Soil preparation for sweet corn

स्वीट कॉर्नसाठी (अमेरिकन मक्याचे कणीस) शेताची मशागत

  • उन्हाळ्यात नांगरणी करावी.
  • तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी.
  • 2 -3 वेळा कल्टीव्हेटर वापरुन जमीनीची समपातळी करावी.
  • शेवटच्या नांगरणीच्या वेळी FYM @ 3 -4 टन/ एकर वापरावे.
  • त्यानंतर 75 सेमी अंतरावर ओळीने फरे आणि सर्‍या पाडाव्यात. सर्व प्रकारच्या स्वीट कॉर्नसाठी सीडबेड तयार करणे आणि सीड हँडलिंग महत्वपूर्ण असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of leaf curl disease in tomato

Share

Soil preparation for cauliflower

फुलकोबीच्या पिकासाठी जमिनीची मशागत

    • पलटी नांगरणाने 1 ते दोन वेळा 2 फुलीची नांगरणी केल्यानंतर 3 ते 4 वेळा देशी नांगराने नांगरणी करावी.
    • अधिक उत्पादनासाठी चांगल्या वाणाची निवड करावी.
    • नांगरणीच्या वेळी एकरी 20 ते 25 टन शेणखत मातीत मिसळावे.
    • शेतात सूत्रकृमीचा (नेमाटोड) उपद्रव असल्यास एकरी 10 किलो कार्बोफ्यूरान कीटकनाशक फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Selection of seed in moong

मुगाच्या पिकासाठी बियाण्याची निवड

  • निरोगी, उत्तम गुणवत्ता असलेली बियाणी निवडावीत.
  • भरघोस उत्पादनासाठी चांगली वाणे निवडावीत.
  • बियाणे रोगमुक्त असावे.
  • बियाण्याची अंकुरण क्षमता चांगली असावी.
  • शेतकर्‍यांनी अंकुरणाचा अवधि, पोषक तत्वांची आवश्यकता याचीही पडताळणी करावी.
  • रोगग्रस्त बियाण्याचा वापर करण्यापूर्वी बुरशीनाशक आणि कीटकनाशक वापरुन बीजसंस्करण करावे आणि त्यानंतरच बियाणे पेरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Maturity index in muskmelon

खरबूजाच्या फळांच्या परिपक्वतेचे लक्षण

  • सामान्यता सुमारे 110 दिवसांनी फळे परिपक्व होतात.
  • फळे पिकण्याचा कालावधी वाणाच्या निवडीवरही अवलंबून असते.
  • परिपक्व झालेले फळ थोड्या दबावाने किंवा झटक्याने सहजपणे वेळापासून वेगळे होते. ।
  • याला फुल स्लिप स्टेज म्हणतात.
  • खरबूजाच्या काही भारतीय जातींमध्ये परिपक्वतेच्या वेळी सालीवर हिरव्या रेषा उमटतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to increase number of flowers in Okra

भेंडीतील फुलोर्‍याच्या वृद्धीसाठी सुचना

  • भेंडीच्या पिकासाठी फुलोरा येण्याची अवस्था खूप महत्वपूर्ण असते.
  • भेंडीच्या पिकाची फुलोर्‍याची अवस्था पेरणीनंतर 40-45 दिवसांनी सुरू होते.
  • खालीलपैकी काही उत्पादने वापरुन भेंडीच्या पिकातील फुलांची संख्या वाढवणे शक्य असते.
  • होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली./एकर या प्रमाणात फवारावे.
  • समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 मिली./ एकर या प्रमाणात वापरावे.
  • सूक्ष्म पोषक तत्वांची 300 ग्रॅम/एकर या प्रमाणात फवारणी करावी.
  • 2 ग्रॅम/एकर या प्रमाणात जिब्रेलिक एसिड देखील फवारता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Zinc solubilizing bacteria in snake gourd

पडवळ/ काकडीच्या पिकासाठी झिंक विरघळवणार्‍या जिवाणूंचे महत्त्व

झिंक विरघळवणारे जिवाणू नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले लाभडायक जिवाणू असतात. ते कार्बनिक अॅसिड वापरुन जमिनीतील अकार्बनिक झिंकला विरघळणारे बनवून रोपांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे रोपांच्या वाढीला मदत होते.

  • या जिवाणूंचा वापर विशेषता झिंकच्या अभावामुळे होणार्‍या तांदळातील खैरा रोगासारखे रोग आणि टोमॅटो, कांदा, गहू, भेंडी इत्यादींमध्ये केला जातो.
  • त्यांच्यामुळे पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढते.
  • ते हार्मोन्स गतिविधिना चालना देतात.
  • रोपे आणि मुळांच्या वाढीस ते चालना देतात.
  • ते प्रकाश संश्लेषण वाढवते.
  • मातीत हे जिवाणू असल्याने मातीची उर्वरकता वाढते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Pinching in watermelon

कलिंगडाची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाययोजना/ कलिंगडाच्या पिकातील छाटणी

  • कलिंगडाच्या पिकातील वेलींची प्रमाणाबाहेर वाढ रोखण्यासाठी आणि फळांच्या चांगल्या विकासासाठी कलिंगडाच्या वेलींवर ही प्रक्रिया केली जाते.
  • या प्रक्रियेमधे जेव्हा वेळीवर पुरेशी फळे लागतात तेव्हा वेलींचे शेंडे खुडले जातात. त्यामुळे वेलींची वाढ थांबते.
  • शेंडे खुडण्याने वेलाची वाढ थांबते आणि फळांच्या आकार आणि गुणवत्तेत सुधारणा होते.
  • एकाच वेलीवर जास्त फळे लगडलेली असल्यास लहान आणि कमजोर फळांना काढावे. त्यामुळे मुख्य फळांची वाढ चांगली होते.
  • अनावश्यक फांद्या काढल्याने कलिंगडांचे पूर्ण पोषण मिळते आणि ती लवकर मोठी होतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Boron deficiency symptoms and control in watermelon

कलिंगडाच्या पिकातील बोरॉनच्या अभावाची लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना

  • कोवळी पाने आकसलेली आणि सर्वसामान्य पानांहून लहान असतात.
  • पानांवर पिवळी झाक येते. ती टोकांच्या जवळ जास्त गडद असते.
  • नवीन कोवळ्या पानांची टोके सुकलेली दिसतात.
  • खोडाचा पृष्ठभाग फाटू लागतो आणि वेलांची लांबी कमी होते.
  • वेलीचा विकास थांबतो आणि ती खुरटलेली राहते.
  • वेलीचा शेंडा मरतो आणि फुले व फळांच्या संख्येत घट येते.
  • फळातील पोकळपणा हे बोरॉनच्या अभावाचे मुख्य लक्षण आहे.
  • शेतात प्रमाणाबाहेर ओल असल्यास किंवा pH अधिक असल्यास सहसा असे होते.

नियंत्रण:-

  • बोरॉनयुक्त कॅल्शियम नायट्रेट 25 किलो प्रति एकर या प्रमाणात मातीतून द्यावे.
  • फॉस्फरस विरघळवणारे जिवाणू 4 किलो प्रति एकर या प्रमाणात द्यावेत.
  • बोरॉन 20% @ 200 ग्रॅम प्रति एकर फुलोरा येण्याच्या अवस्थेत दोन वेळा फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control measures of aphids in Watermelon

कलिंगडावरील माव्याचे नियंत्रण

  • ग्रस्त वेली उपटून नष्ट कराव्यात. त्यामुळे कीड फैलावणार नाही.
  • माव्याचा हल्ला झाल्याहे आढळून येताच अॅसीफेट 75 % एसपी @ 300- 400 ग्रॅम/ एकर किंवा इमिडाक्लोप्रिड 17% एस एल @ 100 मिली प्रति एकर किंवा अॅसीटामाप्रिड 20 % एसपी @ 150 ग्रॅम  प्रति एकरचे मिश्रण बनवून 15 दिवसांच्या अंतराने फवारून किडीचे प्रभावी नियंत्रण करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share