- रोपवाटिका बनवताना, प्रत्येक चौरस मीटरवर 8-10 किलो दराने शेणखत मिसळा. 25 ग्रॅम ट्राईकोडर्मा विरिडी रोगाच्या आजारापासून बचाव करण्यासाठी प्रति चौरस मीटर दराने मिसळणे.
- परजीवी रोगाने झाडांच्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी 3 ग्रॅम मेटालैक्सिल 4% + मैन्कोजेब 64% डब्ल्यू.पी. किंवा 2 ग्रॅम / लिटर पाण्यात थायोफिनेट मिथाइल 75 डब्ल्यू.पी. बनवून भिजवणे.
- नर्सरीच्या तयारी दरम्यान थायोमेथोक्सम 0.5 ग्रॅम प्रति चौरस मीटर 25% डब्ल्यू.जी. दराने औषधांंची लागवड करावी.
How to Control Cauliflower Diamondback moth
फुलकोबीवरील पतंगाचे (डायमण्ड बॅक मोथ किंवा कॅबेज मोथ) नियंत्रण
- डायमण्ड बॅक मोथच्या नियंत्रणासाठी फुलकोबीच्या प्रत्येक 25 ओळींनंतर 2 ओळी बोल्ड मोहरीच्या लावाव्यात.
- प्रोफेनोफॉस (50 ई.सी.) 500 मिली/ एकर किंवा सायपरमेथ्रिन 4% ईसी + प्रोफेनोफॉस 40% ईसी @ 400 मिली/ एकर या प्रमाणात मिश्रण बनवून फवारावे.
- स्पायनोसेड (25 एस.सी.) 100 मिली/ एकर किंवा ईंडोक्साकार्ब 300 मिली/ एकर किंवा इमामेक्टिन बेंझोएट @ 100 ग्रॅम/ एकर पाण्यात मिश्रण करून फवारावे. पेरणीनंतर 25व्या दिवशी पहिली फवारणी करावी आणि त्यानंतर 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
- जैविक नियंत्रणासाठी बेवेरिया बैसियाना @ 1 किलो/ एकर वापरावे.
- टीप:- प्रत्येक फवारणीच्या वेळी स्टीकर मिसळणे आवश्यक असते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareCauliflower Diamondback moth
पतंग (डायमण्ड बॅक मोथ किंवा कॅबेज मोथ)
ओळखण्याची लक्षणे
- अंडी पांढऱ्या-पिवळ्या आणि फिकट हिरव्या रंगाची असतात.
- अळ्या 7-12 मिमी लांब, फिकट पिवळ्या-हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यांच्या संपूर्ण अंगावर सूक्ष्म रोम असतात.
- वाढ झालेले किडे 8-10 मिमी लांब, मातकट करड्या रंगाचे असतात. त्यांचे पंख फिकट गव्हाळ रंगाचे, पातळ असतात आणि त्यांच्या कडा आतील बाजूने पिवळ्या असतात.
- वाढ झालेल्या माद्या पानांवर एक एक किंवा समूहात अंडी घालतात.
- त्यांच्या पंखांवर पांढऱ्या रेषा असतात. पंख मुडपल्यावर त्यांच्यापासून हिऱ्यासारखी आकृती तयार झालेली दिसते.
हानी
- लहान, सडपातळ, हिरव्या अळ्या अंड्यातून बाहेर निघाल्यावर पानांच्या बाहेरील बाजूचा पृष्ठभाग खाऊन त्यांच्यात भोके पाडतात.
- हल्ला तीव्र असल्यास पानांच्या शिरांच्या फक्त जाळ्या शिल्लक राहतात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareHow to Control Downy Mildew in Cauliflower:-
फुलकोबीमधील मर रोगाची (डाउनी मिल्ड्यू) लक्षणे
- खोडावर भुरकट दबलेले डाग आढळतात. त्यांच्यात बुरशीचा पांढरा भुरा वाढतो.
- पानांच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावर जांभळ्या भुरकट रंगाचे डाग आढळतात. त्यांच्यातही बुरशीचा भुरा वाढतो.
- या रोगामुळे फुलकोबीचा शेंडा संक्रमित होऊन नासतो.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareWhat’s the Symptoms of Downy Mildew in Cauliflower:-
मिरचीवरील जिवाणूजन्य पानचट्टा (बॅक्टरीअल लीफ स्पॉट) रोगाचे नियंत्रण
- शेतातील जुन्या पिकाचे अवशेष नष्ट करावेत तसेच रोगमुक्त झाडांपासून बियाणे घ्यावे.
- जिच्यात अनेक वर्षे मिरचीची लागवड केलेली नाही अशी माती नर्सरीत वापरावी.
- स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट आयपी 90% डब्ल्यू/डब्ल्यू + टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराइड आयपी 10% डब्ल्यू / डब्ल्यू @ 20 ग्रॅम प्रति एकर फवारावे किंवा
- कसुगामायसिन 3% एसएल @ 30 मिली प्रति एकर किंवा
- कसुगामायसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराइड 45% डब्ल्यूपी @ 250 ग्रॅम प्रति एकर वापरावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareHow to Control Cauliflower Diamondback moth:-
फूलकोबीवरील डायमंड बॅक किडीच्या अळीचे नियंत्रण
ओळखण्याची लक्षणे
- या किडीची अंडी पिवळसर पांढर्या आणि फिकट हिरव्या रंगाची असतात.
- अळ्या 7-12 मिमी. लांब, फिकट पिवळसर हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यांच्या संपूर्ण शरीरावर लहान रोम असतात.
- वाढ झालेले किडे 8-10 मिमी. लांब, मातकट करड्या आणि गव्हाळ रंगाचे असतात. त्यांना पातळ पंख असून त्यांच्या आतील कडा पिवळ्या रंगाच्या असतात.
- वाढ झालेल्या माद्या पानांवर एकएकटी किंवा समूहाने अंडी घालतात.
- त्यांच्या पंखांवर पांढर्या रेषा असतात. ते दुमडल्यावर हिर्यासारखा आकार दिसतो.
हानी
- लहान, सडपातळ हिरव्या अळ्या अंड्यातून निघाल्यावर पानांच्या वाहेरील बाजूचा पृष्ठभाग खाऊन त्यात भोके पाडतात.
- हल्ला तीव्र असल्यास पानांचे फक्त सापळे राहतात.
नियंत्रण:-
- डायमंड बॅक किडीची वाढ रोखण्यासाठी फुलकोबीच्या प्रत्येक 25 ओळींनंतर बोल्ड मोहरीच्या दोन ओळी पेराव्यात.
- प्रोफेनोफॉस (50 ई.सी.) 500 मिली/ एकर किंवा सायपरमेथ्रिन 4% ईसी + प्रोफेनोफॉस 40% ईसी @ 400 मिली/ एकर या प्रमाणात मिश्रण बनवून फवारावे.
- स्पायनोसेड (25 एस.सी.) 100 मिली/ एकर किंवा इंडोक्साकार्ब 300 मिली/ एकर किंवा इमामेक्टिन बेंझोएट @ 100 ग्रॅम/ एकर पाण्यात या प्रमाणात मिश्रण बनवून रोपणानंतर 25 व्या दिवशी आणि त्यानंतर 15 दिवसांनी पुन्हा फवारावे.
- जैविक नियंत्रण करण्यासाठी बेवेरिया बॅसियाना @ 1 किलो/ एकर वापरावे.
टीप:- प्रत्येक फवारणीबरोबर न चुकता स्टीकर मिसळावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareImproved Varieties of Cauliflower
फुलकोबीची उन्नत वाणे
1.SV 3630 सेमिनस:
- अवधि 55 – 60 दिवस
- रंग दुधासारखा पांढरा
- सरासरी वजन 800 – 1000 ग्रॅम
- स्व-आवरण – मध्यम चांगले
- घुमटाच्या आकाराची भरीव फुलकोबी
2.डायमंड मोती:
- या वाणाची लागवड सामान्यता डोंगराळ भागात होते.
- त्याची खोडे लांब रुंद असतात.
- अतिवृष्टी प्रतिरोधक वाण आहे.
- फुलाचे सरासरी वजन 750 ग्रॅम ते 1.5 किलो असते.
- फुले दुधासारख्या पांढर्या रंगाची, कठीण असतात आणि मोत्यांसारखी दिसतात.
- या वाणाची पेरणी करण्यासाठी सर्वोत्तम वेळ 15 मे ते जुलै आहे,
- नर्सरीत 22 ते 30 दिवसात तयार होते.
- पीक तैय्यार होण्यास 50 ते 60 दिवस लागतात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareNursery Preparation Method for CauliFlower
फुलकोबीची नर्सरी तयार करण्याची पद्धत
- बियाणे वाफ्यात पेरतात. वाफ्यांची ऊंची 10 ते 15 सेंटीमीटर आणि आकार 3*6 मीटर असावा.
- दोन वाफ्यात 70 सेंटीमीटर अंतर ठेवल्याने अंतरक्रिया सहज करता येतात.
- नर्सरीतील वाफ्यातील माती भुसभुशीत आणि समतल असावी.
- नर्सरी वाफे बनवताना शेणखत 8-10 किलो/ वर्ग मीटर या प्रमाणात मिसळावे.
- भारी मातीत उंच वाफे बनवून पाणी तुंबण्यावर उपाय करता येतो.
- आद्र गलन रोगाने रोपांना होणार्या हानीला रोखण्यासाठी कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी चे 15-20 ग्रॅम /10 लि. पाण्यात मिश्रण बनवून मातीत मिसळावे किंवा थायोफिनेट मिथाइल 0.5 ग्रॅम/ वर्ग मीटर या प्रमाणात वापरुन ड्रेंचिंग करावे.
- रोपांना किडीपासून वाचवण्यासाठी थायोमेथोक्सम 0.3 ग्रॅम/ वर्ग मीटर या प्रमाणात नर्सरी तयार करताना घालावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareSuitable varieties of Cauliflower
फुलकोबीची उपयुक्त वाणे
चांगली वाणे फक्त भरघोस उत्पादनच देत नाहीत तर शेतकर्यांच्या अनेक समस्या देखील कमी करतात. उदाहरणार्थ, एखादे वाण एखाद्या रोगाबाबत टॉलरंट किंवा सहिष्णु असल्यास शेतकर्याचा औषधे आणि मजुरीवरचा खर्च कमी होतो. फुलकोबीच्या वाणाची निवड करताना ते लागवडीच्या हंगामासाठी अनुकूल आहे याकडे लक्ष द्यावे. ही बाब ध्यानात ठेवून आत्ता लागवडीस उपयुक्त असलेल्या दोन वाणांबाबतची माहिती येथे देण्यात येत आहे:
इंप्रुव्हड करीना
हे लवकर तयार होणारे वाण आहे. ते बाजारात विक्रीसाठी उपयुक्त असते. त्याच्या पेरणीसाठी योग्य वेळ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आहे. याचे पीक रोपणानंतर 55 – 60 दिवसात तयार होते. त्याची पाने वाळलेली असतात आणि फुलांचे वजन सुमारे 1.2 किलो असते. त्यांचा रंग पांढरा आणि आकार घुमटासारखा असतो. या वाणाला सूर्यप्रकाश उपयुक्त असतो.
सुपर फर्स्ट क्रॉप:-
ही मध्यम तापमान आणि हवामान असताना पेरणीसाठी उपयुक्त वाण आहे. त्याची लागवड मार्च ते ऑगस्ट या काळात करता येते. हे हिवाळ्यात कडक होते आणि मध्यम तापमानातही भरघोस फुलांचे उत्पादन देते. फूल पांढर्या रंगाचे आणि संघटित असते आणि त्याचे वजन सुमारे 800 ग्रॅम ते 1 किलो असते. फुले सुमारे 60 दिवसात तयार होतात. दूर अंतरावरच्या बाजारात पोहोचवण्यासाठी हे वाण उत्तम समजले जाते. ते काळ्या कुजवा रोगासाठी सहिष्णू असते हे त्याचे वैशिष्ट्य असते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareSave cauliflower to diseases – May cause serious damage
फुलकोबीचा रोगांपासून बचाव करा – नाहीतर भारी हानी होऊ शकते
- बुरशीजन्य रोगांपासून उत्पादनाची सुमारे 4 – 25% हानी होऊ शकते.
- फुलकोबी हे भारतातील महत्वाचे भाजीचे पीक आहे.
- फुलकोबीमध्ये लागण होणारे काळा कुजवा, फुलांचे गळणे, अंगक्षय, भुरी असे रोग पिकाच्या गुणवत्तेला हानी पोहोचवतात आणि नुकसानास कारणीभूत होतात.
- रोगांच्या नियंत्रणासाठी व्यवस्थापन खूप महत्वाचे असते:-
- काळा कुजवा आणि फुलांचे गळणे यापासून बचावासाठी स्ट्रेप्टोसायक्लिन @ 20 ग्रॅम/ एकर आणि कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% @ 300 ग्रॅम/ एकर फवारावे.
- बुरशीजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी मॅन्कोझेब 75% डब्लूपी @ 400 ग्रॅम/ एकर किंवा कार्बेन्डाजिम 50% @ 300 ग्रॅम/ एकर टेबुकोनाजोल 50% + ट्रायफ्लोक्सिस्ट्रोबिन 25% डब्लूपी @ 100-120 ग्रॅम/ एकर फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share