पानांवर पांढरे डाग पाडते. ती पानातील रस शोषते.
नियंत्रण :- प्रोफेनोफोस @ 400 मिली /एकर किंवा फिप्रोनिल 5% एससी @ 400 मिली प्रति एकर किंवा एमामेक्टीन बेंजोएट 80-100 ग्रॅम/एकर किंवा स्पिनोसेड @ 75 मिली/ एकर फवारावे. फवारणी करताना सिलिकॉन आधारित सोल्वंटमध्ये मिसळून करावी आणि जमिनीत मिसळून फिप्रोनिल 0.03% GR @ 8 किलो प्रति एकर किंवा फोरेट 10 G @ 8 किलो प्रति एकर द्यावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Subsidy for vegetable production

भाजीपाला उत्पादनासाठी अनुदान

भाजीपाल्याखालील क्षेत्र विस्तार योजना:- भाजीपाल्याखालील क्षेत्र विस्तार योजनेअंतर्गत प्रगत/संकरित भाजीपाल्याच्या पिकासाठी एककी खर्चाच्या 50%, बियाण्याच्या लागवडीसाठी जास्तीतजास्त 10000/- रुपये प्रति हेक्टर आणि बटाटा, आळू अशा कंदाच्या पिकासाठी जास्तीतजास्त रुपये 30,000/- प्रति हेक्टर अनुदान देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. योजनेनुसार शेतकर्‍यास .25 हेक्टरपासून 2 हेक्टरपर्यन्त लाभ देता येतो. सर्व वर्गातील शेतकरी लाभ घेऊ शकतात. अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी आणि वरिष्ठ उद्यान विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

http://www.mphorticulture.gov.in/schemes.php

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient Management in Pea

मटारमधील पोषक तत्वांचे व्यवस्थापन

मटारमधील पोषक तत्वांचे व्यवस्थापन:-

पेरणीच्या वेळी 30 किलो नायट्रोजन प्रति हेक्टर एवढी आधारभूत मात्रा सुरुवातीच्या वाढीस गती देण्यासाठी पुरेशी असते. नायट्रोजनच्या अधिक मात्रेने ग्रंथींच्या स्थिरीकरणावर वाईट परिणाम होतो. फॉस्फरसच्या वापराने पिकाला लाभ होतो कारण तो मुळात ग्रंथी बनणे वाढवून नायट्रोजन निर्धारण करण्यास पोषक ठरतो. त्यामुळे मटारचे उत्पादन आणि गुणवत्ता यात वाढ होते. रोपांची उगवणी आणि नायट्रोजन निर्धारण क्षमता वाढवण्यास पोटाश उर्वरकांचादेखील फायदा होतो.

सर्वसामान्य शिफारसी:-

उर्वरकांच्या वापराची सर्वसामान्य शिफारस पुढील बाबींवर अवलंबून असते –

  • मृदेची उर्वरकता आणि देण्यात येणार्‍या कार्बनिक खते/ शेणखताची मात्रा
  • सिंचनाची परिस्थिती:- पावसाळी की सिंचित
  • पावसाळी पिकांना उर्वरकांची मात्रा अर्धी दिली जाते.

किती मात्रा द्यावी, केव्हा द्यावी –

  • मटारच्या भरघोस उत्पादनासाठी दर एकरी 10 किलोग्रॅम यूरिया, 50 किलोग्रॅम डी.ए.पी, 15 किलोग्रॅम म्यूरेट ऑफ  पोटाश आणि 6 किलोग्रॅम सल्फर 90% डब्लू.जी. देतात.
  • शेताच्या मशागतीच्या वेळी यूरियाची अर्धी मात्रा आणि डी.ए.पी, म्यूरेट ऑफ पोटाश आणि सल्फरची पूर्ण मात्रा देतात. युरियाची उरलेली मात्रा दोन वेळा पाणी देताना द्यावी.

Source: IIVR, VARANASI and Handbook Of Agriculture

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Role of Calcium in Onion

कांद्यातील कॅल्शियमची भूमिका

कॅल्शियम हे कांद्यासाठी महत्वाचे पोषक तत्व आहे आणि त्याची पिकाचे उत्पादन आणि गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका असते. कॅल्शियममुळे मुळे धरण्यास गती मिळते आणि कोशिकांचा विस्तार वाढतो. त्यामुळे रोपांची ऊंची वाढते. ते काळी कूज (ब्लैक रॉट) आणि थंडीच्या विरोधात प्रतिकारक्षमता वाढवते. कांद्यात कॅल्शियमची योग्य मात्रा असणे उत्पादन, गुणवत्ता आणि साठवण क्षमतेसाठी चांगले असते. कॅल्शियमची मात्रा 10 किलोग्रॅम/ हेक्टर एवढी किंवा मातीच्या परीक्षण अहवालानुसार देण्याची शिफारस आहे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share