कापसावरील गुलाबी बोंडआळीचे सुसंघटित नियंत्रण
कापसावरील गुलाबी बोंडअळीचे सुसंघटित नियंत्रण असे करावे –
- कोणत्याही परिस्थितीत कापसाचे पीक जानेवारी महिन्यापूर्वी काढून टाकावे.
- गुलाबी बोंडअळीच्या पतंगांच्या हालचालींना प्रतिबंध करण्यासाठी पेरणीनंतर 45 दिवसांनी शेतात प्रत्येक हेक्टरात 5 फेरोमॉन ट्रॅप बसवावेत.
- गुलाबी बोंडअळीचे अस्तित्व लक्षात येण्यासाठी कळ्या आणि फुलोरा येण्याच्या वेळी पिकाचे निरीक्षण करावे आणि फुलातले किंवा कळ्यांत अस्तित्व आहे का यासाठी बारकाईने पहावे.
- मान्यताप्राप्त आणि शिफारस केलेली कीटकनाशकेच वापरावीत.
- कीटनाशकांच्या मिश्रणाची फवारणी करावी.
- पांढर्या अळीचे संक्रमण टाळण्यासाठी नोव्हेंबर महिन्यापूर्वी कोणतेच सिंथेटिक पायरेथ्रोइड वापरू नये.
- पिकाच्या वेगवेगळ्या झाडांवरून 20 हिरवी बोंडे तोडून त्यात गुलाबी बोंडअळी आहे का याचे आणि हानीचे निरिक्षण करावे.
- स्वच्छ आणि कीटकांची लागण झालेली बोंडे निवडून वेगळी काढावीत.
गुलाबी बोंडअळीच्या प्रतिबंधासाठी शिफारस करण्यात येत असलेली कीटकनाशके :-
महिना | कीटनाशक | मात्रा प्रति 10 ली .पानी * |
सप्टेंबर | क्विनॉलफॉस 25 EC
थियोडिकार्ब 75 WP |
20 मिली
20 ग्राम |
ऑक्टोबर | क्लोरोपायरीफास 20 EC
थियोडिकार्ब 75 WP |
25 मिली
20 ग्रॅम |
नोव्हेंबर | फेनवेलेरेट 20 EC
सायपरमेथ्रिन 25 EC |
10 मिली
10 मिली |
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share