Vaccination For Dairy Animals

दुभत्या जनावरांचे लसीकरण:-

लसीकरणाने जनावरांची रोगप्रतिकारक्षमता वाढते. वेगवेगळ्या रोगांचे वाहक असलेल्या जीवाणु, विषाणु, परजीवी, प्रोटोझोआ आणि बुरशीच्या संक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण त्यांचे शरीर तयार करते.

क्र. रोगाचे नाव पहिली मात्रा देण्याचे वय बुस्टर देण्यासाठी योग्य वेळ नंतरच्या मात्रा
1 खुरकुत आणि लाळ्या रोग (एफएमडी) 4 महिने किंवा त्याहून जास्त पहिल्या मात्रेनंतर 1 महिना सहा महिन्यांनंतर
2 रक्तस्रावी
सेप्टिसिमीया (एचएस)
6 महिने किंवा त्याहून जास्त दरवर्षी किंवा साथ येण्याची शक्यता असल्यास
3 ब्लॅक क्वार्टर (बीक्यू) 6 महिने किंवा त्याहून जास्त दरवर्षी किंवा साठीची शक्यता असल्यास
4 ब्रूसीलोसिस 4-8 महिने
(केवळ माद्यांसाठी)
आयुष्यात एकदाच
5 थेइलेरिओसिस (Theileriosis) 3 महिने किंवा त्याहून जास्त आयुष्यात एकदाच  (फक्त क्रॉसब्रीड आणि विदेशी जनावरांसाठी)
6 अ‍ॅन्थ्रेक्स 4 महिने किंवा त्याहून जास्त दरवर्षी किंवा साथ येण्याची शक्यता असल्यास
7 आय.बी. आर (IBR) 3 महिने किंवा त्याहून जास्त पहिल्या मात्रेनंतर 1 महिना छह मासिक (वर्तमान में भारत में टीका नहीं बनाई गई)
8 रेबीज (फक्त चावल्यावर) चावल्यावर लगेचच चौथ्या दिवशी पहिल्या मात्रेनंतर 7 व्या, 14 व्या, 28 व्या आणि 90 व्या दिवशी

माहिती असणे आवश्यक असलेल्या मुख्य बाबी

  • लसीकरण्याच्या वेळी जनावर निरोगी असणे आवश्यक आहे.
  • आधीपासून कोणत्याही कारणाने वाईट हवामान, चारा-पाण्याचा अभाव, रोगाची लागण, प्रवास अशा कोणत्याही कारणाने तणावाखाली असलेल्या जनावरांचे लसीकरण करू नये.
  • लसीकरणाच्या एक ते दोन आठवडे पूर्वी जनावरांचे डी -वार्मिंग करावे.
  • पशुवैद्य किंवा विशेषज्ञाच्या लसीकरणाच्या संबंधातील सल्ल्यांचे काटेकोर पालन करावे.
  • लसीची उत्पादक कंपनी, बॅच नंबर, एक्स्पायरी डेट, मात्रा इत्यादीबाबत नोंदी ठेवाव्यात.
  • लसीकरण केल्यावर जनावरांसाठी तणावमुक्त वातावरण बनवा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share