Stem gall fly management in snake gourd

काकडीवरील खोड गाद माशीचे नियंत्रण

  • अळ्या रोपांच्या आत शिरून दूरस्थ खोडांमध्ये भोक पाडतात आणि गाठ बनवतात.
  • वाढ झालेल्या माशा लहान गडद राखाडी डांसासारख्या असतात.
  • पुढीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी केल्याने प्रभावी नियंत्रण करता येते:
  • डाइमेथोएट 30% ईसी 250 मिली/ एकर
  • डायक्लोरवास 76% ईसी @ 250 मिली/ एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Hormone application in snake gourd for more yield

पडवळ/ लांब काकडीचे उत्पादन वाढवण्यासाठी हार्मोन्सचा वापर

  • सहा ते आठ पानांच्या अवस्थेत ईथीलीन किंवा जिब्रालिक अॅसिडचे 0.25-1 मिली प्रति 10 लीटर पाणी या प्रमाणात मिश्रण बनवून वेलांवर आणि फुलांवर फवारल्याने मादी फुलांची संख्या वाढेल आणि फळांची संख्या दुप्पट होईल. याचा परिणाम 80 दिवसपर्यंत टिकतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of fruit fly in bottle gourd

दुधी भोपळ्यातील फळ माशीचे नियंत्रण

  • अळ्या (लार्वा) फळात भोक पाडून रस शोषतात.
  • ग्रस्त फळे खराब होऊन गळतात.
  • माशी अंडी घालण्याच्या भागाने फळात भोक पाडून त्यांना हानी पोहोचवते. या भोकांमधून रस गळताना दिसतो.
  • ग्रस्त फळांना एकत्र करून नष्ट करावे.
  • अंडी घालणार्‍या माशीच्या प्रतिबंधासाठी शेतात प्रकाशित सापळे किंवा फेरोमोन ट्रॅप लावावेत. या सापळ्यात माशा मारण्यासाठी 1% मिथाइल इंजीनाँल किंवा सिनट्रोनेला तेल किंवा अॅसीटिक आम्ल किंवा लॅक्टीक अॅसिडचे मिश्रण बनवून ठेवावे.
  • परगणाच्या क्रियेनंतर लगेचच तयाऱ होणार्‍या फळांना पाँलीथीन किंवा कागदात गुंडाळावे.
  • या माश्यांचे नियंत्रण करण्यासाठी दुधी भोपळ्याच्या शेतात ओळींच्या मध्ये मक्याची लागवड करावी. या रोपांची ऊंची जास्त असल्याने माशा त्याच्या पानाखाली अंडी घालतात.
  • ज्या भागात फळ माशीचा उपद्रव जास्त असेल तेथे कार्बारिल 10 प्रतिशत भुकटी मातीत मिसळावी.
  • उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमिनीतील माशांचा सुप्तावस्थेत नायनाट करावा.
  • डाइक्लोरोवोस 76% ईसी 250 ते 500 मि.ली./ एकर या प्रमाणात फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Staking in Snake gourd

पडवळ/ वाळवंटी काकडीच्या वेलांना आधार देणे

  • पडवळ/ वाळवंटी काकडीचे पीक खूप वेगाने वाढते. बियाण्याच्या पेरणीनंतर दोन आठवड्यांनी वेली वेगाने वाढू लागतात.
  • जाळीदार मंडपाच्या वापराने फळांच्या आकारात आणि उत्पादनात वाढ होते तसेच फळे कमी सडतात आणि फळांची तोडणी आणि कीटकनाशकांची फवारणी सहजपणे करता येते.
  • मंडप 1.2- 1.8 मीटर उंच असावा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land Preparation in Green gram (Moong)

मुगाच्या पिकासाठी जमिनीची मशागत

  • खरीपाच्या पिकासाठी पलटी नांगराने एकदा खोल नांगरणी करावी. पाऊस सुरू होताच 2-3 वेळा देशी नांगराने किंवा कल्टिव्हेटरने नांगरणी करून शेत तणमुक्त करावे आणि वखर वापरुन सपाट करावे.
  • वाळवीपासून बचाव करण्यासाठी क्लोरपायरीफॉस 1.5 % डी.पी. चूर्ण 10-15 कि.ग्रॅ/एकर या प्रमाणात मशागत करताना मातीत मिसळावे.
  • मुगाच्या उन्हाळी शेतीत रब्बी पिकाच्या कापणीनंतर लगेचच शेतात नांगरणी करून 4-5 दिवसांनंतर वेचणी करावी.
  • वेचणीनंतर 2-3 वेळा देशी नांगर किंवा कल्टिव्हेटरने नांगरणी करून आणि वखर चालवून शेताला सपाट आणि मातीला भुसभुशीत करावे. त्यामुळे त्यातील ओल संरक्षित होईल आणि चांगले बीज अंकुरण होईल.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of sucking pest in Bottle gourd by neem-based products

निंबोणी आधारित उत्पादनांनी दुधी भोपळ्यातील रस शोषणार्‍या किडीचे नियंत्रण

  • तेलकिडे (थ्रिप्स), मावा, शल्य कीड (स्केल्स), तुडतुडे आणि श्वेत माशी अशा लहान, मुलायम शरीराच्या किडे आणि माश्यांच्या विरोधात निंबोणीचे तेल सर्वाधिक प्रभावी असते.
  • पेरणीच्या वेळी आणि 30 दिवसांनी निंबोणीची पेंड @ 40 किग्रॅ प्रति एकर या प्रमाणात मातीत मिसळावी.
  • 10 दिवसांच्या अंतराने PNSPE (4%) किंवा निंबोणी/ पोंगामिया साबणाच्या द्रावणाची (8-10 ग्रॅम/ लीटर) फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Advantages of N fixation bacteria in okra

नायट्रोजन उपलब्ध करून देणार्‍या (एन फिक्सेशन) जिवाणुंचे भेंडीच्या पिकासाठी लाभ

  • एझोटोबॅक्टर हे स्वतंत्रजीवी नायट्रोजन स्थिरिकरण आणि वायुविजन करणारे जिवाणू असतात.
  • हे जिवाणू वातावरणातील नायट्रोजनला सतत जमिनीत जमा करत राहतात.
  • त्यांच्या वापराने प्रत्येक पिकासाठीच्या नायट्रोजन उर्वरकाच्या आवश्यकतेत  20 % ते 25 % पर्यंत घट होते.
  • ते बीज अंकुरणाची टक्केवारी वाढवतात.
  • खोडे आणि मुळांची संख्या आणि लांबी वाढवण्यास ते मदत करतात.
  • त्यांच्या वापराने रोगांची शक्यता कमी होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of gummy stem blight in bottle gourd

दुधी भोपळ्यातील खोडावरील चिकटा आणि मर रोगाचे (गम्मी स्टेम ब्लाईट) नियंत्रण

  • या रोगात वेलाची मुळे वगळता इतर सर्व भागावर लागण होते.
  • पानांच्या कडांवर पिवळेपणा/ हिरवेपणाचा अभाव आणि कडांवर पाण्याने भरलेले डाग पारणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे असतात.
  • या रोगाने ग्रस्त वेलांच्या खोडांवर व्रण होतात आणि त्यातून लाल-करड्या, काळ्या रंगाचा द्राव पाझरू लागतो. खोडांवर राखाडी-काळया रंगाचे डाग पडतात आणि नंतर व्रणात मिसळतात.
  • दुधी भोपळ्याच्या बियांवर मध्यम राखाडी, काळे डाग पडतात.

नियंत्रण:

  • निरोगी बियाणे वापरावे.
  • पुनर्रोपणाचे निरीक्षण करावे आणि संक्रमित रोपांना उपटून शेताबाहेर फेकावे.
  • हल्ल्याची लक्षणे आढळताच क्लोरोथालोनिल 75% WP @ 350 ग्रॅम/ एकर किंवा टेबुकोनाज़ोल 25.9% EC @ 200 मिली/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of aphid in bitter gourd

कारल्यातील माव्याचे नियंत्रण

  • ग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत. त्यामुळे किडीचा प्रसार होणार नाही.
  • माव्याचा हल्ला झाल्याचे लक्षात येताच अॅसीफेट 75 % एसपी @ 300- 400 ग्रॅम/ एकर किंवा इमिडाक्लोप्रिड 17% एस एल @ 100 मिली प्रति एकर किंवा अॅसीटामाप्रिड 20 % एसपी @ 150 ग्रॅम  प्रति एकर मिश्रण दर पंधरा दिवसांनी फवारून त्याचे प्रभावी नियंत्रण करता येईल.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Advantages of PSB in Tomato

टोमॅटोच्या पिकासाठी फॉस्फरस विरघळवणार्‍या जिवाणूचे महत्व

  • हे जिवाणू फॉस्फरससह मॅंगनीज, मॅग्नेशियम, आयर्न, मॉलिब्डेनम, झिंक आणि कॉपर यासारख्या सूक्ष्म पोषक तत्वांना देखील रोपांना पुरवण्यास सहाय्य करतात.
  • ते मुळांचा वेगाने करण्यास सहाय्य करतात. त्यामुळे रोपाला पाणी आणि पोषक तत्वे सहजपणे मिळतात.
  • पीएसबी काही मॅलिक, सक्सिनिक, टार्टरिक अॅसिड आणि अॅसिटीक अॅसिड यासारखी काही खास जैविक आम्ले बनवतात. ही आम्ले फॉस्फरसची उपलब्धता वाढवतात.
  • ते रोग आणि शुष्कतेबाबतची प्रतिरोधकता वाढवतात.
  • त्यांचा वापर करण्याने फॉस्फेटिक उर्वरकांची आवश्यकतेत 25 -30% घट होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share