कारल्याच्या लागवडीची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण
- कारल्याच्या बियाण्याचे आवरण कठीण असल्याने 2-3 महिने जुने बियाणे रात्रभर थंड पाण्यात भिजत ठेवावे.
- बियाण्याच्या चांगल्या अंकुरणासाठी एक ते दोन दिवस ते ओल्या कापडात गुंडाळून ठेवावे.
- बियाण्याच्या अंकुरणानंतर लगेचच आळ्यांमध्ये बियाणे पेरावे.
- प्रत्येक आळ्यात 4-5 बिया पेराव्यात.
- 1.5 -2 किलो देशी बियाणे एक एकर जमीनिसाठी पुरेसे असते. संकरीत आणि खासगी कंपन्यांची उन्नत बियाणी 400-600 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात लागतात. बियाण्याचे प्रमाण वाण आणि पेरणीच्या पद्धतीनुसार ठरते.
- सामान्यता बियाणे थेट पेरणी पद्धतीने पेरले जाते.
- प्रत्येक आळ्यात 4-5 बिया 2 से.मी. खोलीवर पेराव्यात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share