दुभत्या जनावरांचे लसीकरण:-
लसीकरणाने जनावरांची रोगप्रतिकारक्षमता वाढते. वेगवेगळ्या रोगांचे वाहक असलेल्या जीवाणु, विषाणु, परजीवी, प्रोटोझोआ आणि बुरशीच्या संक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण त्यांचे शरीर तयार करते.
क्र. | रोगाचे नाव | पहिली मात्रा देण्याचे वय | बुस्टर देण्यासाठी योग्य वेळ | नंतरच्या मात्रा |
1 | खुरकुत आणि लाळ्या रोग (एफएमडी) | 4 महिने किंवा त्याहून जास्त | पहिल्या मात्रेनंतर 1 महिना | सहा महिन्यांनंतर |
2 | रक्तस्रावी सेप्टिसिमीया (एचएस) |
6 महिने किंवा त्याहून जास्त | – | दरवर्षी किंवा साथ येण्याची शक्यता असल्यास |
3 | ब्लॅक क्वार्टर (बीक्यू) | 6 महिने किंवा त्याहून जास्त | – | दरवर्षी किंवा साठीची शक्यता असल्यास |
4 | ब्रूसीलोसिस | 4-8 महिने (केवळ माद्यांसाठी) |
– | आयुष्यात एकदाच |
5 | थेइलेरिओसिस (Theileriosis) | 3 महिने किंवा त्याहून जास्त | – | आयुष्यात एकदाच (फक्त क्रॉसब्रीड आणि विदेशी जनावरांसाठी) |
6 | अॅन्थ्रेक्स | 4 महिने किंवा त्याहून जास्त | दरवर्षी किंवा साथ येण्याची शक्यता असल्यास | |
7 | आय.बी. आर (IBR) | 3 महिने किंवा त्याहून जास्त | पहिल्या मात्रेनंतर 1 महिना | छह मासिक (वर्तमान में भारत में टीका नहीं बनाई गई) |
8 | रेबीज (फक्त चावल्यावर) | चावल्यावर लगेचच | चौथ्या दिवशी | पहिल्या मात्रेनंतर 7 व्या, 14 व्या, 28 व्या आणि 90 व्या दिवशी |
माहिती असणे आवश्यक असलेल्या मुख्य बाबी
- लसीकरण्याच्या वेळी जनावर निरोगी असणे आवश्यक आहे.
- आधीपासून कोणत्याही कारणाने वाईट हवामान, चारा-पाण्याचा अभाव, रोगाची लागण, प्रवास अशा कोणत्याही कारणाने तणावाखाली असलेल्या जनावरांचे लसीकरण करू नये.
- लसीकरणाच्या एक ते दोन आठवडे पूर्वी जनावरांचे डी -वार्मिंग करावे.
- पशुवैद्य किंवा विशेषज्ञाच्या लसीकरणाच्या संबंधातील सल्ल्यांचे काटेकोर पालन करावे.
- लसीची उत्पादक कंपनी, बॅच नंबर, एक्स्पायरी डेट, मात्रा इत्यादीबाबत नोंदी ठेवाव्यात.
- लसीकरण केल्यावर जनावरांसाठी तणावमुक्त वातावरण बनवा.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share