कांद्याच्या बियाण्याचे प्रमाण आणि पेरणीसाठी सुयोग्य वेळ –
कांद्याची लागवड करण्यासाठी बियाण्याचे योग्य प्रमाण आणि पेरणीची सुयोग्य वेळ यावर विशेष लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे अन्यथा उत्पादनावर मोठा परिणाम होतो.
पेरणीसाठी सुयोग्य वेळ –
- कांद्याची लागवड करण्यासाठी आधी कांद्याची नर्सरी बनवावी लागते. कांद्याची नर्सरी रब्बीच्या हंगामात डिसेंबर महिन्यात बनवली जाते आणि शेतात पुनर्रोपण जानेवारी महिन्यात केले जाते.
- खरीपाच्या हंगामात 15 जून ते 15 जुलै या कालावधीत नर्सरी बनवली जाते आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतात पुनर्रोपण केले जाते.
कांद्याच्या बियाण्याचे योग्य प्रमाण –
- सामान्यता 8-10 किलोग्रॅम प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे वापरावे.
- 3 x 0.6 मीटर आकाराचे 100 – 110 वाफे एक हेक्टर क्षेत्रात पेरणीसाठी पुरेसे ठरतात.
- कांद्याची पेरणी शेतात थेट बियाणे पसरून देखील केली जाते. पसरणी करताना बियाण्याचे प्रमाण 15 – 20 किलोग्रॅम प्रति हेक्टर राखावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share