Downy Mildew in Cucurbitaceae

भोपळावर्गीय पिकांमधील केवळा (डाऊनी मिल्ड्यु) रोग:-

  • पानांच्या खालील भागावर पाणी भरलेले डाग उमटतात.
  • पानांच्या वरील भागावर कोणीय डाग उमटतात तसेच पानांच्या खालील भागावर देखील उमटतात.
  • सर्वात आधी डाग जुन्या पानांवर उमटतात आणि नंतर हळूहळू नवीन पानांवर उमटतात.
  • रोगग्रस्त वेलांवर फलधारणा होत नाही.

नियंत्रण:-

  • रोगग्रस्त पाने तोडून नष्ट करा.
  • रोगप्रतिरोधक जातीचे बियाणे वापरावे.
  • मेन्कोजेब 3 ग्राम प्रति ली. च्या मात्रेची पानांच्या खालील भागावर फवारणी करावी.
  • पीक चक्र वापरुन आणि शेताची साफसफाई करून रोगाची आक्रमकता आटोक्यात येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Purple Blotch in Onion

कांद्यावरील जांभळ्या डागांच्या रोगाचे नियंत्रण:

सुरूवातीला छोटे असलेले अंडाकृती छिद्रे किंवा ठिपके वाढून फिकट जांभळे होतात आणि पिवळ्या कडांच्या चारी बाजूंनी दिसतात. डाग मोठे होताना पिवळ्या कडा पसरून वर-खाली छिद्रे पाडतात. छिद्रे पानाच्या मधोमध असतात त्यामुळे ती गळतात. छिद्रे जुन्या पानांच्या टोकापासून सुरू होतात. या रोगाचा प्रभावी प्रतिबंध करण्यासाठी निरोगी बियाणे वापरावे. संबंधित नसलेल्या पिकांसह 2-3 वर्षांचे पीकचक्र अंमलात आणावे. जिवाणूनाशके फवारणी मैन्कोज़ेब 75% WP @ 45 ग्रॅम/ 15 लीटर पाणी किंवा हेक्साकोनोजोल 5% एससी @ 20 मिलीलीटर / 15 लीटर पाणी किंवा प्रोपिकोनाज़ोल 25% ईसी @ 15 मिलीलीटर / 15 लीटर पाणी पेरणी केल्यावर 30 दिवसांपासून किंवा रोग लक्षात आल्यावर लगेचपासून दर 10-15 दिवसांनंतर करावी.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Control of Powdery mildew in Tomato

हा रोग लेवीलुलाटोरिका जिवाणूमुळे होतो. सुरूवातीला पानांच्या वरील बाजूवर फिकट हिरव्या ते फिकट पिवळ्या रंगाचे डाग दिसू लागतात. पानावर भुकटीचे हलके आवरण दिसते आणि पाने पिवळी पडू व कुजू लागतात. या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी हेक्साकोनोजोल 5% एससी @ 30 मिलीलीटर / 15 लीटर पाणी किंवा सल्फर 80% डब्लूडीजी @ 50 ग्रॅम / 15 लीटर पाणी या मिश्रणाची फवारणी करावी.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Root rot control in Garlic

नियंत्रण:- लागण झालेली रोपे तातडीने उपटावीत. पेरणीसाठी रोगमुक्त बियाणे वापरावे. लसूणच्या बियाण्याला गरम पाण्याने संस्कारित करून 50% पर्यन्त रोगाचे नियंत्रण करता येते. पेरणी करताना गड्ड्यांना मेन्कोजेब 2 ग्रॅम/ ली. मिश्रणात संस्कारित करावे. उभा पिकावर 45 ग्रॅम प्रति पम्प कार्बेन्डाजिम 12% + मेन्कोजेब 60% ची फवारणी करून ड्रेंचिंग करावे

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share