घोसाळ्यामधील फळ माशी:-
हानी:-
- अळ्या (लार्वा) फळांना भोक पाडून त्यातील रस शोषतात.
- ग्रासलेले फळ खराब होऊन गळून पडते.
- माशी शक्यतो कोवळ्या पानांवर अंडी घालते.
- माशी अंडी देण्याच्या भागणे फळांना भोक पाडून त्यांची हानी करते. त्या भोकांमधून फळाचा रस गळतो.
- शेवटी भोक पडलेले फळ सडते.
- अळ्या फळांना भोक पाडून गर आणि कोवळ्या बिया खातात. त्यामुळे फळे पिकण्यापूर्वीच गळून पडतात.
नियंत्रण:-
- ग्रस्त फळांना एकत्र करून नष्ट करावे.
- अंडी देणार्या माशीच्या बंदोबस्तासाठी शेतात फेरोमॉन ट्रॅप लावावेत. या फेरोमॉन ट्रॅपमध्ये माशांना मारण्यासाठी 1% मिथाईल इजीनोल किंवा सिंत्रोनेला तेल किंवा अॅसीटिक आम्ल किंवा लॅक्टिक आम्लाचे द्रावण ठेवावे.
- परागीभवनाच्या क्रियेनंतर लगेचच विकसित होणार्या फळांना पॉलीथीन किंवा कागदाने झाकावे.
- माशांचे नियंत्रण करण्यासाठी घोसाळ्याच्या शेतात दोन रांगांमध्ये मक्याची रोपे लावावीत. मक्याची रोपे उंच असल्याने माशी त्यांच्या पानाखाली अंडी घालते.
- ज्या क्षेत्रात फळ माशीचा जास्त उपद्रव आहे तेथे मातीत कार्बारिल 10% चूर्ण मिसळावे.
- डायक्लोरोवास कीटकनाशकाची 3 मिली. प्रति ली. पाण्याची मात्रा फवारावी.
- उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमिनीतील माशांना सुप्तावस्थेत असताना नष्ट करावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share