Management of Red Spider Mites in Cucurbitaceae

भोपळावर्गीय पिकांवरील लालकोळी किडीचा बंदोबस्त:-

कशी ओळखावी:-

  • लालकोळी कीड 1 मिमी. लांब असते. तिला डोळ्यांनी सहज पाहता येत नाही.
  • लालकोळी कीड पानांच्या खालील बाजूस झुंडीने राहते.
  • लालकोळी कीडीच्या एका वसाहतीत 100 पर्यन्त किडे रहातात.
  • अंडी गोल, पारदर्शक आणि फिकट पिवळ्या पांढर्‍या रंगाची असतात.
  • वयात आलेल्या किडयाचे आठ पाय असतात. शरीर अंडाकार असते आणि डोक्याच्या बाजूला दोन लाल नेत्र बिंदु असतात.
  • मादीच आकार नराहून मोठा असतो आणि तिच्या शरीरावर खोल चट्ट्यासारखा आकार असतो. शरीर कठोर आवरणाने झाकलेले असते.
  • अंड्यातून निघालेल्या लार्वाला फकटा सहा पाय असतात.

हानी:-

  • लार्वा, लहान किडे आणि वयात आलेले किडे पानाची खालची बाजू फाडून खातात.
  • लहान किडे आणि वयात आलेले किडे पाने आणि अंकुराचा कोशिका रस शोषतात. त्यामुळे पाने आणि अंकुरावर पांढरे डाग पडतात.
  • अधिक प्रसार झाल्यास पानाच्या खालील बाजूस जाळे विणून त्यांना हानी पोहोचवतात.

नियंत्रण:-

  • सकाळी सूर्योदयापूर्वी पानांच्या खालील बाजूस निंबाचे तेल शिंपडावे.
  • प्रोपारजाईट 57% EC 3 मिली प्रति लीटर पाणी या मात्रेला 7 दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>