Contro of Diamondback Moth (DBM) in Cabbage

पानकोबीवरील अळीचे नियंत्रण:-

ओळखणे:-

  • अंडी पिवळट पांढरी आणि फिकट हिरव्या रंगाची असतात.
  • अळ्या 7-12 मिमी. लांब, फिकट पिवळ्या-हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यांच्या संपूर्ण शरीरावर बारीक रोम असतात.
  • वाढ झालेले किडे 8-10 मिमी. लांब, मातकट करड्या रंगाचे आणि आतील कडा पिवळ्या असलेले फिकट गव्हाळ रंगाचे पंखाचे असतात.
  • वाढ झालेल्या माद्या पानांवर झुबक्याने अंडी घालतात.
  • त्यांच्या पंखांवर पांढर्‍या रेषा असतात आणि ते दुमडल्यावर हिर्‍यासारखा आकार दिसतो.

नुकसान:-

  • लहान, सडपातळ हिरव्या अळ्या अंड्यातून निघाल्यावर पानांच्या बाहेरील आवरण खाऊन त्यांना भोके पाडतात.
  • हल्ला तीव्र असल्यास पानांची फक्त जाळी शिल्लक राहते.

नियंत्रण:- डायमंड बॅक मॉथचा उपद्रव रोखण्यासाठी बोल्ड मोहरीची लागवड  कोबीच्या प्रत्येक 25 ओळींनंतर मोहरीच्या दोन ओळी अशा प्रमाणात करावी. प्रोफेनोफ़ोस (50 र्इ.सी.) ची 3 मि.ली. प्रति लीटर पाणी मात्रा फवारावी. स्पाइनोसेड (25 एस. सी.) 0.5 मि.ली. प्रति ली. किंवा ईंडोक्साकार्ब 1.5 मि.ली. प्रति ली पाणी मात्रेची फवारणी पेरणीनंतर 25 दिवसांनी आणि पुन्हा त्यानंतर 15 दिवसांनी अशी दोन वेळा करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>