मिरचीवरील थ्रिप्सचे (फुलकिडा) नियंत्रण:-
लक्षणे:-
- रोगग्रस्त पाने वरच्या बाजूला मुडपली जातात.
- कळ्या नाजुक होऊन गळून पडतात.
- सुरुवातीच्या अवस्थेत पिकाची वाढ आणि फुलांची संख्या घटते.
नियंत्रण:-
- ज्वारीचे पीक घेतल्यावर लगेचच मिरचीचे पीक घेऊ नये.
- मिरची आणि कांद्याची मिश्रपिके घेऊ नयेत.
- इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यूएस @ 12 ग्रॅम/ किग्रा वापरुन बीजसंस्करण करावे.
- कार्बोफुरन 3% जी @ 33 किलो / हेक्टर किंवा फोरेट 10% जी @ 10 किलो / हेक्टर मातीत मिसळावे.
- पुढीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी:
कीटकनाशक | मात्रा |
इमिडाक्लोप्रिड 17.8 % एस.एल. | 100 मिलि/एकर |
डायमिथोएट 30 % ईसी | 300 मिलि/ एकर |
इमामेक्टिन बेन्झोएट 5 % एसजी | 100 ग्रॅम/ एकर |
प्रोफेनोफोस 50% ईसी | 500 मिली/ एकर |
फिप्रोनिल 5 % एससी | 500 मिलि/ एकर |
स्पिनोसेड 45 % एससी | 70 मिली/ एकर |
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share