Signs of Boron deficiency in the crop and ways to prevent it

पिकातील बोरॉनच्या अभावाची लक्षणे आणि बचावाचे उपाय

  • वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळ्या अवस्थांमध्ये बोरॉनच्या अभावाची वेगवेगळी लक्षणे दिसतात. सामान्यता त्याची लक्षणे नवीन पानांवर दिसतात.
  • बोरॉनच्या अभावाने नवीन पाने जाड आणि रंगविहीन होतात.
  • बोरॉनच्या तीव्र अभावाने रोपाचा शेंडा गळू लागतो. अनेक पिकात फळे गळणे बोरॉनच्या अभावाचे लक्षण असते.
  • बोरॉनचा अभाव सामान्यता अधिक pH स्तर असलेल्या मातीत आढळून येतो कारण अशा मातीत बोरॉन पुरेशा प्रमाणात असले तरी रोपांना मिळत नाही.
  • कमी कार्बनिक पदार्थ असलेली माती (<1.5%) किंवा रेताड माती (जिच्यातील पोषक तत्वे विरचनाने नष्ट होतात) यांच्यातही बोरॉनचा अभाव असतो.

बोरॉनच्या अभावापासून बचावाचे उपाय:-

  • जास्त pH स्तर असलेल्या मातीत पीक पेरु नये.
  • कोरड्या मातीत जास्त दमट वातावरण बोरॉनची उपलब्धता कमी करते.
  • प्रमाणाबाहेर उर्वरके आणि चुना वापरू नये.
  • जास्त सिंचन करू नये.
  • मातीचे नियमित परीक्षण करून आपल्या शेतातील पोषक तत्वांच्या पातळीबाबत पूर्ण माहिती मिळवत राहावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Boron deficiency in tomato

टोमॅटोमधील बोरॉनच्या अभावाची लक्षणे

  • बोरॉनच्या अभावाने पाने फिकट पिवळ्या रंगाची होतात.
  • बोरॉनच्या अभावाने दिसणारी लक्षणे कॅल्शियमच्या अभावाच्या लक्षणासारखी असतात.
  • पाने ठिसुळ होतात आणि सहजपणे तुटतात.
  • त्याशिवाय पुरेसे पाणी देऊनही रोपात पाण्याच्या अभावाची लक्षणे दिसतात.
  • बोरॉन 20% ईडीटीए @ 200 ग्रॅम/एकर पानांवर फवारल्याने बोरॉनचा अभाव दूर होतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Boron deficiency symptoms and control in watermelon

कलिंगडाच्या पिकातील बोरॉनच्या अभावाची लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना

  • कोवळी पाने आकसलेली आणि सर्वसामान्य पानांहून लहान असतात.
  • पानांवर पिवळी झाक येते. ती टोकांच्या जवळ जास्त गडद असते.
  • नवीन कोवळ्या पानांची टोके सुकलेली दिसतात.
  • खोडाचा पृष्ठभाग फाटू लागतो आणि वेलांची लांबी कमी होते.
  • वेलीचा विकास थांबतो आणि ती खुरटलेली राहते.
  • वेलीचा शेंडा मरतो आणि फुले व फळांच्या संख्येत घट येते.
  • फळातील पोकळपणा हे बोरॉनच्या अभावाचे मुख्य लक्षण आहे.
  • शेतात प्रमाणाबाहेर ओल असल्यास किंवा pH अधिक असल्यास सहसा असे होते.

नियंत्रण:-

  • बोरॉनयुक्त कॅल्शियम नायट्रेट 25 किलो प्रति एकर या प्रमाणात मातीतून द्यावे.
  • फॉस्फरस विरघळवणारे जिवाणू 4 किलो प्रति एकर या प्रमाणात द्यावेत.
  • बोरॉन 20% @ 200 ग्रॅम प्रति एकर फुलोरा येण्याच्या अवस्थेत दोन वेळा फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Role of Boron in Plants

रोपातील बोरानची भूमिका:- रोपांना बोरान (बी) जास्त प्रमाणात लागत नाही परंतु योग्य प्रमाणात ते न मिळाल्यास रोपाच्या विकासात गंभीर प्रश्न उभे राहतात. इतर सूक्ष्म पोषक तत्वांहून बोरान वेगळे असते. त्याच्या कमतरतेमुळे हिरवेपणाचा अभाव आढळून येत नाही. परंतु अन्य सूक्ष्म पोषक तत्वांप्रमाणे त्याच्यात विषारीपणाची लक्षणे आढळून येतात.

कार्य:- बोरान कोशिका भित्ति संश्लेषणात कॅल्शियमसह वापरले जाते आणि कोशिका विभाजन (नव्या रोपांच्या कोशिकांची निर्मिती) करण्यासाठी ते आवश्यक असते. प्रजनन विकासासाठी बोरान खूप उपयुक्त असते कारण ते परागण, फळ आणि बीजाच्या विकासास साह्य करते. त्याच्या अन्य कार्यांमध्ये शर्करा आणि कार्बोहायड्रेट, नायट्रोजन चयापचय, काही प्रोटीन्सची निर्मिती, हार्मोनच्या स्तराचे नियंत्रण आणि पोटॅशियमचे स्टोमाटामध्ये परिवहन (ज्यामुळे आंतरिक पाण्याचे संतुलन राखले जाते) यांचा समावेश होतो, बोरान शर्करा परिवहनात मदत करत असल्याने त्याच्या अभावी रोपांची मुळे झिरपतात आणि त्यांच्यातील शर्करा कमी होते. त्यामुळे माईकोराईज़ा बुरशीचे मुळाकडे आकर्षण आणि वसाहतीकरण कमी होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share