Control of aphid in muskmelon

खरबूजाच्या पिकावरील माव्याचे नियंत्रण

  • ग्रस्त रोपांना उपटून नष्ट करावे. त्यामुळे किडीचा फैलाव रोखला जाईल.
  • माव्याच्या लागणीची लक्षणे दिसताच अ‍ॅसीफेट 75% एसपी @ 300-400 ग्रॅम/एकर किंवा इमिडाक्लोप्रिड 17% एसएल @ 100 मिली प्रति एकर किंवा अ‍ॅसीटामाप्रिड 20% एसपी @ 150 ग्रॅम प्रति एकर दर 15 दिवसांनी फवारून किडीचे प्रभावी नियंत्रण करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed management in muskmelon

खरबूजातील तणाचे नियंत्रण

  • खरबूजाच्या पिकाच्या कमी उत्पादनाचे मुख्य कारण त्यातील तणाची समस्या हे आहे कारण तण शेतात जागा, पाणी आणि पोषक तत्वे मिळवण्यासाठी पिकाशी स्पर्धा करते.
  • तणाचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक असेल तेवढीच खोल नांगरणी करावी.
  • वेळेवर पेरणी करणे देखील अत्यावश्यक आहे.
  • खोल मुळे असलेले तण नांगराने किंवा कुळव चालवून काढावे किंवा हाताने तणाची निंदणी करावी.
  • खरबूजाच्या शेताचे तणापासून रक्षण करण्यासाठी पॉलीथीन मल्चिंग करणे हा एक चांगला उपाय आहे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Powdery Mildew of muskmelon

ख़रबूजातील धुरी रोगाचे नियंत्रण

  • पानांवर पांढरे किंवा धूसर रंगाचे डाग पडतात. नंतर ते बदलून त्यात पांढर्‍या रंगाची भुकटी तैय्यार होते.
  • पंधरा दिवसांच्या अंतराने हेक्झाकोनाझोल 5% SC 300 मिली. प्रति एकर किंवा थायोफिनेट मिथाईल 400 ग्रॅम प्रति एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Downy mildew control in muskmelon

ख़रबूजाच्या पिकातील केवळा (डाऊनी मिल्ड्यू) रोगाचे नियंत्रण

  • पानाच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावर पाण्याने भरलेले डाग उमटतात.
  • पानाच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावरील पाण्याने भरलेल्या डागांसारखेच डाग वरील पानाच्या डाग बाजूच्या पृष्ठभागावर उमटतात.
  • सर्वप्रथम जुन्या पानांवर डाग उमटतात आणि हळूहळू त्यांचा प्रसार नव्या पानांवर देखील होतो.
  • डाग पसरू लागल्यावर ते आधी पिवळे, त्यानंतर राखाडी रंगाचे आणि कोरडे होतात.
  • रोगग्रस्त वेलींवर फलधारणा होत नाही.
  • रोगग्रस्त पाने तोडून नष्ट करावीत.
  • मॅन्कोझेब 75% WP @ 350-400 ग्रॅम/ एकर किंवा क्लोरोथालोनिल 75% WP @ 200-250 ग्रॅम/ एकर फवारावे.
  • पीक चक्र अवलंबून आणि शेताची साफसफाई करून रोगाची तीव्रता कमी करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to improve flowering in muskmelon

खरबूजातील फुलोर्‍याच्या वृद्धीसाठी उपाय

  • खालीलपैकी काही उत्पादने वापरुन खरबूजाच्या पिकातील फुलांची संख्या वाढवता येते.
  • होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली/एकर फवारावे.
  • समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 मिली/एकर वापरावे.
  • सूक्ष्म पोषक तत्त्वे 300 ग्रॅम/एकर फवारावीत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control measures of thrips in muskmelon

खरबूजावरील तेलकिड्यांच्या (थ्रिप्स) नियंत्रणासाठी उपाययोजना

  • शिशु आणि वाढ झालेले किडे पाने कुरतडून त्यातील रस शोषतात. कोवळे अंकुर, कळ्या आणि फुलांवर हल्ला झाल्यास ते वेडेवाकडे होतात. रोप खुरटते.
  • डायमिथोएट 30% ईसी @ 250 मिली/ एकर किंवा प्रोफेनोफोस 50% ईसी @ 400 मिली प्रति एकर किंवा फिप्रोनिल 5% एससी @ 400 मिली या मात्रेत दर 15 दिवसांनी फवारावे.
  • कीटकनाशक दर 15 दिवसांनी बदलून वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Pinching in muskmelon

खरबूजाच्या फळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी छाटणी (पिंचिंग)

  • खरबूजाच्या पिकात वेलींची प्रमाणाबाहेर वाढ होणे रोखण्यासाठी छाटणी (पिंचिंग) ही प्रक्रिया वापरतात.
  • या प्रक्रियेत वेलावर पुरेशी फळे लागतात तेव्हा वेलांचे शेंडे खुडतात. त्यामुळे वेलींची वाढ थांबते.
  • शेंडे खुडण्याने वेलींची वाढ थांबते तेव्हा फळांचा आकार आणि गुणवत्ता यात सुधार होतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Maturity index in muskmelon

खरबूजाच्या फळांच्या परिपक्वतेचे लक्षण

  • सामान्यता सुमारे 110 दिवसांनी फळे परिपक्व होतात.
  • फळे पिकण्याचा कालावधी वाणाच्या निवडीवरही अवलंबून असते.
  • परिपक्व झालेले फळ थोड्या दबावाने किंवा झटक्याने सहजपणे वेळापासून वेगळे होते. ।
  • याला फुल स्लिप स्टेज म्हणतात.
  • खरबूजाच्या काही भारतीय जातींमध्ये परिपक्वतेच्या वेळी सालीवर हिरव्या रेषा उमटतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizer requirements in muskmelon

खरबूजाच्या पिकासाठी उर्वरकांची मात्रा

  • जमिनीची मशागत करताना दर एकरात 10-15 टन शेणखत/ कम्पोस्ट मिसळावे.
  • यूरिया 110 किग्रॅ, सिंगल सुपर फॉस्फेट 155 किग्रॅ, आणि म्यूरेट ऑफ पोटाश 40 किग्रॅ वापरावे.
  • बियाणे पेरण्यापूर्वी एसएसपी, म्यूरेट ऑफ पोटाशची पूर्ण आणि यूरियाची एक तृतीयांश मात्रा द्यावी.
  • मुळांजवळ आणि खोडांपासुन दूर यूरियाची उरलेली मात्रा वापरावी आणि सुरुवातीच्या विकासाच्या काळात मातीत चांगल्या प्रकारे मिसळावे.
  • पीक 10-15 दिवसांचे झाल्यावर गुणवत्ता वाढीसाठी आणि पिकाच्या चांगल्या वाढीसाठी 19:19:19 + माइक्रोन्यूट्रिएंट @ 2-3 ग्रॅम/ लीटर पाणी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation Schedule in Muskmelon

खरबूजासाठी सिंचन व्यवस्थापन

  • खरबूज हे अधिक पाणी लागणारे पीक आहे पण पाणी तुंबणे त्याच्यासाठी हानिकारक असते.
  • बियाणे शेतात पेरण्यापूर्वी एकदा सिंचन करावे आणि त्यानंतर का आठवड्याटुन्न एकदा सिंचन करावे.
  • फुलोरा येण्यापूर्वी, फुलोरा येण्याच्या वेळी आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याचा अभाव असल्यास उत्पादनात मोठी घट येते.
  • फळे पिकण्याच्या वेळी पाणी तोडल्याने फळांची गुणवत्ता वाढते आणि फळे फुटत नाहीत.
  • सतत पाणी दिल्याने भुरी, फल गलन इत्यादि रोगांचा उपद्रव वाढतो. त्यांच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी बुरशीनाशके फवारावीत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share