Control of Anthracnose or Pod Blight in Soybean

सोयाबीनवरील में अ‍ॅन्थ्रेक्नोंज आणि शेंग कुजव्या रोगाचे नियंत्रण:

  • हा बीज आणि मृदा जनित रोग आहे.
  • सोयाबीनमध्ये फुलोरा येण्याच्या वेळी खोड, पर्णवृन्त आणि शेंगांवर लाल ते गडद करड्या रंगाचे, अनियमित आकाराचे डाग दिसू लागतात.
  • नंतर हे डाग बुरशीच्या काळ्या संरचना (एसरवुलाई) आणि टोकदार संरचनानी भरतात.
  • पानांच्या शिरा पिवळ्या-करड्या होतात, पाने मुडपतात आणि गळून पडतात. ही या रोगाची लक्षणे आहेत.

नियंत्रण:-

  • एनआरसी 7 आणि 12 यासारखी रोग प्रतिकारक वाणे वापरावीत.
  • पेरणीपुर्वी थायरम + कार्बोक्सीन 2  ग्रॅम/कि.ग्रॅम. बियाणे या मात्रेचा वापर करून बीजसंस्करण करावे.
  • रोगाची लक्षणे आढळून येताच कार्बेन्डाजिम+ मॅन्कोझेब 75% 400 ग्रॅ. प्रति एकर मात्रा फवारावी.
  • उपद्रव तीव्र असल्यास टॅबुकोनाझोल 25.9% EC 200 मिली प्रति एकर मात्रा फवारावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>