Control of Jassids in Brinjal

वांग्याच्या पिकातील तुडतूड्यांचे नियंत्रण:-

  • शिशु आणि वाढ झालेल्या किड्यांचा रंग हिरवा असतो आणि आकार लहान असतो.
  • शिशु आणि वाढ झालेले किडे पानांच्या खालील बाजूच्या आवरणातून रस शोषतात.
  • रोगग्रस्त झाडांची पाने वरील बाजूस मुडपतात. नंतर ती पिवळी पडतात आणि त्यांच्यावर जळाल्यासारखे डाग पडतात.
  • तुडतूड्यांमुळे लघुपर्णसारखे मायक्रोप्लाज्मा रोग आणि करडेपणासारखे विषाणुजन्य रोगांचे संक्रमण होते.
  • या किडीचा तीव्र हल्ला झाल्यास रोपावर कमी फळे लागतात.

नियंत्रण:-

  • तुडतूड्यांचा उपद्रव रोखण्यासाठी रोपणानंतर 20 दिवसांनी अ‍ॅसीटामिप्रिड 20% WP @ 80 ग्रॅम/एकर किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8%@ 80 मिली/ एकरच्या मात्रेच्या द्रावणाची फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>