मक्याच्या पिकातील अंगक्षय रोगाचे नियंत्रण
मक्यातील अंगक्षय हा बुरशीजन्य रोग पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये होतो. त्याची लक्षणे पानांवर आणि कणसावर आढळून येतात. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये पानांवर लांबूळक्या आकाराचे डाग पडतात. हे डाग मोठे होत जातात आणि त्यांचा रंग फिकट राखाडी असतो.
- पीक चक्र अवलंबल्याने पिकाच्या अवशेषातील रोगाचे नियंत्रण करता येते.
- शेतात खोल नांगरणी करून देखील रोगाचे नियंत्रण करता येते.
- उत्पादनाच्या हानीला आळा घालण्यासाठी बुरशीनाशक फवारावे.
- मॅन्कोझेब 75% WP 400 ग्रॅम किंवा मेटालेक्ज़ील 35% WS 150 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share