Control of Red Pumpkin Bettle in Watermelon

कलिंगडावरील लाल किड्यांचे नियंत्रण:-

  • अंड्यातून निघालेले ग्रब मुळे, भूमिगत भाग आणि जमिनीच्या संपर्कात येणारी फळे खातात.
  • ग्रसित मुळे आणि भूमिगत भागावर त्यानंतर मृतजीवी बुरशी हल्ला करते. त्यामुळे अपरिपक्व फळे आणि वेली सुकतात.
  • ग्रसित फळे वापरास निरुपयोगी असतात.
  • बीटल पाने खाऊन त्यात भोके पाडतात.
  • लहान असताना बीटलचा हल्ला झाल्यास ते कोवळी पाने खाऊन हानी करतात. त्याने रोपे मरतात.

नियंत्रण:-

  • खोल नांगरणी केल्याने जमिनीतील प्यूपा किंवा ग्रब उघडे पडतात आणि सूर्यकिरणांनी मरतात.
  • बियाण्याच्या अंकुरणानंतर रोपाच्या सर्व बाजूंनी जमिनीत कारटाप हायड्रोक्लोराईड 3 G चे दाणे पेरावेत.
  • बीटल एकत्र करून नष्ट करावेत.
  • सायपरमेथ्रिन (25 र्इ.सी.) 1 मि.ली. प्रति लीटर पाणी + डायमिथोएट 30% ईसी. 2  मि.ली. प्रति लीटर पाणी या मिश्रणाची फवारणी करावी किंवा कार्बारिल 50% WP 3 ग्राम प्रति ली पाण्यात मिसळून फवारावे. पहिली फवारणी रोपणानंतर 15 दिवसांनी आणि दुसरी त्यानंतर 7 दिवसांनी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>