आपल्या मूग पिकासाठी पुढील कार्य

पेरणीनंतर 1 ते 2 दिवस – पिकाला प्राथमिक पोषक तत्त्व पुरवण्यासाठी

पेरणीनंतर प्रथम सिंचन द्या आणि खालील प्रमाणे खताचा मूलभूत डोस द्या. हे सर्व मिसळा आणि मातीमध्ये पसरवा- डीएपी 40 किलो, एमओपी 20 किलो + पीके बॅक्टेरिया (प्रो कॉम्बिमॅक्स) 1 किलो + राईझोबियम (जेव वाटिका आर) 1 किलो + ह्यूमिक ऍसिड + सीविड + अमीनो +मायकोरायझा (मॅक्समायको) प्रति एकर 2 किलो.

Share

टरबूज पिकामध्ये ब्लॉसम एंड रॉटचे नुकसान

Damages of Blossom and rot in watermelon crop
  • टरबूजच्या फळांमध्ये कधीकधी खोल सडलेले ठिपके असतात त्यामुळे त्यांची सुरकुत्यासारखी रचना तयार होते.
  • हे सहसा सिंचनाच्या अयोग्य अंतरामुळे होते.
  • जेव्हा शेतीची माती खूप कोरडी होते,आणि कॅल्शियम मातीतच राहते त्यामुळे झाडे उपलब्ध होत नाहीत.
  • हे रोखण्यासाठी, प्रति एकर 10 किलो कॅल्शियम नायट्रेट वापरा.
Share

टोमॅटोच्या पिकासाठी खते आणि उर्वरकांची मात्रा

टोमॅटोच्या पिकासाठी खते आणि उर्वरकांची मात्रा

  • टोमॅटोच्या चांगल्या उत्पादनासाठी अधिक उर्वरकांची आवश्यकता असते.
  • पुनर्रोपणापूर्वी एक महिना शेतात 8-10 टन प्रति एकर या प्रमाणात शेणखत मिसळावे.
  • डीएपी 50 किलो/एकर, युरिया 80 किलों प्रति एकर आणि म्यूरेट ऑफ पोटाश 33 किलो /एकर या प्रमाणात वापरावे.
  • रोपांचे पुनर्रोपण करण्यापूर्वी युरियाची अर्धी मात्रा आणि डीएपी आणि म्यूरेट ऑफ पोटाशची पूर्ण मात्रा शेतात मिसळावी.
  • पुनर्रोपणानंतर 20-25 दिवसांनी युरियाची दूसरी मात्रा आणि 45-60 दिवसांनी तिसरी मात्रा द्यावी.
  • झिंक सल्फेटची 10 किलो/एकर आणि बोरॉनची 4 किलो/एकर मात्रा उत्पादन वाढवण्यासह गुणवत्तेत सुधार घडवून आणते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient Management in Okra Crop

भेंडीच्या पिकामधील पोषक तत्वांचे व्यवस्थापन:-

  • 15 से 20 टन/हे. उत्तम प्रतीचे शेणखत, 80 कि.ग्रॅ. नत्र (200 किलो यूरिया), 60 कि. ग्रॅ. फॉस्फरस (400 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 60 कि.ग्रॅ.  पोटाश (100 किलो म्यूरेट ऑफ़ पोटाश ) प्रति हेक्टर या प्रमाणात मात्रा द्याव्यात.
  • शेणखत, फॉस्फरस आणि पोटाशची संपूर्ण मात्रा तसेच नायट्रोजनची एक तृतीयांश मात्रा शेताची अंतिम मशागत करताना मातीत चांगल्या प्रकारे मिसळावे.
  • बियाणे पेरल्यावर 20 दिवसांनी नायट्रोजनची एक तृतीयांश मात्र द्यावी आणि उरलेली एक तृतीयांश मात्र पेरणीनंतर 40 दिवसांनी ओळीत पेरून द्यावी.
  • संकरीत वाणांसाठी सुयोग्य मात्रा -150 कि. ग्रॅ. नायट्रोजन (300 किलो यूरिया), 120 कि. ग्रॅ. फॉस्फरस( 800 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 75 कि. ग्रॅ. पोटाश (100 किलो म्यूरेट ऑफ़ पोटाश) प्रति/हेक्टर अशी आहे.
  • यापैकी 30% नत्र, 50% स्फूर आणि पोटाशची मात्रा मूळ खताच्या स्वरुपात द्यावी.
  • उरलेल्यापैकी 50% फॉस्फरस, 40% नायट्रोजन आणि 25% पोटाशची मात्रा पेरणीनंतर 28 दिवसांनी आणि त्यानंतर उरलेली मात्रा पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrition management in cowpea

चवळईसाठी शेताची मशागत

  • चांगल्या उत्पन्नासाठी शेतात एकदा खोल नांगरणी करून आणि 2-3 वेळा वखर फिरवून माती भुसभुशीत करून घ्यावी.
  • शेताला सोयिस्कर आकाराच्या भूखंडात विभाजित करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizer requirements in makkhan grass

चार्‍यासाठीच्या मक्खन घास गवताला किती उर्वरके द्यावीत

  • जमिनीच्या मशागतीच्या वेळी शेणखत/कम्पोस्ट @ 6-8 टन/एकर, यूरिया – 65 किग्रॅ प्रति एक, एसएसपी – 20 किलो प्रति एकर या प्रमाणात मातीत मिसळावे.
  • प्रत्येक कापणीनंतर 65 किलो यूरिया प्रति एकर वापरावा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Zinc solubilizing bacteria in snake gourd

पडवळ/ काकडीच्या पिकासाठी झिंक विरघळवणार्‍या जिवाणूंचे महत्त्व

झिंक विरघळवणारे जिवाणू नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले लाभडायक जिवाणू असतात. ते कार्बनिक अॅसिड वापरुन जमिनीतील अकार्बनिक झिंकला विरघळणारे बनवून रोपांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे रोपांच्या वाढीला मदत होते.

  • या जिवाणूंचा वापर विशेषता झिंकच्या अभावामुळे होणार्‍या तांदळातील खैरा रोगासारखे रोग आणि टोमॅटो, कांदा, गहू, भेंडी इत्यादींमध्ये केला जातो.
  • त्यांच्यामुळे पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढते.
  • ते हार्मोन्स गतिविधिना चालना देतात.
  • रोपे आणि मुळांच्या वाढीस ते चालना देतात.
  • ते प्रकाश संश्लेषण वाढवते.
  • मातीत हे जिवाणू असल्याने मातीची उर्वरकता वाढते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Boron deficiency symptoms and control in watermelon

कलिंगडाच्या पिकातील बोरॉनच्या अभावाची लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना

  • कोवळी पाने आकसलेली आणि सर्वसामान्य पानांहून लहान असतात.
  • पानांवर पिवळी झाक येते. ती टोकांच्या जवळ जास्त गडद असते.
  • नवीन कोवळ्या पानांची टोके सुकलेली दिसतात.
  • खोडाचा पृष्ठभाग फाटू लागतो आणि वेलांची लांबी कमी होते.
  • वेलीचा विकास थांबतो आणि ती खुरटलेली राहते.
  • वेलीचा शेंडा मरतो आणि फुले व फळांच्या संख्येत घट येते.
  • फळातील पोकळपणा हे बोरॉनच्या अभावाचे मुख्य लक्षण आहे.
  • शेतात प्रमाणाबाहेर ओल असल्यास किंवा pH अधिक असल्यास सहसा असे होते.

नियंत्रण:-

  • बोरॉनयुक्त कॅल्शियम नायट्रेट 25 किलो प्रति एकर या प्रमाणात मातीतून द्यावे.
  • फॉस्फरस विरघळवणारे जिवाणू 4 किलो प्रति एकर या प्रमाणात द्यावेत.
  • बोरॉन 20% @ 200 ग्रॅम प्रति एकर फुलोरा येण्याच्या अवस्थेत दोन वेळा फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizer requirements in muskmelon

खरबूजाच्या पिकासाठी उर्वरकांची मात्रा

  • जमिनीची मशागत करताना दर एकरात 10-15 टन शेणखत/ कम्पोस्ट मिसळावे.
  • यूरिया 110 किग्रॅ, सिंगल सुपर फॉस्फेट 155 किग्रॅ, आणि म्यूरेट ऑफ पोटाश 40 किग्रॅ वापरावे.
  • बियाणे पेरण्यापूर्वी एसएसपी, म्यूरेट ऑफ पोटाशची पूर्ण आणि यूरियाची एक तृतीयांश मात्रा द्यावी.
  • मुळांजवळ आणि खोडांपासुन दूर यूरियाची उरलेली मात्रा वापरावी आणि सुरुवातीच्या विकासाच्या काळात मातीत चांगल्या प्रकारे मिसळावे.
  • पीक 10-15 दिवसांचे झाल्यावर गुणवत्ता वाढीसाठी आणि पिकाच्या चांगल्या वाढीसाठी 19:19:19 + माइक्रोन्यूट्रिएंट @ 2-3 ग्रॅम/ लीटर पाणी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizer dose in bitter gourd

कारल्याच्या पिकासाठी उर्वरकांची मात्रा

  • उर्वरकांचा वापर मातीची उर्वरता, वातावरण आणि लागवडीचा हंगाम यावर अवलंबून असते.
  • जमिनीची मशागत करताना एकरी 6-8 टन शेणखत/ कंपोस्ट खत मातीत चांगल्या प्रकारे मिसळावे.
  • एक एकरासाठी युरिया 30-40 किलो, डीएपी 35-50 किलो आणि एमओपी 20-40 किलो वापरावे.
  • लागवड करण्यापूर्वि युरियाची अर्धी आणि डीएपीची संपूर्ण मात्रा आणि पूर्ण एमओपी वापरावे. उरलेली युरियाची अर्धी मात्रा समान भागात विभागून पेरणीनंतर 15 दिवसांनी आणि पेरणीनंतर 30 दिवसांनी अशी दोनदा द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share