Major Diseases and Their Control Measures of Wheat

गव्हावरील प्रमुख रोग आणि त्यांचे नियंत्रण:-

गव्हावरील रोगांपैकी तांबेरा (रस्ट) हा प्रमुख रोग आहे. तांबेरा रोग पुढील तीन प्रकारचा असतो:  पिवळा तांबेरा, करडा तांबेरा आणि काळा तांबेरा.

पिवळा तांबेरा:- हा रोग पकसीनिया स्ट्रीफोर्मियस नावाच्या बुरशीमुळे होतो. ही बुरशी नारंगी-पिवळ्या रंगाच्या बीजाणुद्वारे निरोगी शेतात पसरते. हा तांबेरा पानांच्या शिरांच्या लांबील समांतर पट्ट्यांमध्ये विकसित होऊन पानावर लहान बारीक डाग पडतात. हळूहळू तो पानाच्या दोन्ही बाजूंवर पसरतो.

अनुकूल परिस्थिती:- हा रोग अधिक थंड आणि दमट हवामानात 10-15° से.ग्रे. तापमान असताना पसरतो.  यामध्ये पानावरील पावडरी डाग 10-14 दिवसात फुटतात आणि हवा, पाऊस, सिंचन अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे संक्रमण होते. त्याने गव्हाच्या उत्पादनात जवळपास 25% हानी होते.

करडा तांबेरा:- हा रोग पकसीनिया ट्रीटीसीनिया नावाच्या बुरशीने होतो. ही बुरशी पानांच्या वरील बाजूवर सुरू होऊन खोडांवर पसरते आणि लाल-नारंगी रंगाचे डाग पाडते. हे डाग 1.5 एम.एम. आकाराचे अंडाकृती असतात.

अनुकूल परिस्थिती:- 15 -20° से.ग्रे. तापमान असताना या रोगाचा फैलाव होतो. त्याचे बीजाणु हवा, पाऊस, सिंचन अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे संक्रमण करतात. त्याची लक्षणे 10-14 दिवसात आढळून येतात.

काळा तांबेरा:- हा रोग पकसीनिया ग्रेमिनिस नावाच्या बुरशीमुळे होतो. हा रोग बाजरीच्या पिकाचीही हानी करतो. ही बुरशी रोपाची पाने आणि खोडांवर लांब, अंडाकृती आकाराचे लालसर करडे डाग पाडते. काही दिवसात हे डाग फुटतात आणि त्यातून भुकटी निघते. ती हवा, पाऊस, सिंचन अशा वेगवेगळ्या माध्यमातून संक्रमित होते आणि पिकाला हानी पोहोचवते.

अनुकूल परिस्थिती:- काळा तांबेरा इतर तांबेर्‍याच्या तुलनेत अधिक तापमानात म्हणजे 18 -30° से.ग्रे.वर फैलावतो. बियाण्यातील आर्द्रता (दव, पाऊस किंवा सिंचन) याची त्यासाठी आवश्यकता असते आणि सुमारे सहा तासात त्याचे पिकात संक्रमण होते. संक्रमणानंतर 10-20 दिवसांनी डाग दिसू लागतात.

नियंत्रण:-

  • तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी पीक चक्र अवलंबावे.
  • रोग प्रतिरोधक वाणे पेरावीत.
  • बियाणे किंवा उर्वरक यांनी संस्करण केल्यास पेरणीपासून चार आठवडे तांबेरा नियंत्रित होतो. त्यानंतर औषध देता येते.
  • एकच सक्रिय घटक असलेली बुरशीनाशके पुन्हा पुन्हा वापरू नये.
  • कासुगामीसिन 5%+कॉपर ऑक्सीक्लोरिड 45% डब्लू.पी. 320 ग्रॅम/एकर किंवा प्रोपिकोनाज़ोल 25% ई.सी.240 ग्रॅम/एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate and Soil Condition For Bottle Gourd

दुषी भोपळ्याच्या लागवडीसाठी उत्तम वातावरण आणि माती:-

वातावरण –

  • दुधी भोपळा ही उपोष्णकटिबंधीय भाजी असून तिच्या वेगवान विकास आणि भरघोस उत्पादनासाठी उष्ण आणि आर्द्र हवामान आवश्यक असते.
  • अर्द्ध शुष्क परिस्थिती या पिकास उपयुक्त असते.
  • त्याच्या योग्य विकासासाठी रात्रीचे आणि दिवसाचे तापमान क्रमशः 18-22 °C आणि 30-35 °C उत्तम असते.
  • 25-30°C तापमानात बीज अंकुरण लवकर आणि उत्तम होते.
  • योग्य तापमानात घेतलेल्या पिकात मादी फुले आणि फळे-फुले/ रोप यांचे प्रमाण उच्च असते.

माती –

  • दुषी भोपळ्याची लागवड सर्व प्रकारच्या मातीत होते पण खूप आम्ल, लवणीय आणि क्षारीय मातीत हे पीक घेऊ नये.
  • बलुई ही रेताड लोम माती मिट्टी दुषी भोपळ्यासाठी उत्तम असते.
  • पाण्याचा चांगला निचरा होणारी कार्बनिक माती दुषी भोपळ्याच्या लागवडीसाठी उत्तम असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

“Neemastra” A Bio-Insecticides

“नीमास्त्र”: एक जैविक कीटकनाशक

नीमास्त्र – हे निंबोणीपासून बनवलेले अत्यंत प्रभावी जैविक कीटकनाशक आहे. ते रसशोषक कीड, अळी इत्यादि कीटकांचे नियंत्रण करण्यासाठी वापरतात.

नीमास्त्र बनवण्याची पद्धत –

सर्वप्रथम प्लॅस्टिकच्या भांड्यात 5 किलोग्रॅम निंबोणीची पानांची चटनी आणि 5 किलोग्रॅम निंबोणीची फळे वाटून आणि कुटून घ्यावीत आणि त्यात 5 लीटर गोमूत्र आणि 1 किलोग्रॅम गाईचे शेण घालावे. या सर्व सामग्रीला दांडक्याने चांगले ढवळून जाळीदार कापडाने झाकून ठेवावे. हे मिश्रण 48 तासात तयार होते. या मिश्रणाला 100 ली. पाण्यात मिसळून त्याचा कीटकनाशक म्हणून वापर करता येतो.

फायदे –

  • मनुष्य, वातावरण आणि पिकास शून्य हानी.
  • जैविक विघटन होत असल्याने जमिनीची संरचना सुधारते.
  • हे केवळ हानिकारक किडीला मारते. त्याने उपयुक्त किड्यांना हानी होत नाही.
  • शेतकर्‍यासाठी अत्यंत उपयुक्त आणि स्वस्त उपाययोजना.
  • जैविक कीटकनाशकांच्या वापराने पिकात कीड/ रोगाबाबत सहनशीलता निर्माण होत नाही. या उलट रासायनिक कीटकनाशकांच्या वापराने किदिनमध्ये प्रतिरोधक क्षमता उत्पन्न होत आहे. त्यामुळे ती निरुपयोगी ठरत आहेत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Happy Dussehara

दसरा-विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!:-

दसरा हा मराठी शब्द दशहरा या मूळ संस्कृत शब्दाचे रूप आहे. दशहरा याचा अर्थ अहंकार, क्रूरता, अन्याय, हवस, क्रोध, लालच, गर्व, ईष्या, व्यसन, स्वार्थ अशा दहा दोषांवर मात करणे. विजयादशमीचा अर्थ या दहा दोषांवर विजय मिळवणे असा होतो.

ग्रामोफोन टीमकडून दसरा विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!|

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Happy Navratri

नवरात्रीच्या शुभेच्छा!

कुम कुम भरे क़दमों से आए माँ दुर्गा आपके द्वार,

सुख संपत्ति मिले आपको अपार,

ग्रामोफोन टीमच्या वतीने नवरात्रीच्या शुभेच्छा!

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Caring of Dairy Cow after Calving

दुभत्या गायींची व्याल्यानंतरची देखभाल:-

दुभत्या गायींसाठी व्याल्यानंतरचा कालावधी सर्वात महत्वाचा असतो.

या कालावधीत जनावरांच्या शरीरात कोलोस्ट्रम आणि दूध उत्पन्न करण्यासाठी ऊर्जा आणि पोषक तत्वांची अत्यधिक आवश्यकता असते. त्याच वेळी त्यांची भूक कमी झालेली असल्याने त्यांच्या शरीरातील ऊर्जेची पातळी घसरते आणि पोषक तत्वांचा अभाव जाणवतो.

त्यामुळे उत्तम आरोग्य, दुधाचे उत्पादन आणि प्रजननासाठी व्याल्यानंतर लगेचच गायींची उत्तम देखभाल करणे महत्वाचे असते. व्याल्यानंतर लगेचच गायींची देखभाल करण्यात पुढील बाबी महत्वाचा असतात –

  • व्याल्यानंतर गायी दुधाचा ताप आणि केटोसिससारख्या रोगांपासून मुक्त राहतील यासाठी त्यांची नीट देखभाल करावी.

(थरथर, कान झटकणे, सुस्ती, सुकलेले आचळ, शरीराचे तापमान कमी होणे, झोपून राहणे, सूज आणि कमी सावध असणे ही दुधाच्या तापाची काही लक्षणे आहेत.)

(मूत्र आणि श्वासाला गोड वास येणे, ताप, वजनातील घट इत्यादि केटोसिसची लक्षणे आहेत.)

  • नुकत्याच व्यालेल्या गाईला आजारी गायींच्या बरोबर ठेवू नये.
  • स्तन शोथ रोखण्यासाठी स्वच्छता राखावी. (नुकत्याच व्यालेल्या गायींना स्तन शोथ होण्याची शक्यता अधिक असते.)
  • नुकत्याच व्यालेल्या गाईला तणावमुक्त ठेवावे. अधिक उष्णता/ थंडी आणि पावसापासून त्यांचे संरक्षण करावे. कुत्री, मांजरे आणि इतर सर्व आक्रमक जनावरांना नुकत्याच व्यालेल्या गाईपासून दूर ठेवावे.
  • नुकत्याच व्यालेल्या गाईला पोषक तत्वे मिळण्यासाठी आणि भूक वाढवण्यासाठी ताज्या खाद्यासह पोषक आहार द्यावा.
  • जनावर आपला संपूर्ण आहार खात आहे, अर्धवट टाकत नाही आणि नेहमीप्रमाणे रवंथ करत आहे याकडे लक्ष द्यावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Blight and Foot Rot in Pea Crop

मटारमधील अंगक्षय आणि बुड कुजव्या रोगाचे नियंत्रण:-

लक्षणे:-

  • पानांवर गडद करड्या कडा असलेले काळपट ते करड्या रंगाचे गोल डाग आढळून येतात.
  • खोडावरील डाग लांबट, दाबलेले आणि काळपट जांभळ्या रंगाचे असतात.
  • हे डाग एकमेकात मिसळतात आणि संपूर्ण खोडावर पसरतात. अशा प्रकारे खोड कमकुवत होते.
  • फळांवरील डाग लाल किंवा करड्या रंगाचे आणि अनियमित आकाराचे असतात.

नियंत्रण:-

  • निरोगी बियाणे वापरावे आणि पेरणीपुर्वी कार्बनडेझिम+मॅन्कोझेब@ 250 ग्रॅम/ क्विन्टल मात्रेने बीज संस्करण करावे.
  • रोगग्रस्त रोपांवर फुलोरा येण्यापूर्वी मॅन्कोझेब @ 400 ग्रॅम/ एकर फवारावे आणि 10-15 दिवसांनंतर पुन्हा फवारणी करावी.
  • रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत.
  • पाण्याच्या निचार्‍याची योग्य ती व्यवस्था करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient Management in Wheat

गव्हाच्या पिकासाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन

गव्हाच्या पिकासाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन:- गव्हाच्या पिकासाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असते. मातीतील पोषक तत्वांबाबत माहिती मिळवण्यासाठी मृदा परीक्षण आवश्यक असते. मृदा परीक्षणाच्या आधारे पोषक तत्वांच्या व्यवस्थापनासाठी रणनीती बनवली जाते –

  • उत्तम प्रतीचे शेणखत किंवा कम्पोस्ट खत 15-20 टन/हे. या प्रमाणात दर 2 वर्षांनी मातीत मिसळावे.
  • शेणखत घातल्याने मातीची संरचना सुधारते आणि उत्पादन वाढते.
  • गव्हाच्या पिकासाठी 88  कि.ग्रॅ. यूरिया, 160 कि.ग्रॅ, सिंगल सुपर फॉस्फेट आणि 40 कि.ग्रॅ. म्युरेट ऑफ़ पोटाश प्रति एकर या प्रमाणात वापरावे.
  • युरियाचा वापर तीन भागात पुढीलप्रमाणे करावा:
    1.)  44  कि.ग्रॅ. यूरियाची मात्रा पेरणीच्या वेळी द्यावी.
    2.) उरलेल्यापैकी 22 कि. ग्रॅ. पहिल्या सिंचनापूर्वी द्यावी.
    3.) उरलेली 22 कि. ग्रॅ. दुसर्‍या सिंचनाच्या वेळी द्यावी.
  • सिंचन अंशता असल्यास आणि जास्तीत जास्त दोन वेळा सिंचन होणार असल्यास यूरिया @ 175, सुपर सिंगल फॉस्फेट@ 250 आणि म्युरेट ऑफ़ पोटाश @ 35-40 कि. ग्रॅ प्रति हेक्टर द्यावे.
    सिंचन उपलब्ध नसल्यास नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटाशची पूर्ण मात्र द्यावी.
  • गव्हाची पेरणी मध्य डिसेंबरमध्ये करणार असल्यास नत्राची मात्रा 25 टक्के घटवावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share