Seed rate of Muskmelon

खरबूजाच्या बियाण्याचे प्रमाण

खरबूजाच्या बियाण्याचे प्रमाण लागवडीची पद्धत आणि वाणावर अवलंबुन असते.

  • उन्नत आणि संशोधित वाणे:- 1.5 -2 किलो/ एकर
  • संकरीत (हायब्रिड) वाणे:- 200-400 ग्रॅम/ एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed treatment of Muskmelon

खरबूजासाठी बीजसंस्करण:-

  • खरबूज पेरणीपासून काढण्याच्या वेळेपर्यंत वेगवेगळ्या रोगांनी ग्रस्त होते. त्यामुळे त्याचे उत्पादन घटते.
  • खरबूजावरील या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी आणि त्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी बीजसंस्करण महत्वाचे असते.
  • बीजसंस्करण कार्बेन्डाजिम 50% WP 2 ग्रॅम/किलोग्रॅम बियाणे वापरुन करावे.
  • किंवा कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37. 5 % ग्रॅम /किलोग्रॅम बियाणे बीजसंस्करणासाठी वापरावे.
  • विषाणूजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी इमिडाक्लोप्रिड 600 एफ.एस (48%) 1 एम.एल./किलोग्रॅम वापरुन बीजसंस्करण करावे.
  • रासायनिक बीजसंस्करणानंतर ट्रायकोडर्मा विरिडी @ 4 ग्रॅम/कि.ग्रॅ. बियाणे वापरुन उपचार करणे शक्य असते.
  • एका रसायनानंतर दुसर्‍या रसायनाने उपचार करण्यात 20-30 मिनिटांचे अंतर ठेवावे.
  • बीजसंस्करण केल्यावर बियाणे सुमारे 30 मिनिटे सावलीत सुकवावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soil requirement for muskmelon

खरबूजाच्या शेतीसाठी उत्तम माती:-

  • खरबूजाची लागवड सर्व प्रकारच्या मातीत करता येते.
  • त्यासाठी रेताड दोमट मृदा सर्वोत्तम असते.
  • मातीत पाण्याचा निचरा उत्तम व्हावा आणि कार्बनिक पदार्थ भरपूर असावेत.
  • मातीचा पी.एच. स्तर 6.0 ते 7.0 असल्यास उत्पादन अधिक होते आणि फळांचा स्वाद देखील वाढतो.
  • मातीचे तापमान 15° सेंटीग्रेडहून कमी झाल्यास बीजाची वाढ आणि रोपाचा विकास खुंटतो.
  • लवण आणि क्षारीय जमीन खरबूजाच्या शेतीसाठी उत्तम समजली जात नाही.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate for Muskmelon Cultivation

खरबूजाच्या शेतीस आवश्यक वातावरण:- 

  • खरबूजाचे बियाणे पेरण्याची योग्य वेळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात असते.
  • उष्ण -शुष्क हवामानात फळांची वाढ चांगली होते आणि स्वाद देखील वाढतो.
  • उच्च तापमान आणि उन्ह यामुळे खरबूजातील शर्करेचे प्रमाण वाढते.
  • खरबूजाची गोदी वांशिक गुणावर अवलंबुन असते पण हवामान त्यावर काही अंशी परिणाम करते.
  • हे पीक थंडीसाठी अतिसंवेदनशील असून उन्हाळी पीक म्हणून पिकवले जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share