Seed rate of Makkhan Grass

मक्खन घास गवताच्या बियाण्याचे प्रमाण

  • एकाच पिकाच्या पेरणीसाठी – 5 ते 6 किलोग्रॅम प्रति एकर
  • बरसीम बरोबर पेरणीसाठी – 2 ते 3 किलोग्रॅम प्रति एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed rate in green gram (Moong)

मुगाच्या बियाण्याचे प्रमाण

  • खरीपाच्या हंगामासाठी 8-9 किग्रॅ/ एकर या प्रमाणात बियाणे वापरावे तर उन्हाळी हंगामासाठी 12-15 किग्रॅ/ एकर या प्रमाणात बियाणे वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Sowing method and seed rate of Bitter gourd

कारल्याच्या लागवडीची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण

  • कारल्याच्या बियाण्याचे आवरण कठीण असल्याने 2-3 महिने जुने बियाणे रात्रभर थंड पाण्यात भिजत ठेवावे.
  • बियाण्याच्या चांगल्या अंकुरणासाठी एक ते दोन दिवस ते ओल्या कापडात गुंडाळून ठेवावे.
  • बियाण्याच्या अंकुरणानंतर लगेचच आळ्यांमध्ये बियाणे पेरावे.
  • प्रत्येक आळ्यात 4-5 बिया पेराव्यात.
  • 1.5 -2 किलो देशी बियाणे एक एकर जमीनिसाठी पुरेसे असते. संकरीत आणि खासगी कंपन्यांची उन्नत बियाणी 400-600 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात लागतात. बियाण्याचे प्रमाण वाण आणि पेरणीच्या पद्धतीनुसार ठरते.
  • सामान्यता बियाणे थेट पेरणी पद्धतीने पेरले जाते.
  • प्रत्येक आळ्यात 4-5 बिया 2 से.मी. खोलीवर पेराव्यात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Sowing method and seed rate of Bottle gourd

दुधी भोपळ्याच्या पेरणीची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण:-

  • अंकुरण उत्तम होण्यासाठी बियाणे पेरणीपुर्वी 24-48  तास पाण्यात बुडवून ठेवावे.
  • एक एकर जमीनिसाठी उन्नत वाणाचे 1 ते 1.5 कि. ग्रॅम बियाणे आवश्यक असते.
  • एका खड्ड्यात चार ते पाच बिया पेराव्यात.
  • बियान्यांचे अंकुरण झाल्यावर दोन आठवड्यांनी रोगट आणि कमी वाढ असलेल्या रोपांना उपटावे. त्यामुळे प्रत्येक खड्ड्यात 2 ते 3 निरोगी रोपे राहतील.
  • संकरीत वाणाच्या आणि खासगी कंपनीच्या बियाण्यांचे एकरी प्रमाण 300-500 ग्रॅम असते. बियाण्याचे प्रमाण वाण आणि लागवडीच्या पद्धतीवर अवलंबुन असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed rate of Muskmelon

खरबूजाच्या बियाण्याचे प्रमाण

खरबूजाच्या बियाण्याचे प्रमाण लागवडीची पद्धत आणि वाणावर अवलंबुन असते.

  • उन्नत आणि संशोधित वाणे:- 1.5 -2 किलो/ एकर
  • संकरीत (हायब्रिड) वाणे:- 200-400 ग्रॅम/ एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed rate of watermelon

कलिंगडाच्या पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण:-

कलिंगडाच्या पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण लागवडीची पद्धत आणि वाणावर पुढीलप्रमाणे अवलंबून असते:-

  • उन्नत आणि संशोधित वाणे:- 1.5 -2 किलो/ एकर
  • संकरीत (हायब्रिड) वाणे:- 300-500 ग्रॅम/ एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Sowing time, Planting and Seed Rate of Garlic

लसूणच्या लागवडीसाठी योग्य वेळ, लागवड करण्याची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण:-

  • मध्य भारतात पाकळ्यांचे रोपण सप्टेंबर-नोव्हेंबर या काळात केले जाते.
  • लसूणच्या पाकळ्या गाठींपासुन वेगळ्या करण्याचे काम पेरणीच्या वेळीच करावे.
  • पाकळ्यांचे साल निघाल्यास त्या पेरणीस उपयुक्त राहत नाहीत.
  • ज्यांची प्रत्येक पाकळी कडक आणि सुट्टी आहे असा कडक मानेचा गड्डा पेरणीस उपयुक्त असतो.
  • मोठ्या पाकळ्या (1.5 ग्रॅमहून मोठ्या) निवडाव्यात. छोट्या, रोगग्रस्त आणि क्षतिग्रस्त पाकळ्या काढाव्यात.
  • लसूणच्या बियाण्याचे प्रमाण 400-500 किलो प्रति हे.
  • निवडलेल्या पाकळ्या 2 सेमी. खोल 15 X 10 सेमी. अंतरावर पेराव्यात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Spacing and Seed Rate of Pea

मटारच्या वेलींमधील अंतर आणि बियाण्याचे प्रमाण:-

  • मटारच्या दोन ओळींमधील अंतर 30 से.मी. आणि दोन वेलींमधील अंतर 10 से.मी. राहील अशा प्रकारे पेरणी करावी.
  • बियाणे 2-3 से.मी. खोल पेरावे.
  • सुमारे 100 कि.ग्रा. बियाणे/हेक्टर हे प्रमाण पुरेसे असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land Preparation and Seed Rate for Okra Cultivation

भेंडीच्या लागवडीसाठी जमिनीची मशागत आणि बियाण्याचे योग्य प्रमाण:-

  • दोन वेळा खोल नांगरट करून आणि त्यानंतर दोन वेळा वखर चालवून माती भुसभुशीत करावी आणि आवश्यकता असल्यास कुळव वापरुन जमीन सपाट करावी.
  • जड मातीत पेरणी सरींमध्ये करावी. शेणखत, कम्पोस्ट खत आणि निंबोणीची पेंड इत्यादि वापरुन उर्वारकांची मात्रा कमी करता येऊ शकते.
  • उन्हाळी पिकासाठी 7 ते 8 कि.ग्रॅ. बियाणे/एकर या प्रमाणात बियाणे वापरुन पेरणी करावी.
  • पावसाळी पिकासाठी बियाण्याचे प्रमाण 3-4 कि.ग्रॅ.बियाणे/प्रति हेक्टर ठेवावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed rate and sowing time for Onion

कांद्याच्या बियाण्याचे प्रमाण आणि पेरणीसाठी सुयोग्य वेळ –

कांद्याची लागवड करण्यासाठी बियाण्याचे योग्य प्रमाण आणि पेरणीची सुयोग्य वेळ यावर विशेष लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे अन्यथा उत्पादनावर मोठा परिणाम होतो.

पेरणीसाठी सुयोग्य वेळ –

  • कांद्याची लागवड करण्यासाठी आधी कांद्याची नर्सरी बनवावी लागते. कांद्याची नर्सरी रब्बीच्या हंगामात डिसेंबर महिन्यात बनवली जाते आणि शेतात पुनर्रोपण जानेवारी महिन्यात केले जाते.
  • खरीपाच्या हंगामात 15 जून ते 15 जुलै या कालावधीत नर्सरी बनवली जाते आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतात पुनर्रोपण केले जाते.

कांद्याच्या बियाण्याचे योग्य प्रमाण –

  • सामान्यता 8-10 किलोग्रॅम प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे वापरावे.
  • 3 x 0.6 मीटर आकाराचे 100 – 110 वाफे एक हेक्टर क्षेत्रात पेरणीसाठी पुरेसे ठरतात.
  • कांद्याची पेरणी शेतात थेट बियाणे पसरून देखील केली जाते. पसरणी करताना बियाण्याचे प्रमाण 15 – 20 किलोग्रॅम प्रति हेक्टर राखावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share