कारल्यातील लाल किड्यांचे नियंत्रण:-
- अंड्यातून निघालेले ग्रब मुळे, भूमिगत भाग आणि जमिनीच्या संपर्कात येणारी फळे खातात.
- ग्रसित मुळे आणि भूमिगत भागावर त्यानंतर मृतजीवी बुरशी हल्ला करते. त्यामुळे अपरिपक्व फळे आणि वेली सुकतात.
- ग्रसित फळे वापरास निरुपयोगी असतात.
- बीटल पाने खाऊन त्यात भोके पाडतात.
- लहान असताना बीटलचा हल्ला झाल्यास ते कोवळी पाने खाऊन हानी करतात. त्याने रोपे मरतात.
नियंत्रण:-
- खोल नांगरणी केल्याने जमिनीतील प्यूपा किंवा ग्रब उघडे पडतात आणि सूर्यकिरणांनी मरतात.
- बियाण्याच्या अंकुरणानंतर रोपाच्या सर्व बाजूंनी जमिनीत कारटाप हायड्रोक्लोराईड 3 G चे दाणे पेरावेत.
- बीटल एकत्र करून नष्ट करावेत.
- सायपरमेथ्रिन (25 र्इ.सी.) 1 मि.ली. प्रति लीटर पाणी + डायमिथोएट 30% ईसी. 2 मि.ली. प्रति लीटर पाणी या मिश्रणाची फवारणी करावी किंवा कार्बारिल 50% WP 3 ग्राम प्रति ली पाण्यात मिसळून फवारावे. पहिली फवारणी रोपणानंतर 15 दिवसांनी आणि दुसरी त्यानंतर 7 दिवसांनी करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share