फुलकोबीवरील पतंगाचे (डायमण्ड बॅक मोथ किंवा कॅबेज मोथ) नियंत्रण
- डायमण्ड बॅक मोथच्या नियंत्रणासाठी फुलकोबीच्या प्रत्येक 25 ओळींनंतर 2 ओळी बोल्ड मोहरीच्या लावाव्यात.
- प्रोफेनोफॉस (50 ई.सी.) 500 मिली/ एकर किंवा सायपरमेथ्रिन 4% ईसी + प्रोफेनोफॉस 40% ईसी @ 400 मिली/ एकर या प्रमाणात मिश्रण बनवून फवारावे.
- स्पायनोसेड (25 एस.सी.) 100 मिली/ एकर किंवा ईंडोक्साकार्ब 300 मिली/ एकर किंवा इमामेक्टिन बेंझोएट @ 100 ग्रॅम/ एकर पाण्यात मिश्रण करून फवारावे. पेरणीनंतर 25व्या दिवशी पहिली फवारणी करावी आणि त्यानंतर 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
- जैविक नियंत्रणासाठी बेवेरिया बैसियाना @ 1 किलो/ एकर वापरावे.
- टीप:- प्रत्येक फवारणीच्या वेळी स्टीकर मिसळणे आवश्यक असते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share