Soil Preparation and Sowing Time for Wheat

गव्हाच्या पिकासाठी शेताची मशागत आणि पेरणीसाठी सुयोग्य वेळ:-

  • उन्हाळ्यात नांगरणी करावी.
  • तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी.
  • 2 -3 वेळा कल्टिव्हेटर वापरुन शेताला सपाट करावे.
  • पेरणीसाठी सुयोग्य वेळ
  • असिंचित:- ऑक्टोबर महिन्याचा मध्य ते नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा
  • अर्धसिंचित:- नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा
  • सिंचित (वेळेवर):- नोव्हेंबर महिन्याचा दुसरा पंधरवडा
  • सिंचित (उशिरा):- डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Requirement of Irrigations in Pea

मटारच्या पिकासाठी आवश्यक सिंचन:-

  • जमीन कोरडी असल्यास उत्तम अंकुरण होण्यासाठी पेरणीपुर्वी सिंचन करावे.
  • जमिनीचा प्रकार आणि हंगामानुसार 10 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
  • ओंब्या येण्याच्या वेळी ओल कमी पडल्यास उत्पादन घटते. त्यामुळे त्यावेळी सिंचन करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate and soil for Cabbage Cultivation

पानकोबीसाठी उपयुक्त हवामान आणि जमीन:-

  • पानकोबीची वाणे तापमानासाठी अति संवेदनशील आहेत. चांगल्या अंकुरणासाठी 10°C ते 21 °C तापमान उपयुक्त असते.
  • रोपे आणि पानकोबीच्या गड्ड्यांच्या विकासासाठी 15°C ते 21°C तापमान अनुकूल असते. 10°C हून कमी तापमानात रोपांचा विकास कमी होतो आणि गड्डेही उशिरा तयार होतात.
  • जमीन हलकी आणि दोमट असणे, पाण्याचा निचरा चांगला होत असणे आणि पी. एच. स्तर 5.5 ते 6.8 असणे पानकोबीसाठी उपयुक्त असते.
  • लवकरच्या हंगामातील वाणांसाठी हलकी माती आणि मध्य अवधीच्या वाणांसाठी व उशीराच्या वाणांसाठी भारी दोमट माती उपयुक्त असते.
  • लवणीय जमिनीत बुरशी आणि जिवाणूंचा फैलाव होऊन रोग पसरतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Critical stage of irrigation in Potato

बटाट्याच्या सिंचनातील महत्वाची अवस्था:-

  • बटाट्याच्या पिकाच्या हंगामाच्या दरम्यान मातीत सर्वाधिक ओल राखण्यासाठी उच्चस्तरीय व्यवस्थापन आवश्यक असते.
  • वाढीच्या पुढील अवस्थात पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असते:-
  • 1). अंकुरणाची वेळ
  • 2). कंद बनण्याची वेळ
  • 3). कंद वाढण्याची वेळ
  • 4). पिकाच्या पक्वतेची वेळ
  • 5). काढणीपूर्वी

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Sowing time, Planting and Seed Rate of Garlic

लसूणच्या लागवडीसाठी योग्य वेळ, लागवड करण्याची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण:-

  • मध्य भारतात पाकळ्यांचे रोपण सप्टेंबर-नोव्हेंबर या काळात केले जाते.
  • लसूणच्या पाकळ्या गाठींपासुन वेगळ्या करण्याचे काम पेरणीच्या वेळीच करावे.
  • पाकळ्यांचे साल निघाल्यास त्या पेरणीस उपयुक्त राहत नाहीत.
  • ज्यांची प्रत्येक पाकळी कडक आणि सुट्टी आहे असा कडक मानेचा गड्डा पेरणीस उपयुक्त असतो.
  • मोठ्या पाकळ्या (1.5 ग्रॅमहून मोठ्या) निवडाव्यात. छोट्या, रोगग्रस्त आणि क्षतिग्रस्त पाकळ्या काढाव्यात.
  • लसूणच्या बियाण्याचे प्रमाण 400-500 किलो प्रति हे.
  • निवडलेल्या पाकळ्या 2 सेमी. खोल 15 X 10 सेमी. अंतरावर पेराव्यात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nursery bed preparation for Tomato

टोमॅटोसाठी नर्सरी बनवणे:-

  • वाफ्यांची लांबी 3 मी., रुंदी 0.6 मी. आणि ऊंची 10-15 से.मी. असावी.
  • दोन नर्सरी वाफ्यात 70 से.मी. अंतर असावे. त्यामुळे नर्सरीत निंदणी, खुरपणी, सिंचन करणे इत्यादि अंतर्गत क्रिया सहजपणे करणे शक्य होईल.
  • नर्सरी वाफ्यांचा पृष्ठभाग भुसभुशीत, सपाट, उंच असावा आणि त्यात पाण्याच्या निचर्‍याची योग्य व्यवस्था असावी.
  • नर्सरी वाफ्यात पेरणी करण्यापुर्वी मॅन्कोझेब वापरुन मृदा संस्करण करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Spacing and Seed Rate of Pea

मटारच्या वेलींमधील अंतर आणि बियाण्याचे प्रमाण:-

  • मटारच्या दोन ओळींमधील अंतर 30 से.मी. आणि दोन वेलींमधील अंतर 10 से.मी. राहील अशा प्रकारे पेरणी करावी.
  • बियाणे 2-3 से.मी. खोल पेरावे.
  • सुमारे 100 कि.ग्रा. बियाणे/हेक्टर हे प्रमाण पुरेसे असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Jassids in Brinjal

वांग्याच्या पिकातील तुडतूड्यांचे नियंत्रण:-

  • शिशु आणि वाढ झालेल्या किड्यांचा रंग हिरवा असतो आणि आकार लहान असतो.
  • शिशु आणि वाढ झालेले किडे पानांच्या खालील बाजूच्या आवरणातून रस शोषतात.
  • रोगग्रस्त झाडांची पाने वरील बाजूस मुडपतात. नंतर ती पिवळी पडतात आणि त्यांच्यावर जळाल्यासारखे डाग पडतात.
  • तुडतूड्यांमुळे लघुपर्णसारखे मायक्रोप्लाज्मा रोग आणि करडेपणासारखे विषाणुजन्य रोगांचे संक्रमण होते.
  • या किडीचा तीव्र हल्ला झाल्यास रोपावर कमी फळे लागतात.

नियंत्रण:-

  • तुडतूड्यांचा उपद्रव रोखण्यासाठी रोपणानंतर 20 दिवसांनी अ‍ॅसीटामिप्रिड 20% WP @ 80 ग्रॅम/एकर किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8%@ 80 मिली/ एकरच्या मात्रेच्या द्रावणाची फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Happy Ganesh Chaturthi

गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपकी खुशियाँ

गणेश जी की सूंड की तरह लम्बी हो

आपकी ज़िंदगी

उनके पेट की तरह बड़ी हो

और जीवन का हर

पल लडडु की तरह मीठा हो,

ग्रामोफोन टीम कडून गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Late Blight in Tomato

टोमॅटोच्या उशिरा अवस्थेतील अंगक्षय रोगाचे नियंत्रण:-

  • या रोगाची लागण रोपाच्या कोणत्याही अवस्थेत पानांवर होते.
  • करडे आणि काळपट जांभळे डाग पर्णवृन्त, कोंब, फळे आणि खोडाच्या कोणत्याही भागावर पडतात.
  • संक्रमणाच्या अंतिम अवस्थेत रोप मरते.
  • हा रोग कमी तापमान आणि अत्यधिक ओल असल्यास पानांच्या खालील बाजूला दिसतो.

नियंत्रण:-

  • व्लीचिंग पावडरची 15 किलोग्रॅम प्रति हेक्टर मात्रा फवारावी.
  • बुरशीनाशक मॅन्कोझेब 75% WP @ 400 ग्रॅम/एकर किंवा प्रोपिनेब 70% WP @ 400 ग्रॅम/ एकर किंवा क्लोरोथॉलोनिल 75% WP @ 300 ग्रॅम/एकरच्या मात्रेचा वापर करावा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share