Girdle beetle in Soybean

सोयाबीनवरील मेखला कीड (गर्डल बीटल):- या किडीला रिंग कटर असेही म्हणतात. या किडीचा सोयाबीनच्या उत्पादनावर सर्वात जास्त परिणाम होतो.

हानीची लक्षणे:-

  • खोडाला आतून लार्वा खातो आणि त्यात भोक पडते.
  • संक्रमित भागातील रोपाच्या पानांना पोषक तत्वे मिळत नाहीत आणि ती वाळतात.
  • नंतर रोपजमिनीपासून सुमारे 15 ते 25 सेमी अंतरावर तुटते.

नियंत्रण:-

  • उन्हाळ्यात शेतात खोल नांगरणी करावी.
  • मका किंवा ज्वारीबरोबर सोयाबीन लावू नये.
  • पीक चक्राचा वापर करावा.
  • अतिरिक्त नायट्रोजन उर्वरकांपासून सावध रहावे.
  • 10 दिवसातून किमान एक वेळा रोपाच्या रोपग्रस्त भागांना काढून टाकावे आणि त्यांना खताच्या खड्ड्यात गाडावे.

प्रतिबंध:-

  • पेरणीच्या वेळी फोरेट 10 G @ 10 किलो / हेक्टर किंवा कार्बोफूरॉन 3 G @ 30 किलोग्रॅम/ हेक्टर घालावे.
  • क्विनालफॉस 25% EC किंवा ट्रायजोफॉस 40% EC @ 3 मिली / लीटर पाण्याची फवारणी पीक 30-35 दिवसांची असताना करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>