Control of Red Spider Mites in Okra

भेंडीवरील लाल कोळी किडीचे नियंत्रण:-

  • लाल रंगाचे शिशु आणि वाढ झालेले किडे रोपांचा रस शोषतात. त्यामुळे पानांवर पांढरे डाग पडतात.
  • या किडीने ग्रस्त पाने करडी पडतात आणि त्यांचा रंग हळूहळू काळपट होत जातो आणि नंतर ती गळून पडतो.
  • जमिनीतील तुलनात्मक कमी आर्द्रता किडीच्या फैलावास अनुकूल असते.
  • किडे पानांच्या खालील बाजूवर पांढर्‍या रंगाचे, धाग्यासारखे जाळे विणतात.

नियंत्रण:-

  • किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी विरघळणार्‍या सल्फरची मात्रा 3 ग्रॅम प्रति लीटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारावी.
  • लागण तीव्र असल्यास प्रोपरजाईट 57% ची मात्रा 400 मिली. प्रति एकर या प्रमाणात 7 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावी.
  • किडीचा फैलाव रोखण्यासाठी सर्व ग्रस्त भागांना एकत्र गोळा करून जाळून टाकावे. शेताची साफसफाई आणि योग्य प्रमाणात सिंचन या किडीची वाढ नियंत्रित करते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>