भेंडीची तोडणी करण्याच्या वेळी लक्षात ठेवण्याच्या बाबी

भेंडीची तोडणी करण्याच्या वेळी लक्षात ठेवण्याच्या बाबी

  • फळांची लांबी सर्वाधिक होते तेव्हा त्यांची तोडणी करतात. तोडणी करताना फळे कोवळी आहेत याकडे लक्ष देणे आवश्यक असते.
  • 6 ते 8 सेमी लांब फळे निर्यातीस उपयुक्त असतात.
  • भेंडीच्या फळांची तोडणी सामान्यता धारदार चाकू किंवा वाकड्या हुकसारख्या सुरीने केली जाते.
  • भेंडीच्या झाडांवर टोचणारे रोम असतात. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी सूती कपडे आणि हातमोजे वापरावेत.
  • शक्य असल्यास तोडणी सकाळी लवकर करावी.
  • रात्री भेंडी ठेवावी लागल्यास पाणी शिंपडल्याने ती सकाळपर्यंत ताजी राहील.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Picking of Tomato

टोमॅटोची तोडणी

टोमॅटोची तोडणी त्याच्या वापरावर अवलंबून असते. सामान्यता चार अवस्था आढळून आलेल्या आहेत.

  • हिरवी फळे:- पुर्णपणे विकसित हिरवी फळे दूरवरच्या बाजारपेठेसाठी तोडली जातात.
  • गुलाबी फळे:- फळांची टोके गुलाबी किंवा लाल रंगाची झाल्यावर फळांची स्थानिक बाजारपेठेसाठी तोडणी केली जाते.
  • परिपक्व फळे:- फळे जवळपास लाल होतात आणि मऊ पडण्यास सुरुवात होते,
  • पूर्ण परिपक्व फळे:- फळे पुर्णपणे लाल आणि मऊ होतात. अशा फळांना डबा बंद करण्यासाठी आणि प्रोसेसिंगसाठी तोडतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Picking in snake gourd

काकडीच्या तोडणीचे तंत्र

  • फळे अपरिपक्व आणि कोवळी असताना तोडली जातात पण फळांचा आकार पूर्ण वाढलेला आहे काय याकडे लक्ष दिले जाते.
  • काकडीच्या सालीवरील पांढरे रोम फळ खाण्यास योग्य झाल्याचे दर्शवतात.
  • सामान्यता परागण झाल्यापासून 10 ते 12 दिवसांनी फळे विक्रीसाठी तयार होतात.
  • फळाच्या तोडण्या 2 ते 3 दिवसांचा अवधी ठेवून केल्या जातात. तयार फळांची तोडणी योग्य वेळी न केल्यास नवी फलधारणा प्रभावित होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share