Why, when and how to add mycorrhiza in the field :- 

शेतात मायकोरायझा का, केव्हा आणि कसे घालावेत

शेतात मायकोरायझा का, केव्हा आणि कसे घालावेत

  • मायकोरायझा रोपांच्या मूळसंस्थेच्या वाढ आणि विकासासाठी साहाय्य करतात.
  • ते मातीतील फॉस्फेट पिकापर्यंत पोहोचवण्यास मदत करतात.
  • ते मातीतील नायट्रोजन, पोटॅशियम,लोह, मॅंगनीज,मॅग्नेशियम, तांबे,जस्त, बोरॉन, सल्फर आणि मोलिब्डेनम यासारख्या पोषक तत्वांना मुळांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे रोपांना अधिक मात्रेत पोषक तत्वे मिळतात.
  • ते रोपांना चिवट बनवतात. त्यामुळे रोपे अनेक रोग, पाण्याचा अभाव इत्यादी काही अंशी सहन करू शकतात.
  • ते पिकाची प्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढते.
  • मायकोरायजा मुळांचा पसारा वाढवतात. त्यामुळे पीक जास्त जागेतून पाणी शोषू शकते.
  • मृदा उपचार –  50 किलो उत्तम प्रतीचे शेणखत/कम्पोस्ट खत/गांडूळ खत/ शेतातील मातीत @ 4 किलो मायकोरायजा मिसळून ती मात्रा पेरणी/ पुनर्रोपणापूर्वी मातीत मिसळावी.
  • पेरणीनंतर 25-30 दिवसांनी उभ्या पिकात वरीलप्रमाणे मिश्रण भुरभुरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>