टोमॅटोची तोडणी
टोमॅटोची तोडणी त्याच्या वापरावर अवलंबून असते. सामान्यता चार अवस्था आढळून आलेल्या आहेत.
- हिरवी फळे:- पुर्णपणे विकसित हिरवी फळे दूरवरच्या बाजारपेठेसाठी तोडली जातात.
- गुलाबी फळे:- फळांची टोके गुलाबी किंवा लाल रंगाची झाल्यावर फळांची स्थानिक बाजारपेठेसाठी तोडणी केली जाते.
- परिपक्व फळे:- फळे जवळपास लाल होतात आणि मऊ पडण्यास सुरुवात होते,
- पूर्ण परिपक्व फळे:- फळे पुर्णपणे लाल आणि मऊ होतात. अशा फळांना डबा बंद करण्यासाठी आणि प्रोसेसिंगसाठी तोडतात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share



