दुधी भोपळ्याच्या पेरणीची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण:-
- अंकुरण उत्तम होण्यासाठी बियाणे पेरणीपुर्वी 24-48 तास पाण्यात बुडवून ठेवावे.
- एक एकर जमीनिसाठी उन्नत वाणाचे 1 ते 1.5 कि. ग्रॅम बियाणे आवश्यक असते.
- एका खड्ड्यात चार ते पाच बिया पेराव्यात.
- बियान्यांचे अंकुरण झाल्यावर दोन आठवड्यांनी रोगट आणि कमी वाढ असलेल्या रोपांना उपटावे. त्यामुळे प्रत्येक खड्ड्यात 2 ते 3 निरोगी रोपे राहतील.
- संकरीत वाणाच्या आणि खासगी कंपनीच्या बियाण्यांचे एकरी प्रमाण 300-500 ग्रॅम असते. बियाण्याचे प्रमाण वाण आणि लागवडीच्या पद्धतीवर अवलंबुन असते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share