कापसावरील कापसी ढेकणी (मीली बग) किडीचे नियंत्रण:-
- कापसी ढेकणी कापसाच्या पानाखाली वसाहत बनवून मेणचट आच्छादन तैय्यार करते.
- कापसी ढेकणी मोठ्या प्रमाणात चिकटा तैय्यार करते. त्याच्यावर काळी बुरशी तैय्यार होते.
- ग्रस्त झाडे कमजोर दिसतात आणि काळी पडतात. त्यामुळे त्यांची फलनक्षमता कमी होते.
नियंत्रण:-
- पूर्ण वर्षभर शेत तणमुक्त ठेवावे.
- शेतावर बारकाईने लक्ष ठेवावे, जेणेकरून सुरुवातीलाच किडीची लागण लक्षात येईल.
- प्रभावी नियंत्रणासाठी सुरुवातीच्या अवस्थेतच प्रतिबंधक उपाययोजना करावी.
- आवश्यकता असल्यास निंबोणी आधारित निंबोणीचे तेल @ 75 मिली प्रति पंप किंवा निंबोणीचे सत्व @ 75 मिली प्रति पम्प किंवा निंबोणीचे तेल यासारखी वनस्पतिजन्य कीटकनाशके फवारावीत.
- रासायनिक नियंत्रणासाठी डायमिथोएट @ 30 मिली प्रति पम्प किंवा प्रोफेनोफॉस @ 40 मिली प्रति पम्प किंवा ब्यूप्रोफेज़िन @ 50 मिली प्रति पम्प फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share