Control of Late Blight in Tomato

टोमॅटोच्या उशिरा अवस्थेतील अंगक्षय रोगाचे नियंत्रण:-

  • या रोगाची लागण रोपाच्या कोणत्याही अवस्थेत पानांवर होते.
  • करडे आणि काळपट जांभळे डाग पर्णवृन्त, कोंब, फळे आणि खोडाच्या कोणत्याही भागावर पडतात.
  • संक्रमणाच्या अंतिम अवस्थेत रोप मरते.
  • हा रोग कमी तापमान आणि अत्यधिक ओल असल्यास पानांच्या खालील बाजूला दिसतो.

नियंत्रण:-

  • व्लीचिंग पावडरची 15 किलोग्रॅम प्रति हेक्टर मात्रा फवारावी.
  • बुरशीनाशक मॅन्कोझेब 75% WP @ 400 ग्रॅम/एकर किंवा प्रोपिनेब 70% WP @ 400 ग्रॅम/ एकर किंवा क्लोरोथॉलोनिल 75% WP @ 300 ग्रॅम/एकरच्या मात्रेचा वापर करावा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Anthracnose or Pod Blight in Soybean

सोयाबीनवरील में अ‍ॅन्थ्रेक्नोंज आणि शेंग कुजव्या रोगाचे नियंत्रण:

  • हा बीज आणि मृदा जनित रोग आहे.
  • सोयाबीनमध्ये फुलोरा येण्याच्या वेळी खोड, पर्णवृन्त आणि शेंगांवर लाल ते गडद करड्या रंगाचे, अनियमित आकाराचे डाग दिसू लागतात.
  • नंतर हे डाग बुरशीच्या काळ्या संरचना (एसरवुलाई) आणि टोकदार संरचनानी भरतात.
  • पानांच्या शिरा पिवळ्या-करड्या होतात, पाने मुडपतात आणि गळून पडतात. ही या रोगाची लक्षणे आहेत.

नियंत्रण:-

  • एनआरसी 7 आणि 12 यासारखी रोग प्रतिकारक वाणे वापरावीत.
  • पेरणीपुर्वी थायरम + कार्बोक्सीन 2  ग्रॅम/कि.ग्रॅम. बियाणे या मात्रेचा वापर करून बीजसंस्करण करावे.
  • रोगाची लक्षणे आढळून येताच कार्बेन्डाजिम+ मॅन्कोझेब 75% 400 ग्रॅ. प्रति एकर मात्रा फवारावी.
  • उपद्रव तीव्र असल्यास टॅबुकोनाझोल 25.9% EC 200 मिली प्रति एकर मात्रा फवारावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Damping Off Disease in Brinjal

वांग्यातील आद्र गलन रोगाचे नियंत्रण:-

लक्षणे:-

हा रोग सामान्यता रोपे नर्सरीत असताना होतो.

  • पावसाळ्यातील अत्यधिक ओल आणि तापमान हे घटक मुख्यत्वे या रोगाच्या प्रसारास अनुकूल असतात.
  • या रोगाचा हल्ला सामान्यता पिकाच्या दोन अवस्थामध्ये होतो. या रोगाची दोन प्रकारची लक्षणे आढळून येतात.
  • पहिले आर्द्रगलन सामान्यता बियाच्याला मोड फुटण्यापूर्वी होते आणि रोप उगवण्यापूर्वी बियाणे सडून जाते.
  • दूसरे आर्द्रगलन नवीन उतींच्या संक्रमणाच्या वेळी होते.
  • कोवळ्या रोपांचे शेंडे कुजतात. संक्रमित उती मुलायम होतात आणि आखडतात. रोप जळून जाते आणि मोडून पडते.

नियंत्रण:-

  • पेरणीसाठी निरोगी बियाणे वापरावे.
  • पेरणीपुर्वी थाइरम 2 ग्रॅम प्रति कि. ग्रॅम बियाणे या प्रमाणात मात्रा वापरुन बीजसंस्करण करावे.
  • नर्सरी सतत एकाच जागी बनवू नये.
  • नर्सरीच्या पृष्ठभागातील मातीचे कार्बेन्डाझिम 50% WP 5 ग्रॅम प्रति मीटर क्षेत्रफल या प्रमाणात मात्रा वापरुन संस्करण करावे आणि कार्बेन्डाझिम+ मॅन्कोझे 75% ची मात्रा 3 ग्रॅम प्रति लीटर पाण्यात वापरुन 15 दिवसांच्या अंतराने नर्सरीत फवारणी करावी.
  • उन्हाळ्यात मे महिन्याच्या शेवटी केलेल्या नर्सरीत पाणी फवारून आणि त्यानंतर 250 गेज जाड पॉलीथिन अंथरून सूर्यउर्जेद्वारे 30 दिवस संस्करण केल्यानंतर बियाणे पेरावे.
  • आर्द्रगलनाच्या प्रतिबंधासाठी ट्राइकोडर्मा विरीडी सारख्या जैविक औषधांची 1.2 कि. ग्रॅम प्रति हेक्टर मात्रा वापरावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control Of Downy Mildew in Cauliflower

फुलकोबीच्या अंगक्षय रोगाचे नियंत्रण:-

  • खोडांवर तपकिरी डाग दिसतात. त्यांच्यावर पांढर्‍या, मुलायम, रोम असलेल्या बुरशीची वाढ होते.
  • पानांच्या खालील बाजूवर जांभळ्या तपकिरी रंगाचे डाग पडतात. त्यांच्यावर पांढर्‍या, मुलायम, रोम असलेल्या बुरशीची वाढ होते.
  • फुलकोबीच्या शेंड्यावर संक्रमण होऊन तो सडतो.

नियंत्रण:-

  • गरम पाणो (50 OC) आणि थायरम (3 ग्रा./ ली.) वापरुन अर्धातास बीजसंस्करण करावे.
  • संक्रमित भाग कापून वेगळे काढावेत आणि कापलेल्या भागावर कॉपर ऑक्सीक्लोराइड (3 ग्रॅम/ली.) लावावे.
  • पिकावर मॅन्कोझेब 75 % @ 400 ग्रॅ/ एकर ची 10-15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
  • पीक चक्राचे अवलंबन करावे आणि शेतात स्वच्छता ठेवावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Collar Rot in Soybean

सोयाबीनमधील बुड कुजव्या रोग

लक्षणे: –

  • संक्रमण सामान्यता मातीच्या पृष्ठभागाखालून जमिनीतून होते.
  • रोप पिवळे पडून अचानक मरणे हे त्याचे पहिले लक्षण आहे.
  • पाने करड्या रंगाची होऊन वाळतात आणि अनेकदा मेलेल्या खोडाला चिकटतात.

नियंत्रण: –

    • उन्हाळ्यात शेतात खोल नांगरणी करावी.
    • मका आणि ज्वारीची पिके आलटून पालटून घ्यावी.
  • कार्बेन्डाझिम किंवा थायरम  वापरुन बीजसंस्करण करावे.
  • कार्बेन्डाझिम किंवा थायोफेनेट मिथाइल 70% डब्ल्यूपी @ 2 ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून ड्रेंचिंग करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Bacterial Blight of Cotton

कापसावरील जिवाणूजन्य अंगक्षय रोग:-

लक्षणे –  या रोगाची लक्षणे पाने, खोद आणि कापसाच्या बोंडात आढळून येतात. हवेच्या संपर्कात येणार्‍या सर्व भागांवर काले आणि फिकट करडे डाग आढळून येतात. रोग वाढत जातो तसतसा डागांचा आकार वाढत जातो. जिवाणू पानांच्या शिरत प्रवेश करतात. डागांमुळे पानातील क्लोरोफिल संपते. त्यामुळे झाड जीवनरस बनवू शकत नाही.

नियंत्रण –  स्ट्रेप्टोमायसीन + टेट्रासायक्लीन @ 2 ग्रॅम किंवा कासुगामायसीन @ 30 मिली./ प्रति पम्प ची फवारणी दोन वेळा 7-10  दिवसांच्या अंतराने करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Damping off disease in Onion

कांद्याच्या रोपांचा आंद्र गलन रोग:- विशेषता खरीपाच्या हंगामातील जमिनीतील अतिरिक्त ओल आणि मध्यम तापमान या रोगास मुख्य पोषक आहेत. या रोगात कांद्याची रोपे सडून मरतात.

नियंत्रण – कार्बेन्डाझिम12% + मॅन्कोझेब 63% किंवा थियोफीनेट मिथाइल 70% WP 50 ग्राम प्रति पम्प फवारावे.

Share

Today’s Crop Photo

आजच्या पिकाचा फोटो

नाव:- दिनेश जी

गाव:- बिरगोदा

तहसील:- देपालपुर

जिल्हा:- इंदौर

समस्या:- सोयाबीनच्या पिकातील मूळ कुजव्या रोग

नियंत्रण:- मूळ कुजव्या रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाजिम 12% + मॅन्कोझेब 63% किंवा थायोफिनेट मिथाईल @ 50 ग्रॅम फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Today’s Gramophone Farmer

आजचे ग्रामोफ़ोन शेतकरी

नाव:- सुरेश वर्मा

गाव:- कनारदी

तहसील:- तराना

जिल्हा:- उज्जैन

समस्या:- टोमॅटोच्या नर्सरीतील पानांचा अंगक्षय रोग.

नियंत्रण:- मेटॉलेक्झील 8% + मॅन्कोझेब 64% @ 50 ग्रॅम फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Fruit Rot and Dieback in Chillies

मिरचीतील फळ कुजव्या आणि डायबेक रोगाचे नियंत्रण

मिरचीतील फळ कुजव्या आणि डायबेक रोग:- याची लक्षणे फुलोरा आल्यावर आढळून येतात. पानांवर काळे डाग पडतात आणि रोप मधून तुटते. फुले सुकतात आणि रोप वरुन खाली सुकत जाते.

नियंत्रण:- रोगाचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी थायोफिनेट मिथाईल 70% @ 30 ग्रॅम/पंप किंवा हेक्झाकोनाझोल 5 % +केपटान 70% WP @ 25 ग्रॅम/पम्प फवारावे. पहिली फवारणी फुलोरा येण्यापूर्वी, दुसरी फलधारणा सुरू होताच आणि तिसरी त्यानंतर 15 दिवसांनी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share