Prevention of Collar rot in chilli

मिरचीवरील बुड कुजव्या रोगाचा प्रतिबंध

लक्षण:-

  • जमिनीजवळ स्तंभाच्या आधारे जिवाणू उतींचा क्षय करून रोपाला सुकवतात.
  • अनुकूल परिस्थिति असल्यास मोहरीच्या दाण्यासारख्या बुरशीची वाढ रोगग्रस्त भागावर होते.

प्रतिबंध:-

  • रोगग्रस्त रोपांचे अवशेष नष्ट करावे.
  • पाण्याच्या निचर्‍याची व्यवस्था करावी आणि पीक चक्राचा वापर करावा.
  • नर्सरी उंच जागी बनवावी.
  • कार्बेन्डाजिम 3 ग्रॅम/ किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • कार्बेन्डाजिम 3 ग्रॅम किंवा मेटालेक्ज़िल+ मेन्कोज़ेब 3 ग्रॅम प्रति ली. पाणी या मात्रेत मिश्रण बनवून 10 दिवसांच्या अंतराने दोनदा ड्रेंचिंग करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Fusarium Wilt in Bottle Gourd

दुधी भोपळ्यावरील मर रोगाचा प्रतिबंध

  • नव्याने उगवलेल्या रोपांच्या पानाचे अंकुर कमजोर होऊन गळून जातात.
  • जुनी रोपे मर रोगाला लवकर बळी पडतात. बुडामधील संवहन उती करड्या रंगाच्या होतात.

प्रतिबंध:-

  • रोग प्रतिरोधी वाणे वापरावी.
  • रोग प्रतिरोधी पिके लावून पीक चक्र वापरावे.
  • पेरणीपुरवी 55oC तापमानाच्या गरम पाण्याचा वापर करून 15 मिनिटे बीजसंस्करण करावे.
  • कार्बेन्डाजिम जिवाणूनाशक 3 ग्रॅम प्रति ली पाणी या मात्रेत मिश्रण बनवून मुळाद्वारे द्यावे.|

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Healthy and Excellent Crop of Chickpea

हरबर्‍याचे निरोगी आणि उत्तम पीक

शेतकर्‍याचे नाव:- कल्याण पटेल

गाव+ तहसील:- देपालपुर

जिल्हा:- इंदौर

राज्य:- मध्यप्रदेश

कल्याण जी यांनी 10 एकर क्षेत्रात हरबरा लावला असून त्यात त्यांनी ग्रामोफोनच्या सूचनेनुसार प्रोपिकोनाजोल 25% EC आणि त्याचबरोबर एका विश्वसनीय कम्पनीच्या ज़ाईमची फवारणी केली. आता हरबरा उत्तम असून कोणताही रोग नाही आणि चांगला फुलोरा आहे.

Share

Achieved Maximum Yield in Onion

कांद्याचे भरघोस उत्पन्न मिळवले

शेतकर्‍याचे नाव:- मुकेश पाटीदार

गाव:-  कनारदी

तहसील आणि जिल्हा:- तराना और उज्जैन

राज्य :- मध्य प्रदेश

शेतकरी बंधु मुकेश पाटीदार ग्रामोफोनचे आधुनिक शेतकरी आहेत. त्यांनी ग्रामोफ़ोन टीमच्या मार्गदर्शनाखाली कांद्याची शेती केली. त्याचे मध्य प्रदेशातील सरासरी उत्पादन 70 क्विंटल/ एकर आहे पण मुकेश जी ना प्रति एकर 113 क्विंटल मिळाले.

Share

Management of Red Spider Mites in Cucurbitaceae

भोपळावर्गीय पिकांवरील लालकोळी किडीचा बंदोबस्त:-

कशी ओळखावी:-

  • लालकोळी कीड 1 मिमी. लांब असते. तिला डोळ्यांनी सहज पाहता येत नाही.
  • लालकोळी कीड पानांच्या खालील बाजूस झुंडीने राहते.
  • लालकोळी कीडीच्या एका वसाहतीत 100 पर्यन्त किडे रहातात.
  • अंडी गोल, पारदर्शक आणि फिकट पिवळ्या पांढर्‍या रंगाची असतात.
  • वयात आलेल्या किडयाचे आठ पाय असतात. शरीर अंडाकार असते आणि डोक्याच्या बाजूला दोन लाल नेत्र बिंदु असतात.
  • मादीच आकार नराहून मोठा असतो आणि तिच्या शरीरावर खोल चट्ट्यासारखा आकार असतो. शरीर कठोर आवरणाने झाकलेले असते.
  • अंड्यातून निघालेल्या लार्वाला फकटा सहा पाय असतात.

हानी:-

  • लार्वा, लहान किडे आणि वयात आलेले किडे पानाची खालची बाजू फाडून खातात.
  • लहान किडे आणि वयात आलेले किडे पाने आणि अंकुराचा कोशिका रस शोषतात. त्यामुळे पाने आणि अंकुरावर पांढरे डाग पडतात.
  • अधिक प्रसार झाल्यास पानाच्या खालील बाजूस जाळे विणून त्यांना हानी पोहोचवतात.

नियंत्रण:-

  • सकाळी सूर्योदयापूर्वी पानांच्या खालील बाजूस निंबाचे तेल शिंपडावे.
  • प्रोपारजाईट 57% EC 3 मिली प्रति लीटर पाणी या मात्रेला 7 दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Alternaria Leaf Spot in Cauliflower and Cabbage

फुलकोबी आणि पानकोबीवरील आल्टर्नेरिआ (पानांवरील डागांचा रोग):-

लक्षणे:-

  • पानांवर लहान गडद पिवळ्या रंगाचे ठिपके उमटतात.
  • लवकरच हे ठिपके एकमेकात मिसळून निळसर गोल व्रण बनवतात.
  • या डागांच्या मध्यभागी केंद्रामध्ये निळसर रंगाची बुरशी वाढते.
  • लागण तीव्र झाल्यावर सर्व पाने गळून पडतात.
  • रोगग्रस्त फुलांवर आणि पानांवर गडद जांभळे, काळे-करडे डाग दिसतात.

नियंत्रण:-

  • प्रमाणित बियाणी वापरावी.
  • गरम पाण्यात (50OC) बीजसंस्करण करावे.
  • रोगाची लक्षणे दिसू लागताच मेन्कोजेब 3 ग्राम प्रति ली. पाण्याचे किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईड 3 ग्राम प्रति लीटर पाण्याचे मिश्रण बनवून 10-15 दिवसांच्या अंतराने फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Downy Mildew in Cucurbitaceae

भोपळावर्गीय पिकांमधील केवळा (डाऊनी मिल्ड्यु) रोग:-

  • पानांच्या खालील भागावर पाणी भरलेले डाग उमटतात.
  • पानांच्या वरील भागावर कोणीय डाग उमटतात तसेच पानांच्या खालील भागावर देखील उमटतात.
  • सर्वात आधी डाग जुन्या पानांवर उमटतात आणि नंतर हळूहळू नवीन पानांवर उमटतात.
  • रोगग्रस्त वेलांवर फलधारणा होत नाही.

नियंत्रण:-

  • रोगग्रस्त पाने तोडून नष्ट करा.
  • रोगप्रतिरोधक जातीचे बियाणे वापरावे.
  • मेन्कोजेब 3 ग्राम प्रति ली. च्या मात्रेची पानांच्या खालील भागावर फवारणी करावी.
  • पीक चक्र वापरुन आणि शेताची साफसफाई करून रोगाची आक्रमकता आटोक्यात येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Maximum Control of Root rot in Gram(Chickpea)

हरबर्‍यातील मूळ कुज रोगाचे प्रभावी नियंत्रण

शेतकर्‍याचे नाव:- हरिओम बहादुर सिंह

गाव:- लिम्बोदापार

तहसील आणि जिल्हा:- देपालपुर और इंदौर

शेतकरी बंधु हरिओम जी यांनी हरबर्‍यातील मूळ कुज आणि पांढर्‍या बुरशीच्या समस्येसाठी प्रोपीकोनाज़ोल 25% EC ची फवारणी केली. त्यामुळे हरबर्‍यावरील रोगाचा प्रभाव कमी झाला आहे आणि नवीन फुटवे देखील फुटू लागले आहेत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Red Pumpkin Beetle in Cucurbitaceae

भोपळावर्गीय पिकावरील लाल कीड:-

ओळख:-

  • अंडी गोलाकार, पिवळ्या- गुलाबी रंगाची असून थोड्या दिवसांनी नारंगी रंगाची होतात.
  • अंड्यांमधून निघणारा नवा लार्वा मळकट पांढर्‍या रंगाचा असतो. परंतु वाढ झालेला लार्वा 22 सेमी. लांब आणि पिवळट क्रीम रंगाचा असतो.
  • प्यूपा फिकट पिवळ्या रंगाचा असतो. तो जमिनीत 15 ते 25 मिमी. खोल असतो.
  • पूर्ण वाढ झालेले किडे 6-8 मिमी. लांब असून त्यांचे पंख चमकदार पिवळ्या लाल रंगाचे असतात आणि ते संपूर्ण शरीर झाकतात.

नुकसान:-

  • अंड्यातून निघालेले ग्रब मुळे, भूमिगत भाग आणि जमिनीला टेकलेल्या फळांना खातात.
  • त्यानंतर ग्रस्त मुळे आणि भूमिगत भागांवर मृतजीवी बुरशीचा हल्ला होतो. त्यामुळे अपरिपक्व फळे आणि वेली सुकतात.
  • किड्यांनी हल्ला केलेली फळे खाण्यास अयोग्य असतात.
  • किडे पानांना खाऊन भोके पाडतात.
  • रोपाच्या अवस्थेत वेली असताना किड्यांचा हल्ला झाल्यास ते कोवळी पाने खाऊन हानि पोहोचवतात. त्यामुळे रोपे मरतात.

नियंत्रण:-

  • खोल नांगरणी करण्याने जमिनीतील प्यूपा आणि ग्रब उघडे पडतात आणि सूर्यकिरणांनी मरतात.
  • बीजाला अंकुर फुटल्यावर रोपाच्या सर्व बाजूंनी जमिनीत कारटाप हायड्रोक्लोराईड 3 G चे दाणे पसरावेत.
  • किड्यांना एकत्र करून नष्ट करावे.
  • साईपरमेथ्रिन (25 र्इ.सी.) 1 मि.ली. प्रति लीटर पाणी + डायमिथोएट 30% ईसी. 2  मि.ली. प्रति लीटर पाणी या मात्रेची फवारणी करावी किंवा कार्बारिल 50% WP 3 ग्रॅम प्रति ली पाण्याचे मिश्रण फवारावे. पहिली फवारणी पेरणीनंतर 15 दिवसांनी आणि दुसरी फवारणी त्यानंतर 15 दिवसांनी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Cauliflower Diamondback Moth (DBM)

फुलकोबीवरील डायमण्ड बॅक मोथची अळी

ओळख:-

  • अंडी पांढरट पिवळी आणि फिकट हिरव्या रंगाची असतात.
  • अळ्या 7-12 मिमी. लांब, फिकट पिवळट हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यांच्या संपूर्ण शरीरावर बारीक रोम असतात.
  • वाढ झालेले किडे 8-10 मिमी. लांब, मातकट करड्या रंगाचे असतात आणि त्यांचे पंख फिकट गव्हाळ रंगाचे असतात आणि त्यांच्या आतील कडा पिवळ्या असतात.
  • वाढलेल्या माद्या पानांवर समूहाने अंडी घालतात.
  • पंखांवर पांढर्‍या रेषा असतात. पंख मिटल्यावर हिर्‍याचा आकार दिसतो.

नुकसान:-

  • लहान, सडपातळ हिरव्या अळ्या अंड्यातून निघाल्यावर पानांचा बाहेरील पृष्ठभाग खाऊन त्यात भोके पाडतात.
  • तीव्र हल्ला झाल्यावर पानांचा फक्त सांगाडा उरतो.

नियंत्रण:-

डायमण्ड बॅक मोथ रोखण्यासाठी फुलकोबीच्या प्रत्येक 25 ओळींनंतर 2 ओळी बोल्ड मोहरीच्या लावाव्यात. प्रोफेनोफ़ोस (50 र्इ.सी.) 3 मि.ली. प्रति लीटर पाणी मिश्रण फवारावे. स्पायनोसेड (25 एस. सी.) 0.5 मि.ली. प्रति ली. किंवा ईंडोक्साकार्ब 1.5 मि.ली. प्रति ली पाणी मिश्रण फवारावे. पहिली फवारणी पेरणीनंतर 25 दिवसांनी आणि दुसरी त्यानंतर 15 दिवसांनी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share