फुलकोबीवरील डायमण्ड बॅक मोथची अळी
ओळख:-
- अंडी पांढरट पिवळी आणि फिकट हिरव्या रंगाची असतात.
- अळ्या 7-12 मिमी. लांब, फिकट पिवळट हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यांच्या संपूर्ण शरीरावर बारीक रोम असतात.
- वाढ झालेले किडे 8-10 मिमी. लांब, मातकट करड्या रंगाचे असतात आणि त्यांचे पंख फिकट गव्हाळ रंगाचे असतात आणि त्यांच्या आतील कडा पिवळ्या असतात.
- वाढलेल्या माद्या पानांवर समूहाने अंडी घालतात.
- पंखांवर पांढर्या रेषा असतात. पंख मिटल्यावर हिर्याचा आकार दिसतो.
नुकसान:-
- लहान, सडपातळ हिरव्या अळ्या अंड्यातून निघाल्यावर पानांचा बाहेरील पृष्ठभाग खाऊन त्यात भोके पाडतात.
- तीव्र हल्ला झाल्यावर पानांचा फक्त सांगाडा उरतो.
नियंत्रण:-
डायमण्ड बॅक मोथ रोखण्यासाठी फुलकोबीच्या प्रत्येक 25 ओळींनंतर 2 ओळी बोल्ड मोहरीच्या लावाव्यात. प्रोफेनोफ़ोस (50 र्इ.सी.) 3 मि.ली. प्रति लीटर पाणी मिश्रण फवारावे. स्पायनोसेड (25 एस. सी.) 0.5 मि.ली. प्रति ली. किंवा ईंडोक्साकार्ब 1.5 मि.ली. प्रति ली पाणी मिश्रण फवारावे. पहिली फवारणी पेरणीनंतर 25 दिवसांनी आणि दुसरी त्यानंतर 15 दिवसांनी करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share