फुलकोबी आणि पानकोबीवरील आल्टर्नेरिआ (पानांवरील डागांचा रोग):-
लक्षणे:-
- पानांवर लहान गडद पिवळ्या रंगाचे ठिपके उमटतात.
- लवकरच हे ठिपके एकमेकात मिसळून निळसर गोल व्रण बनवतात.
- या डागांच्या मध्यभागी केंद्रामध्ये निळसर रंगाची बुरशी वाढते.
- लागण तीव्र झाल्यावर सर्व पाने गळून पडतात.
- रोगग्रस्त फुलांवर आणि पानांवर गडद जांभळे, काळे-करडे डाग दिसतात.
नियंत्रण:-
- प्रमाणित बियाणी वापरावी.
- गरम पाण्यात (50OC) बीजसंस्करण करावे.
- रोगाची लक्षणे दिसू लागताच मेन्कोजेब 3 ग्राम प्रति ली. पाण्याचे किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईड 3 ग्राम प्रति लीटर पाण्याचे मिश्रण बनवून 10-15 दिवसांच्या अंतराने फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share