गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक पावले उचलली आहेत. यात अनुक्रमे, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा विमा उतरविला जावा, अशीही चर्चा सरकारने केली आहे. यावर लवकरच सरकार निर्णय घेणार आहे.
या विषयावर माध्यमांशी बोलताना, मध्य प्रदेशचे कृषिमंत्री कमल पटेल म्हणाले की, “पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा मिळेल, राज्य सरकार लवकरच हा निर्णय घेणार आहे.”
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मध्य प्रदेशात सुमारे 65 लाख शेतकरी आहेत आणि त्यांपैकी 36 लाख शेतकरी आपल्या पिकांचा विमा काढतात. पीक विमा प्रीमियम (हप्ता) 12% आहे, ज्यामध्ये शेतकरी सुमारे 2% रक्कम भरतो आणि उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकार एकत्रित करते. सध्याच्या काळात अधिकाधिक शेतकरी या योजनेत सामील झाल्यामुळे हप्त्यामध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे.
स्रोत: आय.ए.एन.एस.
Share