Chilli Nutrient Management

मिरचीच्या पिकासाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन

  • सामान्यतः शेतकरी बंधु 15 जून ते 15 जुलै या काळात मिरचीचे रोपण करतात.
  • रोपणापूर्वी शेताच्या मशागतीच्या वेळी FYM @10 टन/ एकर या प्रमाणात मिसळावे.
  • रोपणापूर्वी डीएपी 50 किलो + म्यूरेट ऑफ पोटास 50 किलो + माईक्रोन्यूट्रियंट 1 किलो/ एकर + सल्फर 90% 6 किलो मातीत मिसळावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nursery Preparation Method for CauliFlower

फुलकोबीची नर्सरी तयार करण्याची पद्धत

  • बियाणे वाफ्यात पेरतात. वाफ्यांची ऊंची 10 ते 15 सेंटीमीटर आणि आकार 3*6 मीटर असावा.
  • दोन वाफ्यात 70 सेंटीमीटर अंतर ठेवल्याने अंतरक्रिया सहज करता येतात.
  • नर्सरीतील वाफ्यातील माती भुसभुशीत आणि समतल असावी.
  • नर्सरी वाफे बनवताना शेणखत 8-10 किलो/ वर्ग मीटर या प्रमाणात मिसळावे.
  • भारी मातीत उंच वाफे बनवून पाणी तुंबण्यावर उपाय करता येतो.
  • आद्र गलन रोगाने रोपांना होणार्‍या हानीला रोखण्यासाठी कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी चे 15-20 ग्रॅम /10 लि. पाण्यात मिश्रण बनवून मातीत मिसळावे किंवा थायोफिनेट मिथाइल 0.5 ग्रॅम/ वर्ग मीटर या प्रमाणात वापरुन ड्रेंचिंग करावे.
  • रोपांना किडीपासून वाचवण्यासाठी थायोमेथोक्सम 0.3 ग्रॅम/ वर्ग मीटर या प्रमाणात नर्सरी तयार करताना  घालावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable varieties of Cauliflower

फुलकोबीची उपयुक्त वाणे

चांगली वाणे फक्त भरघोस उत्पादनच देत नाहीत तर शेतकर्‍यांच्या अनेक समस्या देखील कमी करतात. उदाहरणार्थ, एखादे वाण एखाद्या रोगाबाबत टॉलरंट किंवा सहिष्णु असल्यास शेतकर्‍याचा औषधे आणि मजुरीवरचा खर्च कमी होतो. फुलकोबीच्या वाणाची निवड करताना ते लागवडीच्या हंगामासाठी अनुकूल आहे याकडे लक्ष द्यावे. ही बाब ध्यानात ठेवून आत्ता लागवडीस उपयुक्त असलेल्या दोन वाणांबाबतची माहिती येथे देण्यात येत आहे:

इंप्रुव्हड करीना

हे लवकर तयार होणारे वाण आहे. ते बाजारात विक्रीसाठी उपयुक्त असते. त्याच्या पेरणीसाठी योग्य वेळ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आहे. याचे पीक रोपणानंतर 55 – 60 दिवसात तयार होते. त्याची पाने वाळलेली असतात आणि फुलांचे वजन सुमारे 1.2 किलो असते. त्यांचा रंग पांढरा आणि आकार घुमटासारखा असतो. या वाणाला सूर्यप्रकाश उपयुक्त असतो.

सुपर फर्स्ट क्रॉप:-

ही मध्यम तापमान आणि हवामान असताना पेरणीसाठी उपयुक्त वाण आहे. त्याची लागवड मार्च ते ऑगस्ट या काळात करता येते. हे हिवाळ्यात कडक होते आणि मध्यम तापमानातही भरघोस फुलांचे उत्पादन देते. फूल पांढर्‍या रंगाचे आणि संघटित असते आणि त्याचे वजन सुमारे 800 ग्रॅम ते 1 किलो असते. फुले सुमारे 60 दिवसात तयार होतात. दूर अंतरावरच्या बाजारात पोहोचवण्यासाठी हे वाण उत्तम समजले जाते. ते काळ्या कुजवा रोगासाठी सहिष्णू असते हे त्याचे वैशिष्ट्य असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to protect Brinjal from Fruit Borer

वांग्यातील फळ पोखरणार्‍या किडीपासून बचाव

  • या किडीद्वारे रोपणानंतर लगेचपासून शेवटच्या तोडणी पर्यंत नुकसान होते.
  • तिच्यामुळे उत्पादनात 70% पर्यंत घट येते.
  • उष्ण वातावरणात फळ आणि खोड पोखरणार्‍या अळ्यांच्या संख्येत जास्त वाढ होते.
  • सुरुवातीच्या अवस्थेत छोटी गुलाबी अळी फांद्या आणि खोडात भोक पाडून आत प्रवेश करतात. त्यामुळे रोपाच्या फांद्या सुकतात.
  • नंतरच्या अवस्थेत अळ्या फळाला भोक पाडून आत शिरतात आणि गर खातात.

नियंत्रण:-

  • फेरोमॉन ट्रॅप @ 5/ एकर या प्रमाणात बसवावेत.
  • एकाच शेतात सतत वांग्याचे पीक घेऊ नये. पीक चक्र अवलंबावे.
  • भोक पाडलेल्या फळांना तोडून नष्ट करावे.
  • किडीच्या नियंत्रणासाठी रोपणानंतर 35 दिवसांनी दर पंधरवड्याने सायपरमेथ्रिन 10% ईसी @ 300 मिली/ एकर किंवा लैम्ब्डा सायहलोथ्रिन 5% ईसी @ 200-250 मिली/ एकर या प्रमाणात फवारावे.
  • कीट के प्रभावशाली रोकथाम के लिये कीटनाशक के छिड़काव के  पूर्व छेंद किये गये फलों की तुड़ाई कर लें।

Share

Practice at time of transplanting for chilli crop

मिरचीच्या रोपणाची उपयुक्त पद्धत

  • पावसावर अवलंबून असलेल्या भागात दोन ओळींमधील अंतर 60 से.मी. आणि दोन रोपांमधील अंतर 15 से.मी. ठेवावे.
  • सिंचित भागातील हलक्या जमिनीत दोन ओळींमधील अंतर 75 से.मी. आणि दोन रोपातील अंतर 45 से.मी. ठेवावे.
  • सिंचित भागातील जड मातीत दोन ओळींमधील आणि दोन रोपातील अंतर 60-60 से.मी. ठेवावे.
  • एका जागी 2-3 रोपे लावावीत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to Control Stem Borer in Sweet Corn

स्वीट कॉर्नमधील खोड पोखरकिडयाचे नियंत्रण कसे करावे

  • ही स्वीट कॉर्नमधील प्रमुख आणि पिकाला मोठी हानी करणारी कीड आहे.
  • खोड पोखरकिडयाची अळी मक्याच्या खोडात शिरून ते पोखरते.
  • ही अळी खोडात शिरून उती खाते. त्यामुळे रोपास पाणी आणि पोषक तत्वे मिळत नाहीत. रोप हळूहळू पिवळे पडून सुकते आणि शेवटी मरते.

नियंत्रण –

  • पिकाच्या पेरणीनंतर 15 -20 दिवसांनी फोरेट 10% जी 4 किलो/ एकर किंवा फिप्रोनिल 0.3% जी 5 किलो/ एकर 50 किलो मातीत मिसळून जमिनीतून द्यावे आणि त्याचवेळी सिंचन करावे.
  • दाणेदार कीटकनाशक वापरले नसल्यास पुढीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी:
    • पेरणीनंतर 20 दिवसांनी बायफेंथ्रीन 10% EC 200 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरावे किंवा
    • पेरणीनंतर 20 दिवसांनी फिप्रोनिल 5% SC 500 मिली प्रति एकर या प्रमाणात फवारावे किंवा
    • करटाप हायड्रोक्लोराईड 50% SP 400 ग्राम/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

कोणत्या आधारावर कापसाचे वाण निवडावे

कोणत्या आधारावर कापसाचे वाण निवडावे

मातीच्या प्रकाराच्या आधारे:-

  • हलक्या ते मध्यम मातीसाठी:- नीयो  (रासी)
  • जड मातीसाठी:- Rch 659 BG II, मॅग्ना (रासी), मोक्ष बीजी-II (आदित्य), सुपर कॉट Bt-II (प्रभात)

सिंचनाच्या आधारे:-

  • पावसावर अवलंबून:- जादु (कावेरी), मोक्ष बीजी 2 (आदित्य)
  • अर्ध सिंचित: – नीयो, मॅग्ना (रासी), मनीमेकर (कावेरी), सुपर कॉट Bt- II (प्रभात)
  • सिंचित: – Rch 659 BG II (रासी), जादू (कावेरी)

रोपांच्या वाढण्याच्या स्वभावाच्या आधारे: –

  • सरळ वाढणार्‍या रोपांची वाणे:  जादु (कावेरी), मोक्ष बीजी-II (आदित्य), भक्ति (नुजिवीडु)
  • फसरणार्‍या रोपांची वाणे:-  Rch 659 BG-II (रासी), सुपर कॉट Bt- II (प्रभात)

पिकाच्या अवधिच्या आधारे:

  • लवकर तयार होणारी वाणे (140-150 दिवस)
    • Rch 659 BG-II (रासी)
    • भक्ति (नुजिवीडु)
    • सुपर कॉट Bt- II (प्रभात)

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Basis for selection of Cotton variety:-

How to get more profit from cotton crop

कापसाच्या पिकाला फायदेशीर कसे बनवावे

कापसाचे पीक आंतरपिकासाठी उत्तम समजले जाते कारण त्याची वाढ सुरूवातीला हळूहळू होते आणि ते पीक शेतात दीर्घकाळ राहते. आंतरपिकाचा मुख्य उद्देश्य अतिरिक्त पिकाबरोबरच सर्वाधिक उत्पादन मिळवणे असा असतो. सामान्यता कापसाच्या पिकाबरोबर कडधान्ये केली जातात.

सिंचनाखालील भागातील आंतरपिके:-

  • कापूस + मिरची (1: 1)
  • कापूस + कांदा (1: 5)
  • कापूस + सोयाबीन (1: 2)
  • कापूस + सनहीम (हिरव्या चार्‍यासाठी) (1: 2)

पावसावर अवलंबून असलेल्या भागातील आंतरपिके:-

  • कापूस + कांदा (1: 5)
  • कापूस + मिरची (1: 1)
  • कापूस + शेंगदाणा(1: 3)
  • कापूस + मूग (1: 3)
  • कापूस + सोयाबीन (1: 3)
  • कापूस + मटार (1: 2)

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation Management for chilli crop

मिरचीच्या पिकासाठी सिंचन व्यवस्थापन

  • रोपणानंतर लगेचच आणि यूरिया देण्यापूर्वी सिंचन करावे.
  • चांगली वाढ आणि फुले व फळांच्या विकासासाठी वेळेवर सिंचन करणे आवश्यक आहे.
  • रोपणापूर्वी एक महिना एका हलक्या सिंचनाची आवश्यकता असते.
  • हलकी माती असल्यास उन्हाळ्यात दिवसाआड सिंचन करावे.
  • सिंचांनाच्या वेळी किंवा पाऊस सुरू असताना कोणत्याही परिस्थितीत शेतात पाणी साठणार नाही यासाठी पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था केली आहे याकडे विशेष लक्ष द्या. पाण्याचा उत्तम निचरा या पिकासाठी अत्यावश्यक आहे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Spray Schedule in nursery

भरघोस उत्पादनासाठी मिरचीच्या नर्सरीचे व्यवस्थापन कसे करावे 

भरघोस उत्पादनासाठी नर्सरी चांगली असणे अत्यावश्यक असते. नर्सरीत रोपे निरोगी आणि आरोग्यपूर्ण असतील तरच पुनर्रोपणानंतर शेतात मिरचीची रोपे मजबूत राहतील. त्यामुळे नर्सरीत रोपांची योग्य देखभाल करण्याकडे आवर्जून लक्ष पुरवावे. उत्तम रोपे तयार करण्यासाठी मिरचीच्या नर्सरीत पुढीलप्रमाणे तीन वेळा  फवारणी करण्याचा ग्रामोफोनचा सल्ला आहे:

  • पहिली फवारणी – थायोमेथोक्साम 25% डब्ल्यूजी 8 ग्रॅम/पम्प + अ‍ॅमिनो अॅसिड 20 मिली/पम्प (पानातून रस शोषणार्‍या किडीच्या नियंत्रणात सहाय्यक)
  • दुसरी फवारणी – मेटलॅक्सिल-M (मेफानोक्सम) 4% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी 30 ग्रॅम/पम्प + 19:19:19 @ 100 ग्रॅम/पम्प (गलन रोगाच्या नियंत्रणात सहाय्यक)
  • तिसरी फवारणी – थायोमेथोक्साम 25% डब्ल्यूजी 8-10 ग्रॅम/पम्प + हयूमिक अॅसिड 10-15 ग्रॅम/पम्प
  • वेळोवेळी अन्य किडी आणि रोगाची लागण झाल्यास त्याचे नियंत्रण करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share