पतंग (डायमण्ड बॅक मोथ किंवा कॅबेज मोथ)
ओळखण्याची लक्षणे
- अंडी पांढऱ्या-पिवळ्या आणि फिकट हिरव्या रंगाची असतात.
- अळ्या 7-12 मिमी लांब, फिकट पिवळ्या-हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यांच्या संपूर्ण अंगावर सूक्ष्म रोम असतात.
- वाढ झालेले किडे 8-10 मिमी लांब, मातकट करड्या रंगाचे असतात. त्यांचे पंख फिकट गव्हाळ रंगाचे, पातळ असतात आणि त्यांच्या कडा आतील बाजूने पिवळ्या असतात.
- वाढ झालेल्या माद्या पानांवर एक एक किंवा समूहात अंडी घालतात.
- त्यांच्या पंखांवर पांढऱ्या रेषा असतात. पंख मुडपल्यावर त्यांच्यापासून हिऱ्यासारखी आकृती तयार झालेली दिसते.
हानी
- लहान, सडपातळ, हिरव्या अळ्या अंड्यातून बाहेर निघाल्यावर पानांच्या बाहेरील बाजूचा पृष्ठभाग खाऊन त्यांच्यात भोके पाडतात.
- हल्ला तीव्र असल्यास पानांच्या शिरांच्या फक्त जाळ्या शिल्लक राहतात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share