Irrigation Schedule in Muskmelon

खरबूजासाठी सिंचन व्यवस्थापन

  • खरबूज हे अधिक पाणी लागणारे पीक आहे पण पाणी तुंबणे त्याच्यासाठी हानिकारक असते.
  • बियाणे शेतात पेरण्यापूर्वी एकदा सिंचन करावे आणि त्यानंतर का आठवड्याटुन्न एकदा सिंचन करावे.
  • फुलोरा येण्यापूर्वी, फुलोरा येण्याच्या वेळी आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याचा अभाव असल्यास उत्पादनात मोठी घट येते.
  • फळे पिकण्याच्या वेळी पाणी तोडल्याने फळांची गुणवत्ता वाढते आणि फळे फुटत नाहीत.
  • सतत पाणी दिल्याने भुरी, फल गलन इत्यादि रोगांचा उपद्रव वाढतो. त्यांच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी बुरशीनाशके फवारावीत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation management in snake gourd

पडवळ/ वाळवंटी काकडी/ बालम काकडीच्या पिकासाठी सिंचन व्यवस्थापन

  • काकडीच्या पेरणीपुर्वी पहिले सिंचन करावे. त्यामुळे उत्तम प्रकारे पेरणी करता येते.
  • त्यानंतर आठवड्यातून एकदा सिंचन करावे.
  • उन्हाळ्यात किंवा कडक ऊन असल्यास 4-5 दिवसांनी सिंचन करावे.
  • या पिकासाठी ठिबक सिंचन पद्धती सर्वोत्तम असते. त्यामुळे पाण्याची बचत देखील होते.
  • परागण आणि फळांची लांबी वाढण्याच्या अवस्थेत सिंचन करणे अत्यंत महत्वाचे असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation in Tomato

टोमॅटोच्या पिकासाठी सिंचन

  • पिकाला साधारणपणे 8-12 दिवसांच्या अंतराने सिंचित केले जाते.
  • उन्हाळी पिकाला 5-6 दिवसांच्या अंतराने सिंचनाची आवश्यकता असते.
  • सामान्यता सिंचनासाठी खुल्या पाटांचा पद्धतीचा (ओपन फ्लो) वापर केला जातो.
  • फुलोरा येण्याच्या अवस्थेत पीक असताना पाण्याचा अभाव असल्यास फलन आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation management in watermelon

कलिंगडाच्या पिकासाठी सिंचन व्यवस्थापन:-

  • कलिंगडाच्या पिकासाठी जास्त पाणी लागते पण पाणी तुंबणे त्यासाठी हानिकारक असते.
  • कलिंगडाची शेती उष्ण हवामानात होते. त्यामुळे कलिंगडाच्या पिकासाठी सिंचनातील अंतर महत्वाचे असते.
  • कलिंगडाच्या पिकासाठी 3-5 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
  • फुलोरा येण्यापूर्वी, फुलोरा येण्याच्या वेळी आणि फळांच्या विकासाच्या वेळी पाण्याच्या अभावाने उत्पादन घटते.
  • फळे पक्व होण्याच्या वेळी सिंचन थांबवावे. असे करण्याने फळाची गुणवत्ता वाढते आणि फळे फुटण्याची समस्या उभी राहत नाही.
  • सतत पाणी देण्याने पिकातील रोगांचा (पांढरी भुकटी रोग, फल गलन रोग इत्यादि) उपद्रव वाढतो. त्याच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी बुरशीनाशक फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation Management of Wheat

गव्हाच्या पिकासाठी पाणी व्यवस्थापन:-

  • भरघोस पिकासाठी वेळेवर सिंचन करणे आवश्यक आहे.
  • पीक डेरेदार होण्याच्या वेळी आणि दाणे भरण्याच्या वेळी सिंचन करावे.
  • थंडीच्या मोसमात पाऊस झाल्यास सिंचन कमी करता येईल.
  • कृषि वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार वेगाने वारे वाहत असताना सिंचन काहीवेळ थांबवावे.
  • कृषि वैज्ञानिकांचे असेही म्हणणे आहे की शेतात 12 तासांहुन जास्त वेळ पाणी साठू देऊ नये.
  • गव्हाच्या शेतातील पहिले सिंचन पेरणीनंतर सुमारे 25 दिवसांनी करावे.
  • दुसरे सिंचन सुमारे 60 दिवसांनी आणि तिसरे सिंचन सुमारे 80 दिवसांनी करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Important Practices for Increase Yield of Watermelon

कलिंगडाचे उत्पादन वाढवण्यासाठी लक्षात ठेवण्याच्या बाबी:-

  • काळ्या प्लॅस्टिकने मल्चिंग  करण्याचे अनेक फायदे होतात. उदा.- त्यामुळे माती गरम राहते, तणाची वाढ थांबते, स्वच्छता राहिल्याने फळांचा विकास होण्यास मदत होते.
  • कलिंगडाच्या पेरणीपासून फळे पक्व होईपर्यंतच्या वाढ, फुलोरा येण्याच्या पूर्वी, फलधारणा अशा अवस्थात पाणी उपलब्ध असणे आवश्यक असते.
  • मातीतील ओल टिकवणे आवश्यक असते पण शेतात अतिरिक्त पाणी साचून राहणार नाही याकडे लक्ष द्यावे. वेलाच्या बुडाशी सकाळी पाणी देणे उत्तम असते. सिंचन करताना पाने ओली होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. फळे वाढू लागताच पाणी कमी करावे. शुष्क किंवा उष्ण हवामान फळांमधील गोडी वाढवते.
  • उर्वरक निवडताना तुम्ही निवडलेले उर्वरक फॉस्फरस आणि पोटॅशियमच्या तुलनेत जास्त नायट्रोजन देते याची खबरदारी घ्यावी. परंतु फळांचा विकास होत असताना फॉस्फरस आणि पोटॅशियम जास्त आणि नायट्रोजन कमी पुरवणारे उर्वरक  निवडावे. तरल समुद्री शेवाळ वापरणे अधिक उत्तम असते.
  • एकाच वेलावर वेगवेगळी नर आणि मादी फुले लागतात. सामान्यता मादी फुले लागण्यापूर्वी काही आठवडे नर फुले लागणे सुरू होते. नर फुले गळून पडणे उत्पादनास हानिकारक नसते. ती गळाली तरी मादी फुले वेलावर राहून फलोत्पादन करतात.
  • परागीकरणासाठी मधमाशा आवश्यक असतात. त्यांच्यामुळे वेलावरील फळांची संख्या वाढते. फळ पक्व होताना त्याचा सडण्यापासून बचाव करण्यासाठी त्याला हळुवारपणे उचलून जमीन आणि फळाच्या मध्ये लाकडाचा तुकडा किंवा भुसा सारावा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Requirement of Irrigations in Pea

मटारच्या पिकासाठी आवश्यक सिंचन:-

  • जमीन कोरडी असल्यास उत्तम अंकुरण होण्यासाठी पेरणीपुर्वी सिंचन करावे.
  • जमिनीचा प्रकार आणि हंगामानुसार 10 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
  • ओंब्या येण्याच्या वेळी ओल कमी पडल्यास उत्पादन घटते. त्यामुळे त्यावेळी सिंचन करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Critical stage of irrigation in Potato

बटाट्याच्या सिंचनातील महत्वाची अवस्था:-

  • बटाट्याच्या पिकाच्या हंगामाच्या दरम्यान मातीत सर्वाधिक ओल राखण्यासाठी उच्चस्तरीय व्यवस्थापन आवश्यक असते.
  • वाढीच्या पुढील अवस्थात पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असते:-
  • 1). अंकुरणाची वेळ
  • 2). कंद बनण्याची वेळ
  • 3). कंद वाढण्याची वेळ
  • 4). पिकाच्या पक्वतेची वेळ
  • 5). काढणीपूर्वी

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation Management in Sponge Gourd

घोसाळ्यासाठी सिंचन व्यवस्थापन:-

  • बियाण्याच्या चांगल्या अंकुरणासाठी जमिनीत पुरेशी ओल असावी.
  • बियाण्याच्या चांगल्या अंकुरणासाठी पेरणी करण्यापूर्वि शेतात सिंचन करावे.
  • त्यानंतरचे सिंचन बियाणे पेरल्यावर करावे.
  • शेतात हंगाम आणि जमिनीस अनुरूप सिंचन करावे.
  • सामान्यता उन्हाळ्यात 4-5 दिवसांच्या अंतराने तर हिवाळ्यात 8-10 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation in Cauliflower

फूलकोबीच्या पिकाचे पाणी व्यवस्थापन:-

  • भरघोस पिकासाठी पुरेशी ओल टिकवणे आवश्यक आहे.
  • रोपणानंतर थोडे पाणी द्यावे.
  • ओल टिकवून ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार 10-15 दिवसांच्या अंतराने थोडे थोडे पाणी देत राहावे.
  • उशिराच्या आणि मध्य हंगामातील पीक पावसावर अवलंबून असते. |
  • फुलोरा येण्याच्या आणि गड्डे विकसित होण्याच्या काळात ओल टिकवणे खूप आवश्यक असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share