Control of Semilooper In Soyabean:-

सोयाबीनवरील सेमीलुपर अळी (कूबडी अळी):-

  • सोयाबीनमध्ये ही अळी बरेच नुकसान करते.
  • पिकाच्या कोणत्याही अवस्थेत तिचा उपद्रव होऊ शकतो पण फुलोरा येण्याच्या आणि शेंगा विकसित होण्याच्या वेळी धोका अधिक असतो.
  • ती पानांवर भोके पाडते आणि पानांना कडेने खाते.

नियंत्रण :-

  • उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी.
  • क्विनालफास 25% EC @ 400 मिली. किंवा प्रोफेनोफॉस 50% EC @ 400 मिली किंवा स्पीनोसेड 45% @ 60 मिली. प्रति एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of White fly in Soybean

सोयाबीनमधील पांढर्‍या माशीचे नियंत्रण:-

  • शिशु आणि वाढ झालेले कीटक पानांच्या खालील बाजूने रस शोषतात आणि चिकटा सोडतात. त्याने प्रकाश संश्लेषणात अडथळा येतो.
  • पाने रोगग्रस्त दिसतात, सुटी मोल्डने झाकली जाते. ही कीड पाने मुडपणार्‍या रोगाचे विषाणू आणि पिवळ्या शिरा रोगाच्या विषाणूसी वाहक आहे.
  • नियंत्रण:- पिवळ्या रंगाचे चिकट सापळे शेतात ठिकठिकाणी बसवावेत.
  • प्रोफेनोफॉस @ 50 मिली./पम्प किंवा थायमेथोक्जोम @ 5 ग्रॅम/पम्प किंवा एसीटामीप्रिड @ 15 ग्रॅम/ पम्प या मात्रेची फवारणी 3-4 वेळा 10 दिवसांच्या अंतराने करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Tobacco caterpillar in Soybean

सोयाबीनमधील तंबाखू अळीचे नियंत्रण

हानीची लक्षणे:  अळ्या पानांमधील क्लोरोफिल खातात. क्लोरोफिल खाललेल्या पानांवर पांढरट पिवळ्या सुरकुत्या दिसतात.
नियंत्रण

  • उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी.
  • मान्सूनच्या आगमनापूर्वी पेरणी करू नये.
  • वियाण्याचे प्रमाण (70-100 किलो/ हेक्टर) राखावे.
  • रोगग्रस्त भागांना एकत्र करून नष्ट करावे.
  • प्रत्येक हेक्टरमागे 5 फेरोमॉन ट्रॅप लावावेत. त्यामुळे वाढ झालेल्या किडीच्या येण्याबाबत कळते.
  • प्रोफेनोफॉस  50% ईसी @ 400 मिलीलीटर / एकर किंवा क़्वीनाल्फास 25% ईसी  @ 400 मिलीलीटर / एकर फवारावे.
  • उपद्रव जास्त असल्यास एमामेक्टीन बेंज़ोएट @ 200 ग्रॅम प्रति हेक्टर.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Integrated Management of Pink Bollworm in Cotton

कापसावरील गुलाबी बोंडआळीचे सुसंघटित नियंत्रण

कापसावरील गुलाबी बोंडअळीचे सुसंघटित नियंत्रण असे करावे

  • कोणत्याही परिस्थितीत कापसाचे पीक जानेवारी महिन्यापूर्वी काढून टाकावे.
  • गुलाबी बोंडअळीच्या पतंगांच्या हालचालींना प्रतिबंध करण्यासाठी पेरणीनंतर 45 दिवसांनी शेतात प्रत्येक हेक्टरात 5 फेरोमॉन ट्रॅप बसवावेत.
  • गुलाबी बोंडअळीचे अस्तित्व लक्षात येण्यासाठी कळ्या आणि फुलोरा येण्याच्या वेळी पिकाचे निरीक्षण करावे आणि फुलातले किंवा कळ्यांत अस्तित्व आहे का यासाठी बारकाईने पहावे.
  • मान्यताप्राप्त आणि शिफारस केलेली कीटकनाशकेच वापरावीत.
  • कीटनाशकांच्या मिश्रणाची फवारणी करावी.
  • पांढर्‍या अळीचे संक्रमण टाळण्यासाठी नोव्हेंबर महिन्यापूर्वी कोणतेच सिंथेटिक पायरेथ्रोइड वापरू नये.
  • पिकाच्या वेगवेगळ्या झाडांवरून 20 हिरवी बोंडे तोडून त्यात गुलाबी बोंडअळी आहे का याचे आणि हानीचे निरिक्षण करावे.
  • स्वच्छ आणि कीटकांची लागण झालेली बोंडे निवडून वेगळी काढावीत.

गुलाबी बोंडअळीच्या प्रतिबंधासाठी शिफारस करण्यात येत असलेली कीटकनाशके :-

महिना कीटनाशक मात्रा  प्रति 10 ली .पानी *
सप्टेंबर क्विनॉलफॉस 25 EC

थियोडिकार्ब 75 WP

20 मिली

20 ग्राम

ऑक्टोबर क्लोरोपायरीफास 20 EC

थियोडिकार्ब 75 WP

25 मिली

20 ग्रॅम

नोव्हेंबर फेनवेलेरेट 20 EC

सायपरमेथ्रिन 25 EC

10 मिली

10 मिली

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Girdle beetle in Soybean

सोयाबीनवरील मेखला कीड (गर्डल बीटल):- या किडीला रिंग कटर असेही म्हणतात. या किडीचा सोयाबीनच्या उत्पादनावर सर्वात जास्त परिणाम होतो.

हानीची लक्षणे:-

  • खोडाला आतून लार्वा खातो आणि त्यात भोक पडते.
  • संक्रमित भागातील रोपाच्या पानांना पोषक तत्वे मिळत नाहीत आणि ती वाळतात.
  • नंतर रोपजमिनीपासून सुमारे 15 ते 25 सेमी अंतरावर तुटते.

नियंत्रण:-

  • उन्हाळ्यात शेतात खोल नांगरणी करावी.
  • मका किंवा ज्वारीबरोबर सोयाबीन लावू नये.
  • पीक चक्राचा वापर करावा.
  • अतिरिक्त नायट्रोजन उर्वरकांपासून सावध रहावे.
  • 10 दिवसातून किमान एक वेळा रोपाच्या रोपग्रस्त भागांना काढून टाकावे आणि त्यांना खताच्या खड्ड्यात गाडावे.

प्रतिबंध:-

  • पेरणीच्या वेळी फोरेट 10 G @ 10 किलो / हेक्टर किंवा कार्बोफूरॉन 3 G @ 30 किलोग्रॅम/ हेक्टर घालावे.
  • क्विनालफॉस 25% EC किंवा ट्रायजोफॉस 40% EC @ 3 मिली / लीटर पाण्याची फवारणी पीक 30-35 दिवसांची असताना करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Red Pumpkin Bettle in Watermelon

कलिंगडावरील लाल किड्यांचे नियंत्रण:-

  • अंड्यातून निघालेले ग्रब मुळे, भूमिगत भाग आणि जमिनीच्या संपर्कात येणारी फळे खातात.
  • ग्रसित मुळे आणि भूमिगत भागावर त्यानंतर मृतजीवी बुरशी हल्ला करते. त्यामुळे अपरिपक्व फळे आणि वेली सुकतात.
  • ग्रसित फळे वापरास निरुपयोगी असतात.
  • बीटल पाने खाऊन त्यात भोके पाडतात.
  • लहान असताना बीटलचा हल्ला झाल्यास ते कोवळी पाने खाऊन हानी करतात. त्याने रोपे मरतात.

नियंत्रण:-

  • खोल नांगरणी केल्याने जमिनीतील प्यूपा किंवा ग्रब उघडे पडतात आणि सूर्यकिरणांनी मरतात.
  • बियाण्याच्या अंकुरणानंतर रोपाच्या सर्व बाजूंनी जमिनीत कारटाप हायड्रोक्लोराईड 3 G चे दाणे पेरावेत.
  • बीटल एकत्र करून नष्ट करावेत.
  • सायपरमेथ्रिन (25 र्इ.सी.) 1 मि.ली. प्रति लीटर पाणी + डायमिथोएट 30% ईसी. 2  मि.ली. प्रति लीटर पाणी या मिश्रणाची फवारणी करावी किंवा कार्बारिल 50% WP 3 ग्राम प्रति ली पाण्यात मिसळून फवारावे. पहिली फवारणी रोपणानंतर 15 दिवसांनी आणि दुसरी त्यानंतर 7 दिवसांनी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Aphids on Bottle Gourd

दुधीभोपळ्यावरील मावा रोगाचे नियंत्रण

रोगग्रस्त भाग पिवळा पडून आकसतो आणि त्याची सुरळी होते. हल्ला तीव्र असल्यास पाने सुकतात आणि हळूहळू रोप वाळते.

माव्याचा हल्ला लक्षात येताच डायमिथोएट 30 मिली. प्रति पम्प किंवा इमीड़ाक्लोरप्रीड 17.8% SL 10 मिली. प्रति पम्प दर 15 दिवसांनी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Aphids on Sponge Gourd and Ridge Gourd

घोसाळे आणि दोडक्यातील मावा रोगाचे नियंत्रण:-

रोगग्रस्त भाग पिवळा पडून आकसतो आणि त्याची सुरळी होते. हल्ला तीव्र असल्यास पाने सुकतात आणि हळूहळू रोप वाळते.

माव्याचा हल्ला लक्षात येताच डायमिथोएट 30 मिली. प्रति पम्प किंवा इमीड़ाक्लोरप्रीड 17.8% SL 10 मिली. प्रति पम्प दर 15 दिवसांनी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of White fly in Okra

भेंडीवरील पांढर्‍या माशीचे नियंत्रण:-

  • कोवळ्या तसेच वाढ झालेल्या पानांच्या खालील भागातून रस शोषतात आणि त्यांनी निर्माण केलेल्या गोड चिकट्यामुळे प्रकाश संश्लेषणात अडथळा येतो.
  • पाने रोगग्रस्त दिसतात. आणि सुटी मोल्डने झाकली जाते. ही कीड पिवळा शिरांचे मोज़ेक विषाणू आणि पान मुरड रोगाची वाहक असते.
  • नियंत्रण:- पिवळ्या रंगाचे चिकट कागद शेतात ठिकठिकाणी लावावेत.
  • डायमिथोएट 30 मिली./पम्प किंवा थायमेथोक्जोम 5 ग्रॅम/पम्प किंवा एसीटामीप्रिड 15 ग्रॅम/ पम्प ची फवारणी 10 दिवसांच्या अंतराने 4-5 वेळा करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Thrips

थ्रिप्सचे (फुलकिड्यांचे) नियंत्रण

फुलकिडे रोपांमधील रस शोषतात त्यामुळे रोपे पिवळी पडून कमज़ोर होतात आणि उत्पादन घटते. त्यांच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफोस 400 मिली. प्रति एकर किंवा फिप्रोनिल 400 मिली. प्रति एकर किंवा थायमेथोक्झोम 100 ग्रॅम प्रति एकर दर 10 दिवसांनी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share