कलिंगडाच्या पिकातील बोरॉनच्या अभावाची लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना
- कोवळी पाने आकसलेली आणि सर्वसामान्य पानांहून लहान असतात.
- पानांवर पिवळी झाक येते. ती टोकांच्या जवळ जास्त गडद असते.
- नवीन कोवळ्या पानांची टोके सुकलेली दिसतात.
- खोडाचा पृष्ठभाग फाटू लागतो आणि वेलांची लांबी कमी होते.
- वेलीचा विकास थांबतो आणि ती खुरटलेली राहते.
- वेलीचा शेंडा मरतो आणि फुले व फळांच्या संख्येत घट येते.
- फळातील पोकळपणा हे बोरॉनच्या अभावाचे मुख्य लक्षण आहे.
- शेतात प्रमाणाबाहेर ओल असल्यास किंवा pH अधिक असल्यास सहसा असे होते.
नियंत्रण:-
- बोरॉनयुक्त कॅल्शियम नायट्रेट 25 किलो प्रति एकर या प्रमाणात मातीतून द्यावे.
- फॉस्फरस विरघळवणारे जिवाणू 4 किलो प्रति एकर या प्रमाणात द्यावेत.
- बोरॉन 20% @ 200 ग्रॅम प्रति एकर फुलोरा येण्याच्या अवस्थेत दोन वेळा फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share