Shoot and Fruit Borer in Brinjal

वांग्यावरील फळ आणि बुड पोखरणारी अळी

ओळख:-

  • मादी मॉथ वांग्याच्या रोपांच्या फांद्यांवर अंडी घालते.
  • मादी फिकट पिवळ्या रंगाची अंडी पानांच्या खालील बाजूस, खोडावर, फुले, कळ्यांवर किंवा फळांच्या खालील भागावर घालते.
  • अंड्यातून निघालेली अळी 15-18 मिमी. लांब फिकट पांढर्‍या रंगाची असते. वाढ झाल्यावर ती फिकट जांभळ्या रंगाची होते.
  • पूर्ण वाढ झालेले किडे पांढर्‍या रंगाचे असतात. त्यांचे पंख भुरकट रंगाचे असतात आणि त्यांच्यात जांभळी किंवा निळसर झाक असते.
  • अंड्यातून निघालेले लार्वा थेट फळाला भोक पाडून आत शिरतात.
  • लार्वा अवस्थेचे जीवन चक्र पूर्ण झाल्यावर ते खोद, वाळलेल्या फांद्या किंवा गळून पाडलेल्या पानांवर प्यूपा निर्माण करतात.
  • वातावरण उष्ण असल्यास फळ आणि बुड पोखरणार्‍या अळ्यांच्या संख्येत वाढ होते.

हानि:-

  • इस कीट के द्वारा हानि रोपाई के तुरंत बाद से लेकर अंतिम तुड़ाई तक होता है|
  • वयस्क मादा मक्खी पत्तियों की निचली सतह पर कलियों एवं फलों पर अंडे देती है|
  • प्रारंभिक अवस्था में छोटी गुलाबी ईल्ली रहनी एवं तने में छेद करके प्रवेश करती है जिसके कारण पौधे की शाखाएँ सुख जाती है|
  • बाद में इल्ली फलों में छेद कर प्रवेश करती है और गुदे को खा जाती है |

नियंत्रण:-

  • शेतात सतत वांग्याचे पीक न घेता पीक चक्र वापरा.
  • भोके पडलेली फळे तोडून नष्ट करा.
  • कीड रोखण्यासाठी साईपरमेथ्रिन 25% EC (0.5 मिली. प्रति ली. पानी) किंवा क्लोरोपाईरिफोस 20% EC (4 मिली. प्रति ली पाणी) मिश्रण पेरणीनंतर 35 दिवसांपासून दर 15 दिवसांनी फवारावे.
  • किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी कीटकनाशकाच्या फवारणीपुर्वी भोके पडलेली फळे तोडावीत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Better flowering and growth in Gram(Chickpea)

हरबर्‍याचा चांगला फुलोरा आणि विकास

शेतकर्‍याचे नाव:- ओमप्रकाश पाटीदार

गाव:- पनवाड़ी

तहसील आणि जिल्हा:- शाजापुर

शेतकरी बंधु ओम प्रकाश जी यांनी 4 एकर क्षेत्रात हरबरा लावला आहे. त्यावर त्यांनी ह्यूमिक अॅसिड 15 ग्राम प्रति पम्प फवारले. त्यामुळे फुलांची संख्या वाढली आणि रोपांची वाढ देखील अधिक झाली. हयुमिक अॅसिड पाण्यात पूर्णपणे विरघळते. त्याच्यामुळे रोपाला अधिक व्हिटामिन मिळतात आणि फॉस्फरसची उपलब्धता वाढते. ते कोशिकांच्या विभाजनाला गती देते आणि रोपाचा वाढीला प्रोत्साहन देते. ते मुळांच्या विकासाला आणि शुष्क पदार्थांच्या वाढीलाही पोषक असते. त्याच्या उपयोगाने पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषली आणि वापरली जातात. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Role of Copper in Plant

रोपांच्या विकासात कॉपरची भूमिका:- रोपांच्या निरोगी विकासासाठी कॉपर हा अत्यावश्यक घटक आहे. इतर लाभांव्यतिरिक्त, कॉपर अनेक एंझाइम प्रक्रियांमध्ये भूमिका बजावते. ते क्लोरोफिलच्या निर्मितीसाठी महत्वाचे असते.

कॉपरची कार्ये:- कॉपर रोपांमध्ये लिग्निन संश्लेषणासाठी आवश्यक असलेले काही एंझाइम्स सक्रिय करते. ही एंझाइम्स प्रणालींसाठी आवश्यक असतात. प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत, रोपांच्या श्वसनासाठी आणि कार्बोहाइड्रेट आणि प्रोटीनच्या चयापचयासाठी ती आवश्यक असतात. कॉपर  भाजांचा स्वाद वाढवते आणि फुलांचे रंग गडद करते.

अभावाची लक्षणे:- कॉपर स्थिर असते. याचा अर्था असा की त्याच्या अभावाची लक्षणे नव्याने उगवलेल्या पानांमध्ये दिसून येतात. पिकानुसार लक्षणे वेगवेगळी असतात. सहसा पाने वाकडी होणे आणि सर्व किंवा नव्या पानांच्या शिरांमध्ये थोडी पिवळी झाक येणे सुरूवातीचे लक्षण एसते. पानांच्या पिवळ्या पाडलेल्या भागात आणि विशेषता कडावर क्षयाचे डाग पडतात. पुढे ही लक्षणे वाढत जाऊन नवीन पाने लहान आकाराची, कमी चमकदार दिसतात आणि काही वेळा पाने सुकतात.  फांद्यांची वाढ खुंटल्याने कोंवात क्षय होऊन ते मरतात. सहसा रोपाच्या खोडाची लांबी पानांजवळ कमी होते. फुलांचा रंग फिकट होतो. पोटॅशियम, फॉस्फरस किंवा इतर सूक्ष्म पोषक तत्वांची अतिरिक्त मात्रा अप्रत्यक्षपणे कॉपरच्या अभावाचे कारण असू शकते. तसेच जमीनीची पीएच श्रेणी उच्च असल्यास त्यानेही कॉपरचा अभाव होऊ शकतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Stem and bulb nematode in Onion and Garlic

 

कांदा आणि लसूणच्या खोड आणि कंदामधील सूत्रकृमी:- सूत्रकृमी रोपाच्या मुख किंवा जखमांमार्फत रोपांमध्ये प्रवेश करते आणि रोपांमध्ये गाठी किंवा रोगट वाढ निर्माण करतात. त्यामुळे बुरशी आणि जिवाणू यासारख्या माध्यमिक रोगकारकांना रोपात प्रवेश मिळतो. वाढ खुंटणे, कंद रंगहीन होणे व सूज येणे ही सूत्रकृमीच्या लागणीची लक्षणे आहेत.

उपाय:- •

  • रोगयुक्त कंद बियाण्यासाठी ठेवू नयेत.
  • शेत आणि उपकरणे स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे कारण सूत्रकृमी लागण झालेल्या रोपांच्या अवशेषात जीवंत राहतात आणि पुन्हा उत्पन्न होतात.
  • सूत्रकृमींच्या चांगल्या नियंत्रणासाठी कार्बोफ्यूरॉन 3% दाणेदार @ 10 किग्रॅ / एकर जमिनीत मिसळून द्यावे.
  • सूत्रकृमींच्या के कार्बनिक नियंत्रणासाठी निंबाची पेंड @ 200 किग्रॅ / एकर जमिनीत मिसळून द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizer and Manure in Guava trees

पेरुच्या झाडांसाठी खते आणि उर्वरके:- शेणखत 50 किलो आणि नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटाशची प्रत्येकी 1 किलो मात्रा दोन समान भागात मार्च आणि ऑक्टोबरमध्ये द्यावी. अधिक उत्पादनासाठी यूरिया 1% + झिंक सल्फेट 0.5% चे मिश्रण मार्च आणि ऑक्टोबर मध्ये फवारावे. बोरानचा अभाव (पाने लहान असणे, फळे फाटणे, फळे कडक होणे) दूर करण्यासाठी बोरेक्स 0.3% फुले आणि फळे लागण्याच्या वेळी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Importance of Manganese in Plant growth

रोपांच्या वाढीसाठी मँगनीजचे महत्त्व:- मँगनीज (Mn) हे रोपांसाठी आवश्यक खनिज पोषक तत्व आहे. ते अनेक शारीरिक प्रक्रियांमध्ये आणि विशेषता प्रकाश संश्लेषणात महत्वपूर्ण भूमिका बजावते. रोपांना लोहाशिवाय सर्वाधिक प्रमाणात मँगनीज आवश्यक असते. गहू, जव (बार्ली) आणि ओट्स अशी तृणधान्ये, घेवडे, मटार आणि सोयाबीनसारखी द्विदल धान्ये, सफरचंद, चेरी आणि पीचसारखी फळे, पामवर्गीय पिके, लिंबूवर्गीय फळे, बटाटा आणि शर्कराकंद अशा अनेक प्रजातींमध्ये मँगनीजच्या अभावाची लक्षणे आढळून येताच मँगनीजयुक्त उर्वरक दिल्यास सकारात्मक परिणाम होतात. या पिकांमध्ये मँगनीजच्या अभावाची लक्षणे शुष्क भारात वाढ, उत्पादनात घट, रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे, उष्णता आणि कोरडेपणाच्या सहनशीलतेतील अभाव अशा स्वरुपात दिसून येतात.

कार्य:- मँगनीज रोपांच्या विविध जैविक प्रणालींमध्ये प्रमुख सहभागी घटक आहे. यात प्रकाश संश्लेषण, श्वसन, आणि नायट्रोजन परिपक्वता यांचा समावेश आहे. मँगनीज परागीभवन, परागनलिकेचा विकास, मुळावरील गाठींचा विस्तार आणि मुळाच्या रोगांना प्रतिरोध यासाठीही उपयुक्त असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Role of zinc in Plants

रोपांमध्ये झिंकची (जस्त) भूमिका:- झिंक (जस्त) हे आठ आवश्यक सूक्ष्म पोषक तातवानमधील एक असून अनेक एंझाइम्स आणि प्रोटीनचा महत्वपूर्ण घटक आहे. फक्त ते रोपांना कमी प्रमाणात लागते. ते अनेक प्रक्रियांमध्ये महत्वाची भूमिका बजावत असल्याने रोपांच्या विकासासाठी महत्वाचे असते. झिंकच्या अभावाने उत्पादनात 40% पर्यन्त घट होऊ शकते. त्यामुळे शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान होते आणि आय घटते.

झिंकचे कार्य :- झिंक काही प्रोटी\न्सच्या संश्लेषणासाठी जबाबदार असलेल्या एंझाइम्सना सक्रिय करते. त्याचा उपयोग क्लोरोफिल आणि काही कार्बोहायड्रेटसच्या निर्मितीत केला जातो. त्याच्यामुळे स्टार्चचे शर्करेत रूपांतरण होते आणि रोपाच्या उतकांमध्ये ते असल्याने रोपे थंड वातावरणात देखील उभी राहतात. विकासाचे नियंत्रण आणि खोडे वाढवणार्‍या ऑक्सिंसच्या निर्मितीत झिंक आवश्यक असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Role of Boron in Plants

रोपातील बोरानची भूमिका:- रोपांना बोरान (बी) जास्त प्रमाणात लागत नाही परंतु योग्य प्रमाणात ते न मिळाल्यास रोपाच्या विकासात गंभीर प्रश्न उभे राहतात. इतर सूक्ष्म पोषक तत्वांहून बोरान वेगळे असते. त्याच्या कमतरतेमुळे हिरवेपणाचा अभाव आढळून येत नाही. परंतु अन्य सूक्ष्म पोषक तत्वांप्रमाणे त्याच्यात विषारीपणाची लक्षणे आढळून येतात.

कार्य:- बोरान कोशिका भित्ति संश्लेषणात कॅल्शियमसह वापरले जाते आणि कोशिका विभाजन (नव्या रोपांच्या कोशिकांची निर्मिती) करण्यासाठी ते आवश्यक असते. प्रजनन विकासासाठी बोरान खूप उपयुक्त असते कारण ते परागण, फळ आणि बीजाच्या विकासास साह्य करते. त्याच्या अन्य कार्यांमध्ये शर्करा आणि कार्बोहायड्रेट, नायट्रोजन चयापचय, काही प्रोटीन्सची निर्मिती, हार्मोनच्या स्तराचे नियंत्रण आणि पोटॅशियमचे स्टोमाटामध्ये परिवहन (ज्यामुळे आंतरिक पाण्याचे संतुलन राखले जाते) यांचा समावेश होतो, बोरान शर्करा परिवहनात मदत करत असल्याने त्याच्या अभावी रोपांची मुळे झिरपतात आणि त्यांच्यातील शर्करा कमी होते. त्यामुळे माईकोराईज़ा बुरशीचे मुळाकडे आकर्षण आणि वसाहतीकरण कमी होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Use of FYM in Garlic Cultivation

लसूण पिकात शेणखताच्या वापराचा प्रयोग

शेतकर्‍याचे नाव:- मनीष पाटीदार

गाव:- कनारदी

तहसील आणि जिल्हा:- तराना और उज्जैन

राज्य :- मध्य प्रदेश

शेतकरी बंधु मनीष जी यांनी 1 एकर क्षेत्रात लसूणची लागवड केली आहे. शेताची मशागत करताना त्यांनी प्रचुर मात्रेत उत्तम प्रतीचे शेणखत वापरले आहे. त्यामुळे त्यांचे पीक निरोगी असून अद्याप कोणत्याही रोगाची लागण झालेली नाही.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

We wish you Happy New Year

ईश्वर सर्व आधुनिक शेतकरी बंधूंना नवीन वर्षात सुख , शांति, शक्ती, सम्पति, स्वरुप, संयम, साधेपणा, यश, समृध्दि, साधना, संस्कार, आणि आरोग्य देवो. ग्रामोफोन टिमतर्फे आपल्याला आणि आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या अनेक उत्तम शुभेच्छा!

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share