Greening in Potato Tubers

बटाट्याच्या कंदातील हिरवेपणा –

  • हा बटाट्यामधील शारीरिक रोग आहे. तो बटाट्याचे कंद प्रकाशाच्या संपर्कात आल्याने होतो.
  • बटाट्याच्या पिकाला मातीने न झाकल्यास बटाट्याच्या कंदाचा वरील भाग सतत प्रकाशाच्या संपर्कात येत राहतो. त्यामुळे त्यात हिरवेपणा आढळू लागतो.
  • बटाट्याची साठवण घरात प्रकाश असलेल्या जागी केल्यास कंदात हिरवेपणा आढळून येऊ लागतो.
  • कच्च्या बटाट्यात सोलेनिन नावाचे रसायन निर्माण झाल्याने बटाट्यात हिरवेपणा येतो. त्यामुळे बटाट्याला कडवट चव येते.

खबरदारी –

  • कच्चे बटाटे खाऊ नयेत.
  • बटाट्याच्या पिकात कंद बनण्याची सुरुवात होताना (पेरणीनंतर 35-40 दिवसांनंतर) मातीने बटाटे झाकावेत, जेणेकरून बटाट्याचे कंद प्रकाशाच्या संपर्कात येणार नाहीत.
  • बटाट्याची साठवण अंधार्‍या जागी करावी. साठवणीच्या जागी कोठून प्रकाश येत असल्यास ते बंद करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>