Disease Free Nursery Raising For Marigold

झेंडूच्या पिकासाठी रोगमुक्त नर्सरी बनवणे:-

  • पेरणीसाठी निरोगी बियाणे निवडावे.
  • पेरणीपुर्वी शिफारस केलेल्या जिवाणूनाशकाने बीजसंस्करण करावे.
  • एकाच प्लॉटमध्ये पुन्हापुन्हा नर्सरी करू नये.
  • नर्सरीच्या पृष्ठभागावरील मातीचा कार्बेन्डाझिम 5 ग्रॅम/वर्ग मी. वापरुन उपचार करावा आणि त्याच रसायनाचे 2 ग्राम/ लीटर पाणी या प्रमाणात मिश्रण करून नर्सरीचे दर 15 दिवसांनी ड्रेंचिंग करावे.
  • आद्रगलन रोगाच्या नियंत्रणासाठी जैव-नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोड्रमा विरिडी 1.2 किलोग्रॅम/ हे. ची मात्रा द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Powdery Mildew of Bottle Gourd

दुधीभोपळ्यातील भुरी (पावडर मिल्ड्यु) रोग:-

  • पानांवर पांढरे किंवा धुरकट रंगाचे डाग उमटतात आणि ते वाढून पांढर्‍या रंगाची भूकटी बनते.
  • दर 15 दिवसांनी हेक्झाकोनाझोल 5% SC 300 मिली. प्रति एकर किंवा थायोफिनेट मिथाईल 400 ग्रॅम प्रति एकरचे मिश्रण फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Disease Free Nursery Raising For Vegetables

भाजीपाल्यासाठी रोगमुक्त नर्सरी बनवणे:-

  • पेरणीसाठी निरोगी बियाणी निवडावीत.
  • पेरणीपुरवी बुरशीनाशकाने बीजसंस्करण करावे.
  • एकाच प्लॉटमध्ये पुन्हा पुन्हा नर्सरी बनवू नये.
  • नर्सरीच्या पृष्ठभागातील मातीवर कार्बेन्डाजिम 5 ग्राम/वर्ग मी. वापरुन उपचार करावेत आणि त्याच रसायनाची 2 ग्राम/ लीटर पाण्याची मात्र बनवून दर 15 दिवसांनी नर्सरीत ड्रेंचिंग करावे.
  • पेरणीपूर्वी उन्हाळ्यात मृदा सोर्यकरण करण्यासाठी नर्सरी बेडला 250 गेजच्या पॉलीथीन शीटने 30 दिन झाकून ठेवावे.|
  • आद्र गलन रोगाच्या नियंत्रणासाठी जैव-नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोड्रमा विरिडी 1.2 किलोग्रॅम/ हे. ची मात्रा वापरावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Mosaic Virus in chilli

मिरचीमधील केवडा रोगाचा (मोझेक विषाणू) बंदोबस्त

लक्षणे:-

  • पानांवर गडद हिरवे आणि पिवळे डाग पडणे हे रोगाचे मुख्य लक्षण आहे.
  • उथळ खड्डे आणि फोड देखील आढळून येतात. |
  • कधीकधी पानाचा आकार बदलून त्यांची लहान गुंडाळी होते.
  • लागण झालेल्या रोपांना फुले आणि फळे कमी लागतात.
  • फळे विकृत आणि खडबडीत होतात.

प्रतिबंध:-

  • लागण झालेली रोपे उपटून नष्ट करावीत.
  • पूसा ज्वाला, पन्त सी-1, पूसा सदाबहार, पंजाब लाल इत्यादी प्रतिरोधक वाणे वापरावीत.
  • डायमिथोएट चे 2 मिली/लीटर मात्रेत मिश्रण बनवून योग्य त्या अंतराने फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Powdery mildew in Okra

भेंडीमधील पावडर बुरशी (पावडरी मिल्ड्यु) रोग

लक्षणे:-

  • या रोगाची लक्षणे मुख्यत्वे रोपांची जुने पाने आणि खोडांवर आढळून येतात.
  • वातावरणातील प्रमाणाबाहेर आर्द्रता या रोगाला अनुकूल ठरते.
  • या रोगामद्धे पाने आणि खोडावर पांढर्‍या रंगाचे लहान गोल डाग पडतात.
  • रोगाची जास्त लागण झालेली पाने पिवळी पडतात आणि नंतर सुकून काळपट रंगाची होतात.
  • नंतर पाने सडू लागतात.

नियंत्रण:- विरघळण्यायोग्य सल्फर 80% चे 50 ग्राम प्रति 15 ली पाण्यात मिश्रण बनवून 15 दिवसांच्या अंतराने फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Anthracnose in Frenchbean

फरसबी मधील अँथ्रॅकोनोस जिवाणूजन्य रोगाचा (श्यामवर्ण रोग) प्रतिबंध

लक्षणे:-

  • फरसबीची पाने, खोडे आणि शेंगांवर या रोगाची लागण झाल्याचा परिणाम होतो.
  • शेंगांवर छोटे-छोटे लाल करड्या रंगाचे डाग पडतात आणि झपाट्याने वाढतात.
  • दमट हवामानात या डागांवर गुलाबी रंगाचे जिवाणू वाढतात.
  • पानांवर आणि खोडावरदेखील काळे ओलसर खड्डे पडतात.
  • पानाच्या शिरांवर देखील लागण होऊन त्या काळ्या पडतात.

प्रतिबंध:-

  • रोगमुक्त प्रमाणित बियाणे वापरावे.
  • रोगाची लागण झालेल्या शेतात किमान दोन वर्षे फरसबीची लागवड करू नये.
  • रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत.
  • कार्बेन्डाजिम 3 ग्रॅम/ किलो वापरुन बीजसंस्करण करावे.
  • मेन्कोजेब 3 ग्रॅम प्रति ली. पाणी मिश्रणाची फवारणी करावी किंवा क्लोरोथायोनील 2 ग्रॅम प्रति ली पाण्याचे मिश्रण पाने फुटल्यापासून शेंगा तयार होईपर्यंत दर आठवड्याला फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Early Blight of Tomato

टोमॅटोवरील प्रारंभीक क्षयरोगाचे (ब्लाइट) नियंत्रण

लक्षणे:- जिवाणूंच्या पानांवरील हल्ल्यामुळे डाग पडू लागतात. हे डाग लहान, फिकट करडे आणि पानभर पसरलेले असतात. पूर्ण विकसित झालेले डाग अनियमित, केंद्र असलेले, फफूंद का पत्तियों पर आक्रमण होने पर धब्बों का निर्माण होने लगता है| उत्पन्न धब्बे छोटे, काळ्या रंगाचे आणि 2-5 मिमी. आकाराचे असतात. या रोगाची लक्षणे खालील बाजूच्या पानांपासूंन सुरू होईन हळूहळू वरील बाजूच्या पानांवर दिसू लागतात.

नियंत्रण:- लक्षणे आढळून आल्यापासून दय 15 दिवसांनी 2 ग्रॅम मेन्कोजेब 75 डब्लूपी + 10 ग्रॅम यूरिया प्रति लीटर किंवा कार्बेन्डाजिम 12% + मेन्कोजेब 63% WP @ 50 ग्रॅम/ 15 लीटर पाणी किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50 % WP @ 50 ग्रॅम / 15 लीटर पाणी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Prevention of Collar rot in chilli

मिरचीवरील बुड कुजव्या रोगाचा प्रतिबंध

लक्षण:-

  • जमिनीजवळ स्तंभाच्या आधारे जिवाणू उतींचा क्षय करून रोपाला सुकवतात.
  • अनुकूल परिस्थिति असल्यास मोहरीच्या दाण्यासारख्या बुरशीची वाढ रोगग्रस्त भागावर होते.

प्रतिबंध:-

  • रोगग्रस्त रोपांचे अवशेष नष्ट करावे.
  • पाण्याच्या निचर्‍याची व्यवस्था करावी आणि पीक चक्राचा वापर करावा.
  • नर्सरी उंच जागी बनवावी.
  • कार्बेन्डाजिम 3 ग्रॅम/ किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • कार्बेन्डाजिम 3 ग्रॅम किंवा मेटालेक्ज़िल+ मेन्कोज़ेब 3 ग्रॅम प्रति ली. पाणी या मात्रेत मिश्रण बनवून 10 दिवसांच्या अंतराने दोनदा ड्रेंचिंग करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Fusarium Wilt in Bottle Gourd

दुधी भोपळ्यावरील मर रोगाचा प्रतिबंध

  • नव्याने उगवलेल्या रोपांच्या पानाचे अंकुर कमजोर होऊन गळून जातात.
  • जुनी रोपे मर रोगाला लवकर बळी पडतात. बुडामधील संवहन उती करड्या रंगाच्या होतात.

प्रतिबंध:-

  • रोग प्रतिरोधी वाणे वापरावी.
  • रोग प्रतिरोधी पिके लावून पीक चक्र वापरावे.
  • पेरणीपुरवी 55oC तापमानाच्या गरम पाण्याचा वापर करून 15 मिनिटे बीजसंस्करण करावे.
  • कार्बेन्डाजिम जिवाणूनाशक 3 ग्रॅम प्रति ली पाणी या मात्रेत मिश्रण बनवून मुळाद्वारे द्यावे.|

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Alternaria Leaf Spot in Cauliflower and Cabbage

फुलकोबी आणि पानकोबीवरील आल्टर्नेरिआ (पानांवरील डागांचा रोग):-

लक्षणे:-

  • पानांवर लहान गडद पिवळ्या रंगाचे ठिपके उमटतात.
  • लवकरच हे ठिपके एकमेकात मिसळून निळसर गोल व्रण बनवतात.
  • या डागांच्या मध्यभागी केंद्रामध्ये निळसर रंगाची बुरशी वाढते.
  • लागण तीव्र झाल्यावर सर्व पाने गळून पडतात.
  • रोगग्रस्त फुलांवर आणि पानांवर गडद जांभळे, काळे-करडे डाग दिसतात.

नियंत्रण:-

  • प्रमाणित बियाणी वापरावी.
  • गरम पाण्यात (50OC) बीजसंस्करण करावे.
  • रोगाची लक्षणे दिसू लागताच मेन्कोजेब 3 ग्राम प्रति ली. पाण्याचे किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईड 3 ग्राम प्रति लीटर पाण्याचे मिश्रण बनवून 10-15 दिवसांच्या अंतराने फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share