Prevention/Control/Treatment of Mastitis

स्तन शोथ रोगापासून बचाव/प्रतिबंध/उपचार:-

स्तन शोथ रोगामुळे होणार्‍या आर्थिक हानीच्या मूल्यमापनातून आश्चर्यकारक तथ्य समोर आले आहे की हा रोग प्रत्यक्षपणे जेवढी हानी करतो त्याहून अनेकपट जास्त अप्रत्यक्ष आर्थिक हानी  पशुपालकांना सोसावी लागते. काही वेळा  स्तन शोथ रोगाची लक्षणे प्रकट आढळून येत नाहत पण दुधातील घट, दुधाच्या गुणवत्तेतील घट आणि पाझर आटल्यावर जनावराच्या (ड्राय काऊ) स्तनाला जी आंशिक किंवा पूर्ण हानी होते ती पुढील वेताच्या वेळी समजून येते.

नियंत्रण:-

  • जनावरे बांधण्याची/ बसण्याची आणि धार काढण्याची जागा स्वच्छ राहील याकडे विशेष लक्ष द्यावे.
  • धार काढण्यासाठी योग्य तंत्र वापरावे. त्यामुळे आचळाला कोणतीही इजा होऊ नये.
  • आचळाला झालेल्या कोणत्याही इजेवर (किरकोळ खरचटणे देखील) योग्य उपचार तातडीने करावेत.
  • धार काढण्यापूर्वी आणि धार काढल्यावर आचळ औषधी द्रावणाने (पोटॅशियम परमॅगनेट 1:1000 किंवा क्लोरहेक्सिडीन 0.5  प्रतिशत) स्वच्छ करावेत.
  • दुधाची धार केव्हाही जमिनीवर मारू नये.
  • वेळोवेळी दुधाची तपासणी (काळ्या भांड्यात धार धरून किंवा प्रयोगशाळेत) करून घ्यावी.
  • पाझर आटलेल्या जनावराचे उपचार केल्यास वेतानंतर स्तन शोथ रोग होण्याची शक्यता जवळपास संपते. त्यासाठी पशुवैद्याशी संपर्क साधावा.
  • रोगी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे आणि त्यांची धार देखील वेगळी काढावी. असे करणे शक्य नसल्यास रोगी जनावराची धार सर्वात शेवटी काढावी.

उपचार:-

रोगाचा यशस्वी उपचार करणे सुरुवातीच्या अवस्थेतच शक्य असते. अन्यथा रोग वाढल्यास आचळ वाचवणे अवघड जाते. त्यापासून वाचण्यासाठी दुधाळ जनावराच्या दुधाची तपासणी वेळोवेळी करवून घेऊन जीवाणुनाशक औषधांचे उपचार पशुवैद्यांकडून करून घ्यावेत. सहसा ही औषधे आचळात नळीद्वारे किंवा मांसपेशीत इंजेक्शनद्वारे दिली जातात.

आचळात नळीने औषधे देण्याचे उपचार सुरू असताना जनावराचे दूध पिण्यायोग्य नसते. त्यामुळे अशा औषधाची शेवटची मात्रा दिल्यावर 48 तासापर्यंत त्या जनावराचे दूध वापरू नये. उपचार मधेच न सोडता पूर्ण करणे देखील अत्यावश्यक असते. त्याशिवाय किमान चालू वेतात जनावर पुन्हा सामान्य दूध देऊ लागेल अशी आशा ठेवू नये.

प्रतिबंध:-

स्तन शोथ रोगाच्या प्रभावी प्रतिबंधासाठी खबरदारीचे पुढील उपाय योजावेत:

  • दुभत्या जनावरांच्या राहण्याच्या जागेची नियमित साफसफाई आवश्यक आहे. त्यासाठी फिनाईल किंवा अमोनिया कम्पाउन्ड फवारावे.
  • धार काढल्यानंतर आचळाची सफाई करण्यासाठी लाल पोटाश किंवा सेव्हलोन वापरता येईल.
  • दुभत्या जनावरांचा पान्हा आटल्यास ड्राय थेरेपीद्वारे योग्य ते उपाय करावेत.
  • स्तन शोथ झाल्यास तातडीने पशुवैद्याचा सल्ला घेऊन औषधोपचार करावेत.
  • निश्चित कालावधीनंतर धार काढावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>